5 February 2025 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER Post Office Schemes | फक्त व्याजाचे 2,54,272 रुपये आणि मॅच्युरिटीला 8,54,272 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, महिना 3000 रुपयांच्या SBI SIP वर मिळेल 1.39 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा
x

Gratuity on Salary | खुशखबर! 35 हजार पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना ग्रॅच्युइटी इतकी रक्कम मिळणार

Gratuity on Salary

Gratuity on Salary | सरकारने नव्या लेबर कोडमध्ये ग्रॅच्युइटीमध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहेत, पण सध्या तरी काहीही पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्याऱ्यांना ग्रॅच्युइटीबाबत अनेक प्रश्न पडतात. यातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ग्रॅच्युईटीचे पैसे पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मिळणार नाहीत का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आणि किती रक्कम मिळेल ते माहिती असणं गरजेचे आहे.

ग्रॅच्युइटी म्हणजे काय आणि ती कोणाला मिळते?
सर्वप्रथम जाणून घेऊया ग्रॅच्युइटी म्हणजे काय आणि ती खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचार् यांना उपलब्ध आहे का? कंपनीकडून कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी दिली जाते. एकप्रकारे सातत्यपूर्ण सेवेच्या मोबदल्यात कंपनी ग्रॅच्युइटीच्या रूपाने आपल्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करते.

पेमेंट अँड ग्रॅच्युईटी कायदा देशातील सर्व प्रायव्हेट कंपन्या, कारखाने, खाणी, तेलक्षेत्रे, बंदरे आणि रेल्वेयांना लागू आहे. यासोबतच 10 पेक्षा जास्त लोकांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीचा लाभ मिळतो.

ग्रॅच्युइटी कायदा काय म्हणतो?
सलग पाच वर्षे कोणत्याही कंपनीत काम केलेले कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र मानले जातात. परंतु काही प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांना पाच वर्षांपेक्षा कमी सेवेनंतरही ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम-2A मध्ये ‘सतत काम’ अशी स्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे. यानुसार अनेक कर्मचाऱ्यांनी पूर्ण 5 वर्षे काम केले नाही तरी त्यांना ग्रॅच्युईटीचा लाभ मिळू शकतो.

ग्रॅच्युइटी 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी उपलब्ध आहे
ग्रॅच्युईटी कायद्याच्या कलम-2A नुसार भूमिगत खाणींमध्ये काम करणारे कर्मचारी आपल्या मालकाकडे सलग 4 वर्षे 190 दिवस काम करत असतील तर ते ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतात. तर इतर संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी 4 वर्ष 240 दिवस (म्हणजे 4 वर्ष 8 महिने) काम केल्यानंतर ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतात. नोटीस कालावधी ‘निरंतर सेवे’मध्ये गणला जातो. त्यामुळे नोटिस पीरियडही ग्रॅच्युइटीमध्ये जोडला जातो.

ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल?
एकूण ग्रॅच्युइटी रक्कम = (शेवटचा पगार) x (15/26) x (कंपनीत किती वर्षे काम केले). समजा तुम्ही एकाच कंपनीत सलग 7 वर्षे काम केले. अंतिम वेतन 35,000 रुपये (मूळ वेतन आणि महागाई भत्त्यासह) आहे. तर गणनेनुसार (35,000) x (15/26) x (7) = 1,41,346 रुपये. एका कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त 20 लाख रुपयांपर्यंत ग्रॅच्युइटी मिळू शकते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gratuity on Salary for 35000 rupees monthly salary 27 July 2024.

हॅशटॅग्स

#Gratuity on Salary(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x