13 January 2025 8:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

Home Loan Closer | होम लोन घेतलं असेल तर लक्ष द्या; क्लोज करताना काही महत्त्वाची कागदपत्र विसरू नका, महागात पडेल

Home Loan Closer

Home Loan Closer | प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं हक्काचं घर खरेदी करायचं असतं. परंतु बऱ्याच व्यक्तींजवळ पुरेसे पैसे नसल्याने ते गृह कर्ज घेण्याचा विचार करतात. गृह कर्ज घेऊन त्याचा प्रत्येक हप्ता फेडत आपण घर आपल्या ताब्यात घेऊ शकतो. परंतु कर्ज फेडत असताना किंवा कर्ज फेडण्याची तारीख जवळ येत असताना देखील काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे असते. तुमच्यापैकी फार कमी व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक आहे. तुमच्यापैकी होम लोन घेणाऱ्या व्यक्तींसाठी ही बातमी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

गृह कर्ज बंद करताना या दोन कागदपत्रांची गरज भासते :

सध्याच्या काळात छोट्या स्वरूपातील बँक देखील अगदी सहजपणे गृह कर्ज देतात. तुम्हाला घर घेण्यासाठी कर्ज देऊन घरासंबंधीचे कागदपत्र स्वतः जवळ ठेवतात. आता लोन संपूर्ण फेडल्यानंतर तुम्हाला ते कागदपत्र परत देखील करतात. अशा स्थितीमध्ये तुम्ही एक रक्कम पैसे भरून गृह कर्ज बंद करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला बँकेकडून दोन महत्त्वाची कागदपत्रे घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामधील पहिले कागदपत्र म्हणजे एनओसी NOC आणि दुसरे कागदपत्र म्हणजे Encumbrance सर्टिफिकेट. ही दोन्हीही कागदपत्रे बँकेकडून घेण्यास विसरू नका नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत देखील सापडू शकता.

NOC ना हरकत प्रमाणपत्र :

ना हरकत प्रमाणपत्र हे तुमचं सर्व कर्ज फेडून झाल्यानंतर बँक तुम्हाला देते. या कागदपत्राचा पुरावा अत्यंत महत्त्वाचा असतो. यामध्ये तुम्ही बँकेचे संपूर्ण कर्ज फेडून कोणत्याही प्रकारची थकबाकी नसल्याची पूर्तता करून देते. हा मोठा पुरावा बँकेकडून घेणे अत्यंत गरजेचे आहे. एकदा का हे प्रमाणपत्र तुमच्या हातात आले की तुम्ही बँकेला एकही रुपया देणार नाही असा त्याचा अर्थ होतो.

एनओसी घेतल्यानंतर तुम्ही कर्ज संबंधितच्या सर्व कागदपत्रांची देखील पूर्तता करा. रजिस्ट्रेशनवर तुमचं नाव नमूद आहे की नाही, तुमच्या बँकेचा तपशील व्यवस्थित आहे की नाही अशा प्रकारच्या सर्व गोष्टी तपासून घ्या. तुम्हाला बँकेच्या किंवा इतर कोणत्याही तपशीलात सुधारणा करून घ्यायची असल्यास बँक मॅनेजरशी संपर्क साधा.

Encumbrance सर्टिफिकेट :

हे सर्टिफिकेट देखील अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही संपूर्ण कर्ज फेडल्यानंतर बँकेकडून Encumbrance सर्टिफिकेट घेण्यास अजिबात विसरू नका. हे सर्टिफिकेट अस दर्शवते की, तुम्ही आता बँकेला कोणत्याही प्रकारचे देय लागत नाही. हे कर्ज तुम्हाला गृह विक्रीवेळी मदत करू शकते त्याचबरोबर तुम्हाला नवीन कर्ज घेण्यास देखील फायद्याचे ठरू शकते. महत्त्वाचं म्हणजे ही कागदपत्रे तुम्हाला फक्त आणि फक्त बँकेतूनच घ्यायची आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Home Loan Closer 27 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Home Loan Closer(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x