20 February 2025 9:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक 42 टक्क्यांनी घसरू शकतो, तज्ज्ञांचा अलर्ट, टार्गेट नोट करा - NSE: IDEA Trident Idea Share Price | ट्रायडंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TRIDENT IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा स्टॉक 52-वीक लो जवळ आला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर तेजीत, टॉप ब्रोकरेज बुलिश, मजबूत कमाईची होणार - NSE: TATAPOWER RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरमध्ये तुफान तेजी, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RVNL EPFO Pension Money | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, महिना 15,000 रुपये पगार असणाऱ्यांना इतकी पेन्शन मिळेल HDFC Mutual Fund | पैसे बँकेत ठेऊन वाढत नाहीत, अशा फंडात वाढतात, 1 लाख रुपयांवर मिळेल 1.74 कोटी रुपये परतावा
x

How to Become Rich | कमी वेळात कोटींच्या घरात पैसे कमवायचे असतील तर 12:15:20 चा फॉर्म्युला ठरेल उत्तम पर्याय

How to Become Rich

How to Become Rich | अलीकडच्या काळात केवळ पैशांची बचतच नाही तर बचतीचे पैसे गुंतवण्याची देखील तयारी सुरू झाली आहे. बहुतांश व्यक्ती गुंतवणुकीकडे वळाले आहेत. त्याचबरोबर बाजारात गुंतवणुकीचे विविध पर्याय देखील उपलब्ध झाले आहेत. अशातच प्रत्येक व्यक्ती आपल्याला मिळणाऱ्या वेतनाप्रमाणे गुंतवणुकीची रक्कम निश्चित करत असतो.

आपल्या भारतात कमीत कमी पगार घेणारे असंख्य व्यक्ती आहेत. तर, कमी पगार असलेल्या व्यक्तींनी छोट्या रक्कमेपासून गुंतवणुकीची सुरुवात केली तर, दीर्घ काळामध्ये मोठी संपत्ती तयार करून ठेवण्यास सोपे जाईल.

आज या बातमीपत्रातून आम्ही तुम्हाला छोट्या गुंतवणुकीतून कोटींची रक्कम कशी काय तयार करता येईल याची संपूर्ण माहिती सांगणार आहोत. दरम्यान लवकरात लवकर श्रीमंत होण्याकरिता म्हणजेच कोटींची संपत्ती तयार करून ठेवण्यासाठी एक जबरदस्त फॉर्म्युला देखील सांगणार आहोत. त्याचबरोबर त्या फॉर्म्युलाचा वापर कशा पद्धतीने करायचा हे देखील तुम्हाला सांगणार आहोत.

12:15:20 :
समजा तुम्ही नुकतेच नोकरीला लागला आहात आणि 40 वय होईपर्यंत तुम्हाला कोटींची रक्कम जमा करायची आहे. तर, यासाठी तुम्हाला 12:15:20 या फॉर्म्युलाचा वापर करावा लागेल. भविष्याची चिंता प्रत्येक व्यक्तीला असते. आपला निवृत्तीनंतरचा काळ, मुलांचे शिक्षण त्यांचे लग्न या सर्व गोष्टींसाठी भरपूर पैसा लागतो. तर, आता आपण गुंतवणुकी बाबतच्या काही खास टिप्स पाहणार आहोत. त्याचबरोबर वयाच्या 25 व्या वर्षे गुंतवणुकीची सुरुवात केल्यानंतर वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत वरती दिलेल्या फॉर्म्युल्याच्या मदतीने कोटींची संपत्ती कशी तयार करता येईल पाहूया.

12:15:20 फॉर्म्युलामुळे कोटींची रक्कम कशी तयार होईल :
आता आपण या फॉर्म्युलाची पूर्णपणे फोड करून गणित समजून घेणार आहोत. 12 म्हणजेच तुम्हाला मिळणारा 12 टक्के वार्षिक परतावा. त्यानंतर पुढील 15 म्हणजेच एकूण 15 वर्षांसाठी केली जाणारी गुंतवणूक आणि शेवटचे 20 म्हणजेच प्रत्येक महिन्याला गुंतवणुकीचे 20,000 रुपये.

तुम्ही मार्केटमध्ये उतरल्यानंतर सर्वप्रथम अशी योजना किंवा अशा प्रकारचा फंड शोधायचा आहे जो तुम्हाला वार्षिक आधारावर 12% परतावा मिळवून देतो. त्यानंतर योजना पंधरा वर्षांच्या कालावधीसाठी मर्यादित आहे की नाही या गोष्टीची देखील पडताळणी करा. बाजारामध्ये अशा पद्धतीचा फंड म्हणजे एसआयपी म्युच्युअल फंड आहे. समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला 20,000 रुपयांची रक्कम पुढील 15 वर्षांसाठी करत असाल तर, तुमच्या खात्यात 36 लाखाची रक्कम जमा होते.

जमा रक्कमेवर एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार 12% वार्षिक व्याजदर मिळत असेल, तुमच्या खात्यात व्याजाने 64 लाख 91 हजार रुपये जमा होती. तर अशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये एकूण 15 वर्षांत 1 कोटी 91 हजार रुपयांचा निश्चित परतावा जमा होईल. या पैशाने तुम्ही तुमच्या घराचे स्वप्नपूर्ती, रिटायरमेंट फंडासाठी पेन्शन योजना, मुला मुलींच्या शिक्षणाचा मोठा खर्च यासारख्या विविध गोष्टी पार पाडून तुमचे स्वप्नपूर्ती साकार करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#How To Become Rich(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x