15 January 2025 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Home Loan Application | गृहकर्जाची फाईल सबमिट करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा; अर्ज रीजेक्ट होणार नाही - Marathi News

Highlights:

  • Home Loan Application
  • सरकारी योजना शोधणे गरजेचे :
  • क्रेडिट स्कोरविषयी सतर्क रहा :
  • कर्ज घेताना हमिदार ठेवा :
  • NBFC चा विचार करा :
Home Loan Application

Home Loan Application | प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीला आपले देखील स्वतःचे हक्काचे घर असावे असं वाटत असतं. यासाठी अनेकजण अथक परिश्रम करून स्वतःची स्वप्नपूर्ती साकार करण्याकडे वाटचाल सुरू ठेवतात. परंतु मिसिंग कागदपत्रे, उत्पन्नाची अस्थिरता आणि क्रेडिट स्कोर यांसारख्या कारणांमुळे होम एप्लीकेशन केल्याबरोबर रिजेक्ट होते. ही गोष्ट आतापर्यंत तुमच्यापैकी अनेकांनी अनुभवली असेल.

तुम्हाला सुद्धा काही कारणांमुळे होम लोन भेटले नसेल आणि घराची स्वप्नपूर्ती पूर्ण झाली नसेल तर हताश होऊ नका. तुम्ही आम्ही सांगितलेल्या या पर्यायांचा वापर केला तर, तुमचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतं. चला तर पाहूया.

सरकारी योजना शोधणे गरजेचे :
घराची स्वप्नपूर्ती सातत्यात उतरवण्यासाठी तुम्ही सर्वातआधी सरकारी योजनेकडे धाव घेतली पाहिजे. केंद्र सरकारमार्फत गृहकर्जांच्या योजना राबवल्या जातात. विशेषतः कमी वेतन असलेल्या व्यक्तींसाठी प्रधानमंत्री यांनी PMAY प्रधानमंत्री आवास योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या योजनांमध्ये पहिल्यांदा घर खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.

क्रेडिट स्कोरविषयी सतर्क रहा :
गृहकर्ज घेण्यासाठी तुम्हाला बँकांकडे किंवा वित्तीय संस्थांकडे धाव घ्यावी लागते. परंतु तुमचा क्रेडिट स्कोर चांगला नसेल तर तुम्हाला गृहकर्ज किंवा इतर कोणतही कर्ज देण्यात येणार नाही. त्यामुळे बँकेत जाण्याआधी तुमचं क्रेडिट स्कोर तपासून पहा. जर तुमचा क्रेडिट स्कोर कमी असेल तर तो कशा पद्धतीने सुधारेल याकडे लक्ष द्या. तुम्ही तुमची थकबाकी योग्य वेळेवर भरून आणि जास्तीचे कर्ज डोक्यावर न करून क्रेडिट स्कोर वाढवू शकता. जेणेकरून तुम्हाला चांगल्या दर्जाचे व्याजदर मिळू शकेल.

कर्ज घेताना हमिदार ठेवा :
जर तुमची आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल तर तुम्हाला सहकर्जदाराची गरज भासू शकते. त्यामुळे कर्ज घेताना किंवा कर्जासाठी एप्लीकेशन करताना तुम्ही आधीच सहअर्जदार तयार करून ठेवावा. तुमच्या तयारीमुळे तुमचा अर्ज स्वीकारला जाऊ शकतो. जेणेकरून तुम्हाला चटकन लोन मिळण्यास मदत होईल.

NBFC चा विचार करा :
बँकेकडून तुमचा अर्ज फेटाळण्यात आला असेल तर, तुम्ही नॉन बँकिंगच्या सुविधांचा लाभ घेऊ शकता. नॉन बँकिंग म्हणजेच एनबीएफसी गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तीसाठी इतर बँकांच्या कागदपत्रांपेक्षा आणि नियमांपेक्षा लवचिक नियम लागू करतात. ज्यामुळे तुमचे काम सोपे होते. परंतु यामध्ये तुम्हाला जास्तीचे व्याजदर भरावे लागू शकते.

Latest Marathi News | Home Loan Application Process 28 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Home Loan Application(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x