5 February 2025 10:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

Home Loan | बँकेकडून 'या' ठराविक वयोगटातील व्यक्तींना अगदी सहजरीत्या मिळते गृहकर्ज; बँक कोणत्या गोष्टी तपासते जाणून घ्या

Home Loan

Home Loan | प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या घरातच स्वप्न पूर्ण करायचं असतं. यामध्ये बहुतांश व्यक्ती घर खरेदी करण्यासाठी सर्वप्रथम लोन घेण्याचा विचार करतात. एकरक्कमी पैसे उपलब्ध नसल्यामुळे लोन घेऊन घर खरेदी करणे अनेकांना फायद्याचे वाटते.

बऱ्याच व्यक्तींना लोनसंबंधी काही गोष्टी ठाऊक नसतात. ज्यामध्ये वयोमर्यादा, फायनान्शियल स्टेटस यासारख्या बऱ्याच गोष्टी परिणामकारक ठरतात. आज आम्ही या सर्व गोष्टीचे निरासरण करणार आहोत. होम लोन घेण्यासाठी व्यक्तीकडे कोण कोणत्या गोष्टी पाहून बँक इम्प्रेस होते जाणून घेऊया.

तुमचा पेशा बँक लोनकरिता परिणामकारक ठरू शकतो :

कोणत्याही व्यक्तीला लोन देण्याआधी बँक त्या व्यक्तीचा सिबिल स्कोर तसेच क्रेडिट स्कोर तपासून पाहते. त्याचबरोबर तुमचा पेशा देखील तपासते. तुम्ही नेमक्या कोणत्या कंपनीमध्ये काम करत आहात. कंपनीमधील तुमची व्हॅल्यू काय आहे हे सर्व गोष्टींचे नीरासरण केले जाते.

एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त काळ नोकरी टिकवून धरली असेल तर तुम्हाला लोन मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याचबरोबर ज्या व्यक्ती स्वतःचा बिझनेस करतात जसं की डॉक्टर, वकील किंवा रेस्टॉरंट हॉटेलसारखा एखादा बिझनेस करत असतील तर बँक सर्वप्रथम तुमच्याकडून तुमच्या बिझनेस संबंधितचे कागदपत्र तपासेलं.

वेतन आणि योग्यता महत्त्वाची आहे :

बँकेकडून तुमच्या इनकम सोर्सबद्दल चांगली जात पडताळणी केली जाईल. तुम्ही लोन परतफेडीसाठी पात्र आहात की नाही ही गोष्ट तुमच्या वेतनावर ठरते. त्याचबरोबर तुमचे एकूण किती अर्निंग सोर्स आहेत या गोष्टीवरून देखील तुमची योग्यता ठरवली जाते. याच कारणामुळे बँक तुमच्याकडून तुमच्या फायनान्शिअल स्टेटसचे सर्व कागदपत्रे, टॅक्स रिटर्न आणि बँक स्टेटमेंट घेऊन ठेवते.

उत्तम क्रेडिट स्कोर :

बँक होम लोनकरिता सर्वप्रथम तुमचा क्रेडिट स्कोर तपासते. क्रेडिट स्कोर हा एक तीन अंकी नंबर असतो. ज्यामध्ये तुमचा क्रेडिट स्कोर 700 पर्यंत असेल तर अतिशय उत्तम मानले जाते. परंतु हा क्रेडिट स्कोर 500 किंवा त्याहून खाली घसरला असेल तर तुम्हाला होम लोन मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.

तुमच्या वयोमर्यादेवर देखील विचार केला जातो :

बँक तुम्हाला लोन देण्याआधी तुमचं वय देखील विचारात घेते. तुमचं वय 30 ते 50 वर्षा दरम्यान असेल तर, बँकेकडून कोणत्याही प्रकारची शंका न बाळगता लोन दिले जाते. कारण की या वयामध्ये तुम्ही फायनान्शियल स्टेटस अतिशय उत्तम ठेवता त्याचबरोबर या वयात कोणताही व्यक्ती कार्यरत असतो ज्यामुळे स्थिर इन्कम सोर्स असलेला पाहायला मिळतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Home Loan 30 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Home Loan(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x