15 January 2025 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

Gold Loan | तुम्ही गोल्ड लोन घेत असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा खूप आर्थिक नुकसान व मनस्ताप होईल - Marathi News

Highlights:

  • Gold Loan
  • गोल्ड लोन घेण्याआधी स्वतःसाठी हे प्रश्न क्लियर ठेवा :
  • गोल्ड लोनविषयी जाणून घ्या :
  • गोल्ड लोन घेण्याआधी या गोष्टींची काळजी घ्या :
Gold Loan

Gold Loan | महिलांना तसेच पुरुषांना सोन्याचे दाग दागिने घालून मिरवायला फार आवडते. अनेकजण सोन्यामध्ये प्रचंड पैसे इन्व्हेस्ट करतात. म्हणजेच सोनं खरेदी करून ठेवतात. बनवून ठेवलेला हे सोनं प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी कामाला येतच. म्हणजेच काय तर, एखाद्या व्यक्तीला अचानक भरपूर पैशांची गरज भासली तर तो बँकांकडे किंवा वित्तीय संस्थांकडे कर्ज घेण्यासाठी धाव घेतो.

परंतु कोणताही प्रयत्न यशस्वी ठरला नाही की, त्याच्या मनात तयार करून ठेवलेल्या सोन्यावर कर्ज घेण्याचा विचार येतो. ज्यालाच आपण गोल्ड लोन असं म्हणतो. गोल्ड लोन घेणे कोणत्याही व्यक्तीला फायद्याचे वाटते. कारण की या लोन प्रोसेसमध्ये तुम्हाला जास्त कागदपत्रांची तरतूद करावी लागत नाही.

समजा तुम्हाला केव्हाही आयुष्यामध्ये सोनं गहाण ठेवून कर्ज घेण्याची वेळ आली असेल तर, काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर कर्ज तर जाईलच त्याचसोबत तुम्ही गहाण ठेवलेलं सोनं देखील जाईल. तुमच्या निष्काळजीपणामुळे तुम्ही फार मोठ्या गोत्यात येऊ शकता.

तुम्ही गहाण ठेवलेल्या सोन्यासाठी काही अटी, वाजवी व्याजदर आणि सुरक्षितता या सर्वांची हमी देणारी योग्य संस्था निवडणे अत्यंत गरजेचे असते. त्याचबरोबर परतफेडीचा पर्याय, कर्ज-ते-मूल्य हे गुणोत्तर आणि समोरच्याचा विश्वास या सर्व गोष्टींची पडताळणी करूनच गोल्ड लोन घेण्याचा विचार करा.

गोल्ड लोन घेण्याआधी स्वतःसाठी हे प्रश्न क्लियर ठेवा :

सोनं गहाण ठेवून कर्ज घेण्याचा विचार करण्याआधी तुम्ही काही प्रश्नांची उत्तर शोधली पाहिजे. यामध्ये तुम्हाला खरंच सोनंतारण घेण्याची गरज आहे का, त्याचबरोबर तुम्ही कर्ज घेताना कमी कालावधीसाठी घेताय की, पुढील मोठ्या गुंतवणुकीसाठी घेत आहात ही गोष्ट क्लियर करा. त्याचबरोबर घेतलेले कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे वेतनाचा आणि व्यवस्थापनाचा योग्य पर्याय आहे की नाही या गोष्टींची देखील काळजी घेतली पाहिजे. अशा बेसिक प्रश्नांची उत्तरं तुम्ही गोल्ड लोन घेण्याआधीच स्वतःला विचारली पाहिजे.

गोल्ड लोनविषयी जाणून घ्या :

प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीसाठी गोल्ड लोन घेणे हा पर्याय अतिशय लाभदायक असतो. त्याचबरोबर गोल्ड लोन घेणे अनेकांना सुरक्षित आणि फायद्याचे वाटते. गोल्ड लोन मिळवण्यासाठी कर्जदार आपलं सोनं एखाद्या वित्तीय संस्थेकडे गहाण ठेवतो. या ठेवणीवरच कर्जदाता कर्जदाराला पैशांच्या स्वरूपात लोन प्रदान करतो. कर्जाच्या पैशांची रक्कम ही सोन्याच्या वर्तमान बाजाराच्या मूल्याच्या टक्केवारी एवढी धरली जाते. याच गोष्टीला आपण कर्ज-ते-मूल्य गुणोत्तर असं म्हणतो.

गोल्ड लोन घेण्यासाठी झटपट कागदपत्रांची पूर्तता तसेच परतफेडमध्ये लवचिकता असल्यामुळे अनेकांना गोल्ड लोन घेणे सोपे आणि फायद्याचे वाटते. व्यक्ती सहसा आपातकालीन परिस्थितीमध्ये, शैक्षणिक खर्चासाठी किंवा काही वैयक्तिक गरजांसाठी आणि एकंदरीतच आर्थिक गरजा भागवण्यासाठी गोल्ड लोनचा पर्याय निवडला जातो.

गोल्ड लोन घेण्याआधी या गोष्टींची काळजी घ्या :

1) गोल्ड लोन फेडण्यासाठी जी संस्था तुम्हाला साधा-सोपा म्हणजेच लवचिक पर्याय देते अशा संस्थांकडून लोन घ्या. कारण की लोन परतफेड करताना तुम्हाला जास्त अडचणींचा सामना करावा लागणार नाही. अंशिक पेमेंट किंवा भिन्न कालावधी असल्यास तुम्हाला चटकन लोन परतफेड करण्यासाठी मदत मिळते.

2) गोल्ड लोन घेताना तुम्ही ज्या संस्थेकडून लोन घेण्याचा विचार करत आहात त्या संस्थेचा आणि विविध वित्तीय संस्थांचे व्याजदर पडताळून पहा. या व्याजदराची तुलना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही योग्य वेळी वाजवी व्याजदराची तुलना करून चर्चा केली तर, तुमचा परतफेडीचा भार हलका होऊ शकतो.

3) केव्हाही आपल्या सोयीनुसार आपली आर्थिक गरज पूर्ण करणारी वित्तीय संस्था निवडली पाहिजे.
तुमच्या सोन्याच्या रकमेची तुलना केली तर, तुमच्या सोन्याच्या तुलनेत तुम्ही किती कर्ज घेऊ शकता ही गोष्ट लोन-टू-व्हॅल्यू ठरवतो. म्हणजेच उच्च कर्ज-ते-मूल्य गुणोत्तर तयार होते. यामध्ये तुम्हाला जास्तीचे पैसे मिळू शकतात परंतु या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी कठोर अटी आणि नियम असू शकतात.

Latest Marathi News | Gold Loan Process 26 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Gold Loan(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x