5 November 2024 7:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

Home Loan | आता होम लोन रिजेक्ट होण्याची चिंता मिटली, या पर्यायांमुळे सोपं होईल सर्वकाही, लक्षात ठेवा - Marathi News

Highlights:

  • Home Loan
  • क्रेडिट स्कोर सुधारणे आहे आवश्यक :
  • तुमचं डाऊन पेमेंट वाढवा :
  • सरकारच्या योजनांचा आढावा घ्या :
  • हमिदार ठेवा :
  • एनबीएफसी चा विचार करून पहा :
Home Loan

Home Loan | स्वतःच हक्काचं घरं खरेदी करणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आता घर घेणं म्हणजे गृहकर्ज देखील आलच. बऱ्याच व्यक्ती गृहकर्ज म्हणजेच होम लोन काढून घर घेणं पसंत करतात. परंतु काही वेळा बँकांकडून तुमचं होम लोन फेटाळण्यात येतं. याची अनेक कारणे असू शकतात. परंतु प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कोणत्याही कर्जाची आवश्यकता नक्कीच भासू शकते. यासाठी तुम्ही आम्ही सांगितलेल्या पर्यायांचा वापर करा. या पर्यायांचा व्यवस्थित वापर केल्याने तुमचं होम लोन कधीच रिजेक्ट केलं जाणार नाही.

क्रेडिट स्कोर सुधारणे आहे आवश्यक :

चांगल्या दर्जाचे लोन मिळण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचा क्रेडिट स्कोर कमी असेल तर बँकेकडून तुम्हाला कधीही लोन मिळू शकणार नाही. यासाठी तुम्हाला जुने कर्ज फेडून चालू असणारे पेमेंट वेळेच्या वेळी करावे लागणार आहे. असं केल्यानेच तुमचा क्रेडिट स्कोर सुधारण्यास मदत होईल आणि तुम्हाला लोन मिळवण्यास कोणतीही अडचणी येणार नाही.

तुमचं डाऊन पेमेंट वाढवा :

लोन मिळण्यास कोणतीही अडचणी निर्माण होऊ नये यासाठी तुम्ही तुमचं डाऊन पेमेंट वाढवू शकता. म्हणजेच बँका किंवा NBFC पूर्ण रक्कमेसाठी कर्ज देण्यास तयार नसतील तर, तुम्ही डाऊन पेमेंट वाढवण्याचा विचार करू शकता. तुम्ही डाऊन पेमेंट केल्यामुळे कर्जदात्याचा तुमच्यावर अधिक विश्वास बसू लागतो. ज्यामुळे कर्ज मिळण्यास सोपे जाते.

सरकारच्या योजनांचा आढावा घ्या :

काही सरकारी योजना शोधल्यामुळे तुम्हाला कर्ज मिळण्यासाठी सोपे जाऊ शकते. कारण की भारतामध्ये वेगवेगळ्या सरकारी योजना सुरू असतात. यामधील काही योजनांमधून तुम्ही कशा पद्धतीने घराचे मालक बनू शकता यावर आधारित असतात. यामधून कमी वेतन असणाऱ्या व्यक्तींना पहिले प्राधान्य दिले जाते. जसे की, प्रधानमंत्री आवास योजना जी पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या व्यक्तींना सबसिडी प्रदान करते. जेणेकरून घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला फायदा मिळतो.

हमिदार ठेवा :

घर खरेदी करण्यासाठी लोन घेताना तुम्ही लोन गॅरेंटर किंवा हमीदार ठेवला पाहिजे. कारण की तुमची आर्थिक स्थिती कमकुवत असेल तर, हमीदाराच्या असल्यामुळे तुम्ही त्याच्याकडून कर्जासाठी अर्ज करण्याचा विचार करू शकता. असं केल्याने तुमचा अर्ज नाकारला जाण्याच्या शक्यता कमी असतात.

एनबीएफसी चा विचार करून पहा :

समजा बँकेने तुमच्या कर्जाचा अर्ज नाकारला असेल तर, नॉन बँकिंग वित्तीय कंपनी म्हणजेच एनबीएफसीचा पर्याय तुम्ही निवडू शकता. कारण की यामध्ये एनबीएफसी जास्त लवचिक कर्जांच्या मानदंडांसोबत काम करते. परंतु यामध्ये व्याजदर थोडं जास्त प्रमाणात असू शकते.

Latest Marathi News | Home Loan Application Process 25 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Home Loan(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x