19 September 2024 7:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | नोकरदारांना अशाप्रकारे क्रेडिट स्कोर सुधारून मिळेल स्वस्त लोन, फक्त या पद्धती फॉलो करा - Marathi News Reliance Infra Share Price | मल्टिबॅगर रिलायन्स इन्फ्रा शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत अपडेट, पुढे फायदाच फायदा - Marathi News L&T Share Price | संधी सोडू नका, L&T सहित हे 5 शेअर्स दर महिना मोठा परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा - Marathi News BHEL Share Price | BHEL सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी कमाई होणार - Marathi News Post Office Scheme | महिना खर्चाचं नो टेन्शन, ही सरकारी योजना दरमहा 9000 रुपये देईल, फायदा घ्या - Marathi News EPF Withdrawal | पगारदारांनो, अशा पद्धतीने EPF चे पैसे काढून क्लेम स्टेटस चेक करण्याची ऑनलाइन पद्धत शिका - Marathi News Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
x

Income Tax on Salary | नोकरदारांनो! पॅन-आधार लिंक करा, अन्यथा दुप्पट इन्कम टॅक्स भरावा लागणार

Income Tax on Salary

Income Tax on Salary | जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड अद्याप आधार क्रमांकाशी लिंक केले नसेल तर इन्कम टॅक्सचा हा इशारा तुम्हाला भारी पडू शकतो. दुप्पट कर भरावा लागू शकतो. प्राप्तिकर विभागाने करदात्यांना सावध केले असून लोकांना ३१ मेपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

31 मेपर्यंत पॅन आधारशी लिंक करणे बंधनकारक
जर तुम्ही करदाते असाल तर 31 मे पूर्वी तुम्हाला पॅन कार्ड आधारशी लिंक करावं लागेल. ही डेडलाइन चुकली तर तुमची अडचण वाढू शकते. मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. लोकांना 31 मेपूर्वी पॅन-आधार लिंक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

लिंक केली नाही तर?
प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर अशा परिस्थितीत तुम्हाला दुप्पट टीडीएस भरावा लागेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) 24 एप्रिल 2024 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ज्या लोकांच्या खात्यातून कमी टीडीएस कापला गेला आहे, त्यांनी 31 मे पर्यंत आपले पॅन आधारशी लिंक केल्यास त्यांना अधिक टीडीएस भरावा लागणार नाही. सीबीसीडीनुसार, अशा लोकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. म्हणजेच अतिरिक्त कर वजावट टाळायची असेल तर 31 मे पर्यंत पॅन आधारशी लिंक करा.

पॅन आणि आधार कसे लिंक करावे
* तुम्ही घरबसल्या पॅन आणि आधार लिंक करू शकता. यासाठी incometaxindiaefiling.gov.in आयकर विभागाच्या संकेतस्थळावर जावे लागेल.
* क्विक लिंकवर क्लिक करा आणि लिंक आधारवर क्लिक करा.
* पॅन आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर व्हॅलिडेटवर क्लिक करा.
* आधार कार्डमध्ये लिहिलेले आपले नाव आणि मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर आधार लिंक करण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
* मोबाइल नंबरवर ओटीपी भरा आणि व्हॅलिडेटवर क्लिक करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Income Tax on Salary PAN Aadhaar Linking Deadline 29 May 2024.

हॅशटॅग्स

#Income Tax on Salary(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x