18 April 2025 3:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News

Investment Tips

Investment Tips | बहुतांश व्यक्ती स्वतः जवळचे ढीगभर पैसे बँकेत ठेवायला घाबरतात. कारण की बऱ्याचदा बँकेवर दरोडा पडणे त्याचबरोबर बँकांचे फ्रॉड केसेस या सर्व प्रकरणांमध्ये फसवणुकीच्या बातम्या आपण कायम पाहत असतो. परंतु बँकांमध्ये किंवा बँकेतील एफडीमध्ये पैसे न गुंतवता तुम्ही इतरही गुंतवणूक विश्वात स्वतःचे पैसे अगदी सुरक्षितपणे गुंतवून दुप्पटीने नफा कमवू शकता.

दरम्यान कोविड काळानंतर अनेकांना बचतीचा चांगलाच फटका बसलेला आहे. अचानक संकटकाळ ओढावल्यामुळे त्याचबरोबर अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे अनेकांना पैशांची तंगी भासायला लागली होती आणि म्हणूनच लोक गुंतवणुकीचे वेगवेगळे आणि जास्त परताव्याचे त्याचबरोबर कमी जोखमीचे पर्याय शोधू लागले आहेत. आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीच्या अशा पर्यायांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुमच्याजवळ असलेले ढीगभर पैसे दुपटीने वाढतील.

शेअर्समध्ये गुंतवणूक करा :

तुम्हाला पैसा दुप्पटीने वाढवायचा असल्यास शेअर्समध्ये पैसे गुंतवणुकीचा मार्ग तुमच्यासाठी उत्तम राहील. शेअर्समध्ये प्रचंड प्रमाणात जोखीम असते. एकदा पैसे बुडाले तर ते परत येत नाहीत किंवा परत येण्यास किती कालावधी लागेल याची देखील शाश्वती मिळत नाही. होय परंतु तुम्ही आर्थिक सल्लागारांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांच्या अनुभवानुसार पैसे गुंतवले तर पैसे दुप्पटीने वाढवण्यासाठी शेअर मार्केटपेक्षा दुसरा कोणताही चांगला पर्याय नाही.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी :

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही PPF मध्ये पैसे गुंतवण देखील अनुभव घेऊ शकता. त्याचबरोबर पीपीएफचा कालावधीत जास्त काळाचा असतो. त्यामुळे गुंतवणूकदाराला यामध्ये चक्रवाढ व्याजाचा त्याचबरोबर टॅक्स न भरण्याचा लाभ देखील मिळतो. अशा स्थितीत गुंतवणूकदार जास्तीत जास्त पैसे गुंतवून मोठा नफा मिळवू शकतो.

राष्ट्रीय पेन्शन योजना :

रिटायरमेंट झाल्यानंतर बरेच असे गुंतवणूकदार राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये म्हणजे NPS मध्ये गुंतवणूक करतात. एनपीएसमध्ये तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. प्रॉव्हिडेंट फंड आणि ( PMRDA) विकास प्राधिकरण NPS व्यवस्थापित केले जाते. जे मुदत ठेव, शेअर्स, लिक्विड फंड, कॉर्पोरेट बाँड्स इत्यादींमध्ये गुंतवणूक करते.

डेट म्युच्युअल फंड :

डेट म्युचुअल फंड अशा गुंतवणूकदारांसाठी अत्यंत खास आहे ज्यांना त्यांनी गुंतवलेल्या पैशांवर योग्य आणि स्थिर परतावा हवा आहे. असे गुंतवणूकदार डेट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. कारण की यामध्ये जोखीम फार कमी असते. त्याचबरोबर डेट म्युच्युअल फंड निश्चितपणे व्याजदर देणाऱ्या बाँड्समध्ये गुंतवणूक करतात ज्यामध्ये ट्रेझरी बिले आणि कमर्शियल पेपर यांचा समावेश आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Investment Tips 04 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Investment Tips(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या