26 December 2024 11:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPCGREEN Bonus Share News | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला तुफान गर्दी - NSE: SURYAROSNI IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल
x

Family Pension | मुलींनो कौटुंबिक पेन्शनवर तुमचा सुद्धा हक्क; निवृत्ती वेतनाबाबतचे नियम लक्षात ठेवा, आजीवन पेन्शन मिळेल

Family Pension

Family Pension | सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांचा अचानक मृत्यू झाला तर, त्याच्या कुटुंबीयांना पेन्शन मिळायला सुरुवात होते. या पेन्शनला आपण ‘फॅमिली पेन्शन’ असं म्हणतो. पेन्शनच्या केंद्रीय नागरी सेवा नियम 2021 नुसार अचानक मृत्युमुखी पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आधार म्हणून पेन्शन देण्यात येते. परंतु अनेकांना असा प्रश्न पडलेला असतो की, कुटुंबातील नेमक्या कोणत्या सदस्याला कौटुंबिक पेन्शनचा लाभ घेता येणार.

कौटुंबिक पेन्शन मिळावी यासाठी कर्मचारी आधीच त्याच्या कुटुंबातील सदस्यांची नावे निश्चित करून ठेवतो. जेणेकरून आपल्या आश्रितांना कोणत्याही प्रकारची चणचण भासणार नाही. दरम्यान केंद्रीय नागरी सेवांचा एक महत्त्वाचा नियम आहे. या नियमाचं नाव आहे ‘नियम 54’. या नियमांतर्गत समजते की, तुमच्या कुटुंबीयातील कोणकोणत्या सदस्यांना पेन्शन प्राप्त होऊ शकते.

नियमानुसार कोणाला मिळणार पेन्शन :

‘नियम 54’ नुसार ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याच्या जोडीदाराला मरेपर्यंत पेन्शन मिळणार. त्याचबरोबर मृत व्यक्तीची मुलं, मृत व्यक्तीचे आई-वडील किंवा पालक, त्याचबरोबर मृत व्यक्तीची अपंग भावंड हे सर्व महत्त्वाचे व्यक्ती पेन्शन मिळण्यास पात्र आहेत.

मृत्युमुखी कर्मचाऱ्याच्या मुलीला पेन्शन मिळते का :

बऱ्याच मुलींना असा प्रश्न नक्कीच पडला असेल की, मृत्यू कर्मचाऱ्याच्या मुलीला मरेपर्यंत पेन्शन मिळते का. तरी याचं उत्तर होय आहे. समजा मुलगी विवाहित किंवा अविवाहित असली त्याचबरोबर मुलगी विधवा असली तर, तिला पेन्शन नियम 2021 नुसार कौटुंबिक पेन्शन मिळण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. सरकारी नियमानुसार घरातील इतर कोणताही सदस्य घरच्या मुलीचे नाव पेन्शन यादीतून काढू शकत नाही.

परंतु याची एक अट देखील दिली आहे. ती म्हणजे ज्या मुलीला पेन्शन हवी आहे तिचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मृत व्यक्तीच्या मुलांचे वय देखील 25 वर्षांपेक्षा जास्त असं नाही गरजेचे आहे आणि त्याच्याकडे नोकरीचं साधन असणे देखील महत्त्वाचे आहे.

मिळणार आजीवन पेन्शन :

समजा एखाद्या कर्मचाऱ्याने मृत्यूच्याआधी घरातील मुलीचे नाव 4 नंबरच्या फॉर्ममध्ये लिहिलेले असेल तर, सरकारी नियमानुसार अधिकृतपणे ती मुलगी पेन्शनसाठी हक्कदार असते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची मुलगी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या हतबल असेल आणि शारीरिकरित्या अपंगत्व प्राप्त झालं असेल तर, तिला आजीवन पेन्शन मिळणार. परंतु घरामधील मुलगा देखील अपंग असेल तर तो पेन्शनसाठीचा पहिला हक्कदार ठरतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Family Pension 20 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Family Pension(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x