14 January 2025 3:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Gratuity Calculator | नोकरदारांनो, ग्रॅच्युईटी मोजण्याचा सोपा फंडा, तुमच्या पगाराप्रमाणे किती पैसे मिळणार पहा - Marathi News

Highlights:

  • Gratuity Calculator
  • या सूत्रामुळे ग्रॅच्युईटी मोजायला जाते सोपी – Gratuity Meaning
  • कायद्या अंतर्गत डबल फायदा –
  • कंपनीत नोंदणी नसल्यामुळे वापरली जाते वेगळी पद्धत – What is Gratuity
Gratuity Calculator

Gratuity Calculator | कोणत्याही कंपनीमध्ये जेव्हा एखादा कर्मचारी अनेक वर्ष काम करतो म्हणजे स्वतःचे भरपूर दिवस त्या कंपनीसाठी राबतो तेव्हा कंपनीतर्फे केलं जाणार कौतुक किंवा भरपूर वर्ष आमच्या कंपनीत काम केलं म्हणून दिलं जाणारं एखादं बक्षीस यालाच ग्रॅच्युईटी असं म्हणतात.

ग्रॅच्युईटीची रक्कम कर्मचाऱ्याला तेव्हाच मिळते जेव्हा तो कंपनीमध्ये एकूण पाच वर्ष काम करतो. ग्रॅच्युईटी मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याने पाच वर्षांपेक्षा अधिक काम करणे गरजेचे आहे. परंतु ही ग्रॅच्युईटी नेमकी मोजायची कशी? तिचा नेमका फॉर्मुला काय? त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही या लेखातून सांगणार आहोत. चला तर पाहूया.

या सूत्रामुळे ग्रॅच्युईटी मोजायला जाते सोपी :
ग्रॅच्युएटी मोजण्यासाठी ग्रॅच्युईटी कायदा 1972 अंतर्गत एक फॉर्मुला तयार केला गेला आहे. त्या फॉर्मुल्यामुळे तुम्ही अगदी सहजरीत्या ग्रॅच्युएटी मोजू शकता. सूत्रानुसार आपण एक उदाहरण पाहूया. ग्रॅच्युईटी मोजण्यासाठी कर्मचाऱ्याला असणारा मूळ पगार आणि नोकरीचा टाईम पिरियड या दोघांचा गुणाकार केला जातो. असं समजू, एका कर्मचाऱ्याचा मूळ पगार 75,000 हजार रुपये आहे. त्याचबरोबर त्या कर्मचाऱ्याने आपले दहा वर्ष कंपनीसाठी काम केलं आहे. तर (75,000 × 10 वर्ष × 15/26) अशा पद्धतीच्या सूत्राचा वापर करून रक्कम काढली तर 4,32,692 एवढे रुपये ग्रॅच्युईटीचे मिळतात.

कायद्या अंतर्गत डबल फायदा :
ग्रॅच्युईटी कायदा 1972 अंतर्गत नोटीस पिरियडचा कालावधी देखील मोजला जातो. अनेकांना हा प्रश्न पडलेला असतो की, नोटीस पिरेडचा कालावधी ग्रॅच्युएटीच्या रकमेमध्ये मोजला जातो की नाही? तर, याचे उत्तर होय आहे. तुमचा नोटीस पिरेड मोजूनच ग्रॅच्युईटी दिली जाते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने पाच वर्षांमधील 4 वर्ष काम केलं असेल आणि पुढच्या एका वर्षातले 10 महिने भरून 2 महिने बाकी असतील तर, त्या कर्मचाऱ्याला सुद्धा ग्रॅच्युईटी मिळते.

कंपनीत नोंदणी नसल्यामुळे वापरली जाते वेगळी पद्धत :
कायद्याअंतर्गत जर कंपनी नोंदणीकृत नसेल तरीसुद्धा कंपनी आपल्या इच्छेनुसार कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी मिळवून देऊ शकते. परंतु यामध्ये संपूर्ण कॅल्क्युलेशन वेगळं असतं. यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातील निम्मा हिस्सा ग्रॅच्युईटीच्या रक्कमेत मोजला जातो.

Latest Marathi News | Gratuity Calculator for salaried peoples 17 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Gratuity Calculator(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x