Income Tax on Salary | 5 लाख रुपयेपर्यंत वार्षिक पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी खुशखबर, बजेटमध्ये घोषणा होणार

Income Tax on Salary | केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्पात प्राप्तिकर कमी करण्याचा विचार करत आहे. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की, इन्कम टॅक्समधील या संभाव्य कपातीचा फायदा ज्यांचे वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना मिळू शकते. रॉयटर्सने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार आयकर कमी करण्याचा विचार करत आहे. प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि शहरी भागात राहणाऱ्या लोकांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलले जाऊ शकते.
मध्यमवर्गाला मिळणार दिलासा
अहवालानुसार, शहरी भागात राहणाऱ्या लोकांना राहणीमानाचा खर्च जास्त आणि पगारात किंचित वाढ झाल्यामुळे अनेकदा आर्थिक दबावाला सामोरे जावे लागते. इन्कम टॅक्स कमी केल्याने त्यांच्या हातात अधिक पैसा येईल, ज्यामुळे त्यांची खर्च करण्याची शक्ती वाढेल, असा सरकारचा विश्वास आहे. यामुळे वैयक्तिक खर्चात तर सुधारणा होईलच, शिवाय भारतीय अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल. या बदलाचा सर्वात मोठा फायदा ज्यांचे वार्षिक उत्पन्न १५ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नव्या करप्रणालीला चालना मिळणार
2020 मध्ये लागू करण्यात आलेल्या नवीन कर प्रणालीनुसार, 3 लाख ते 15 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 5% ते 20% कर आकारला जातो. मात्र, घरभाडे, विमा अशा सवलतींचा लाभ मिळत नाही. कराचे दर कमी करून अधिक लोक सोपी आणि कमी गुंतागुंतीची असलेली ही नवी प्रणाली स्वीकारतील, असा सरकारचा विश्वास आहे.
कर कपातीचा परिणाम काय?
या संभाव्य करकपातीचा कोणताही दर या अहवालात नमूद करण्यात आलेला नाही. तरीही या निर्णयामुळे सरकारच्या महसुलात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. परंतु दीर्घ काळासाठी हा निर्णय करअनुपालन आणि करदात्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रभावी ठरू शकतो आणि कर संकलनात स्थैर्य आणू शकतो.
सरकारची लोकप्रियता वाढेल
कराचे दर कमी करण्याची मागणी मध्यमवर्ग अनेक दिवसांपासून करत आहे. वाढती महागाई आणि पगारात झालेली अत्यल्प वाढ यामुळे लोकांना आपल्या आर्थिक स्थितीची चिंता सतावत आहे. प्राप्तिकर कपातीमुळे त्यांना आर्थिक दिलासा तर मिळेलच, शिवाय मध्यमवर्गीयांमध्ये सरकारची लोकप्रियता वाढण्यासाठीही हे पाऊल उपयुक्त ठरू शकते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Income Tax on Salary Friday 27 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल