4 January 2025 6:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | कमी पैशांत स्वस्तात मस्त व्यवसाय सुरू करायचा आहे, हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा, दररोज कमाई होईल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरवर ब्रोकरेजकडून 'BUY' कॉल, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: AWL SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, PSU शेअर मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: SJVN IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

Home Loan Alert | 90% लोक गृहकर्ज घेताना 'या' गंभीर चुका करतात, कर्जासाठी अर्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Home Loan Alert

Home Loan Alert | आपले देखील स्वतःचा हक्काचं घर असावं असं स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहतो. मुंबईसारख्या ठिकाणी किंवा शहरी भागांमध्ये आपला स्वतःचा हक्काचा एक आलिशान फ्लॅट असावा यासाठी प्रत्येक व्यक्ती दिवस रात्र काबाडकष्ट करून पैशांची जमा जमाव करतो. परंतु सर्व सामान्य व्यक्तींना घर खर्च सांभाळून पैशांनी घर खरेदी करता येईल एवढा मोठा फंड तयार करण्यास संपूर्ण आयुष्य निघून जातं. यासाठीच लोक गृहकर्ज घेण्याचा विचार करतात.

आपण गृहकर्ज जरी घेत असलो तरीही त्याची परतफेड मात्र आपल्याला वेळेवर करावी लागते. अन्यथा आपल्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस वसूलले जातात. तुम्हाला सुद्धा गृहकर्ज घ्यायचे असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कारण की यामध्ये आम्ही तुम्हाला भरावे लागणाऱ्या काही शुल्कांविषयी आणि नियमांविषयी सांगणार आहोत.

अर्जशुल्क आहे महत्त्वाचा :

तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये किंवा बँकेमध्ये घरासाठी गृहकर्ज घेण्याकरिता जातात तेव्हा तुमच्याकडून अर्ज शुल्क आकारले जाते. महत्वाचे म्हणजे हे शुल्क रिफंड केले जात नाही. म्हणजेच अर्ज फेटाळल्यानंतर तर तुम्हाला पैसे पुन्हा दिले जात नाहीत. त्यामुळे अर्ज केल्यानंतर तुम्हाला 100% गृहकर्ज मिळणार की नाही याची शाश्वती करून घ्यावी आणि मगच अर्ज भरावा.

गहाणखत शुल्क – Mortgage Charges

तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींना गहाणखत शुल्का विषयी ठाऊक नसेल. बऱ्याच बँका आणि संस्था हे शुल्क माफ करतात. जेव्हा तुम्ही गृहकर्ज निवडता त्यावेळी गहाणखत शुल्क हे अत्यंत महत्त्वाचे असते. तुमच्याकडून गहाणशुल्क तुम्ही घेतलेल्या गृहकर्जाच्या टक्केवारीवर ठरवले जाते आणि त्यानुसार पैसे आकारले जातात.

कमिटमेंट शुल्क :

कमिटमेंट शुल्क हे एक अशा पद्धतीचे शुल्क आहे जे ग्राहकाला गृहकर्ज फेडण्यास उशीर झाला की, भरावे लागते. म्हणजेच हे शुल्क केवळ न भरलेल्या कर्जावरच आकारण्यात येते.

प्रीपेमेंट शुल्क :

काही ग्राहक लवकरात लवकर कर्ज फेडण्यासाठी मुदतीपूर्वीच कर्ज फेडण्याचा विचार करतात. अशावेळी त्यांच्याकडून प्रीपेमेंट शुल्क आकारण्यात येते. म्हणजेच कर्जाचा काही भाग ग्राहकांना मुदतीपूर्वी भरावा लागतो ज्याला आपण प्रीपेमेंट शुल्क असं म्हणतो. लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे विविध बँक आणि संस्थांमध्ये प्रीपेमेंट शुल्क वेगवेगळे असू शकते.

कायदेशीर शुल्क :

कायदेशीर शुल्क हे एक प्रकारचे बाह्य देईल शुल्क आहे. तुम्ही खरेदी करत असणाऱ्या मालमत्तेची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी बँकांकडून किंवा संस्थांकडून एका वकिलाची नियुक्ती करण्यात येते. या वकिलाची फी म्हणून तुमच्याकडून कायदेशीर शुल्क आकारण्यात येते. हे शुल्क थेट वकिलापर्यंत पोहोचते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Home Loan Alert Wednesday 01 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Home Loan Alert(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x