18 November 2024 1:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Home Loan | नोकरदारांनो! गृहकर्ज फेडल्यानंतर या गोष्टींची पुरेपूर तपासणी करा; अन्यथा अडचणीत पडाल - Marathi News

Home Loan

Home Loan | घराची स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी अनेक व्यक्ती कर्ज काढून होम लोन घेतात. त्यानंतर या होम लोनचा EMI वेळच्यावेळी भरावा लागतो. या EMI चा तुमच्या आर्थिक स्थितीवर चांगलाच परिणाम देखील होतो. घराचे हफ्ते फेडण्यामध्ये अनेकांचं अर्ध आयुष्य निघून जातं. त्यामुळे कधी एकदा होम लोन संपतंय आणि आपलं हक्काचं घर पूर्णपणे आपलं होतंय असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं.

आता गृह कर्ज पूर्णपणे फीटलं आहे आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर नाही आहे या गोष्टीचं एक वेगळाच समाधान आपल्याला वाटतं. घर पूर्णपणे स्वतःचा झाल्यानंतर अनेकजण आनंदाचा क्षण साजरा करतात. परंतु या आनंदाच्या क्षणांत तुम्ही या पाच गोष्टींची दखल आवर्जून घेतली पाहिजे. नाहीतर तुम्ही फार मोठ्या अडचणीत सापडू शकता.

1. क्रेडिट रेकॉर्ड तपासा :
तुम्ही जेव्हा लोन घेता तेव्हा तुमचा क्रेडिट स्कोर वाढतो. तुमचं लोन क्रेडिट स्कोरमध्ये दिसतो. त्यामुळे कर्ज पूर्ण फेडल्यानंतर तुमचं क्रेडिट स्कोर म्हणजेच क्रेडिट रेकॉर्ड अपडेटेड आहे की नाही या गोष्टीची खात्री करणे गरजेचे आहे. क्रेडिट स्कोरमुळे तुम्हाला पुन्हा लिहून घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

2. नॉन इन्कम्ब्रेंस सर्टिफिकेट :
होम लोन संबंधित झालेला सर्व व्यवहार इन्कम्ब्रेंस सर्टिफिकेटमध्ये दर्शवलेला असतो. करदात्याने सिक्युरिटी म्हणून तुमच्या प्रॉपर्टीवर काही चार्जेस लावलेले असतात. त्याचा संदर्भातलं हे सर्टिफिकेट असतं. त्यामुळे हे सर्टिफिकेट मिळवा जेणेकरून तुमच्यावर कोणतेही चार्जेस लागलेले नाही त्याचे खात्री होते.

3. प्रॉपर्टीचे मूळ कागदपत्र :
जेव्हा तुम्ही गृहकर्ज घेता तेव्हा हमखास घराची सर्व कागदपत्रे बँकमध्ये जमा करावी लागतात. म्हणजे काय तर तुमचं घर एक प्रकारे गहाण ठेवलं जातं. त्यामुळे गृहकर्ज पूर्णपणे फेडल्यानंतर आठवणीने घराची मूळ कागदपत्र घेऊन या. त्याचबरोबर तुमची सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत का, एखादा डॉक्युमेंट गायब तर नाही ना या सर्व गोष्टींची खात्री करून घ्या.

4. नो-ड्यूज सर्टिफिकेट :
या कागदपत्रामध्ये तुम्ही खरेदी केलेल्या मालमत्तेवर कोणताही क्लेम सोबतच तुम्ही घराचं कर्ज पूर्णपणे फेडलं आहे या संदर्भातील कागदपत्र असते. सर्वकाही या सर्टिफिकेटवर नमूद केलेलं असतं. त्याचबरोबर सर्टिफिकेटवर नमूद केलेल्या माहितीमध्ये तुमचं नाव, पत्ता आणि इतर माहिती व्यवस्थित आहे की नाही हे जरूर तपासा.

5. प्रॉपर्टीवरील लीन काढा :
होम लोन पूर्णपणे फेडेपर्यंत समोरच्याची प्रॉपर्टी आपल्याजवळ ठेवण्याच्या प्रक्रियेला लीन असं म्हटलं जातं. अनेक कर्जदाते तुमच्या प्रॉपर्टीवर लीन लावतात. त्यामुळे कर्जाची परतफेड झाल्यानंतर हे लीन हटवून घ्या. जेणेकरून तुम्हाला ही प्रॉपर्टी एखाद्याला विकायची असेल तर, कोणत्याही त्रासाशिवाय विकता येऊ शकते.

Latest Marathi News | Home Loan Payment 12 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Home Loan(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x