25 April 2025 7:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Investment | 90% लोकांना माहित नाही, मॅच्युरिटीनंतरही दर वर्षी 700000 रुपये व्याज मिळतं, पैसे बचतीचीही गरज नसते
x

Home Loan EMI | लवकरात लवकर गृहकर्ज फेडण्यासाठी 'या' गोष्टींकडे नीट लक्ष द्या, रिपेमेंट होईल अगदी सोपं - Marathi News

Highlights:

  • Home Loan EMI
  • एखादी अशी फायनान्स कंपनी निवडा जी कमी व्याजदर ऑफर करते :
  • लोन फेडण्याचा कमी कालावधी :
  • मॅक्झिमम डाऊन पेमेंट :
  • टॅक्स सूटचा वापर :
  • ऋण अंशिक री-पेमेंट :
Home Loan EMI

Home Loan EMI | कोणताच सर्वसामान्य व्यक्ती गृहकर्ज एका झटक्यात फेडू शकत नाही. यासाठी किमान 20 ते 25 वर्षांचा कार्यकाळ मोजावाच लागतो. त्याचबरोबर गृहकर्ज फेडण्यासाठी बरेच सर्व सामान्य व्यक्ती जास्तीत जास्त वेळेचा वापर करतात. परंतु लोन फेडण्यासाठी दीर्घकाळ घेतल्यामुळे तुम्हाला इतकीच व्याजाची रक्कम देखील फेडावी लागेल. भले तुम्ही ईएमआयनुसार पैसे फेडत असाल तरी सुद्धा, व्याजाची रक्कम जास्त दिवस भरावी लागते.

त्यामुळे लवकरात लवकर वेळेच्या आधीच पेमेंट पूर्ण करण्याचा विचार करा. यासाठी तुम्हाला काही स्ट्रॅटर्जी प्लॅन कराव्या लागतील. ज्यामध्ये तुम्हाला जास्तीचे व्याजदर भरावे लागणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर गृहकर्ज फेडण्याकडे वाटचाल कराल.

एखादी अशी फायनान्स कंपनी निवडा जी कमी व्याजदर ऑफर करते :
तुम्ही गृहकर्ज फेडण्याचा विचार करत असाल तर, सर्वप्रथम त्या सर्व गोष्टींवर विचार केला पाहिजे ज्यामध्ये व्याजदराच्या गोष्टींबद्दल अडथळे निर्माण होऊ शकतात. तुम्ही एखाद्या अशा कंपनीकडे, किंवा बँकेकडे जाऊ शकता जी होम लोनवर कमी व्याजदर घेत असेल.

एखादी वित्तीय संस्था किंवा बँक कमी व्याजदर घेत असेल तर, तुम्ही तुमचं अकाउंट ट्रान्सफर करून कमी व्याजदर घेणाऱ्या अकाउंटमध्ये शिफ्ट करून घेऊ शकता. असं केल्याने तुम्हाला कमी व्याजदर भरून काही पैसे वाचवता येतील. कमी व्याजदर भरल्यामुळे ती रक्कम तुम्ही ईएमआयकडे भरून लवकरात लवकर लोन फेडू शकता.

लोन फेडण्याचा कमी कालावधी :
गृहकर्ज लवकरात लवकर फेडण्यासाठी तुम्ही कमी कालावधीचे लोन घेऊ शकता. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही छोट्या लोन कालावधीचा विचार करत असाल तर तुम्हाला ईएमआयचे पैसे पेमेंट करावे लागेल. शेवटी कॅल्क्युलेशनमध्ये छोट्या कालावधीमध्ये फेडलेले लोन तुम्हाला स्वस्त पडेल.

मॅक्झिमम डाऊन पेमेंट :
तसं पाहायला गेलं तर, डाऊन पेमेंट म्हणजे घराच्या मूळ पैशांच्या 25% पर्यंत असतो. त्यामुळे जर तुमच्याकडे पर्याप्त बचत असून, अडवांस पेमेंटसाठी तुम्ही 25% पेक्षा जास्त पेमेंट करू शकत असाल तर, तुम्ही कमी लोनसाठी अप्लाय करू शकता. यामध्ये तुम्हाला मिळणारा फायदा म्हणजे व्याजाची रक्कम कमी होईल आणि मंथली पेमेंट होणारी रक्कम देखील कमी होईल.

टॅक्स सूटचा वापर :
तुम्हाला होम लोनचा टाईम पिरियड घटवायचा असेल तर, आयटी अधिनियम अंतर्गत वेगवेगळ्या टॅक्स सूटचा वापर करा. कलम 80C नुसार तुम्ही एका वर्षामध्ये रीपेमेंटसाठी पेमेंटच्या मूल्यावर दीड लाख रुपयांच्या टॅक्स सूटवर दावा करू शकता. याशिवाय तुम्ही कलम 24 बी अंतर्गत एका वर्षात होम लोनवर फेडलेली 2 लाख रुपयांपर्यंतची अमाऊंटवर टॅक्स सूटचा दावा करू शकता.

ऋण अंशिक री-पेमेंट :
समजा तुमच्याकडे अतिरिक्त पैसे आहेत आणि तुम्ही कोणत्याही कामासाठी खर्च करत नाहीये. तर ते पैसे तुम्ही होम लोन लवकरात लवकर फेडण्यासाठी वापरू शकता. म्हणजे ते तुम्ही री-पेमेंट करून होम लोन फेडू शकता.

Latest Marathi News | Home Loan EMI 03 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Home Loan EMI(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony