5 February 2025 12:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER Post Office Schemes | फक्त व्याजाचे 2,54,272 रुपये आणि मॅच्युरिटीला 8,54,272 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, महिना 3000 रुपयांच्या SBI SIP वर मिळेल 1.39 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा
x

Investment Tips | दिवाळीमध्ये मिळणाऱ्या बोनसचा योग्य ठिकाणी वापर कसा करावा जाणून घ्या, डोक्यावरचा आर्थिक भार हलका होईल

Investment Tips

Investment Tips | यंदाची दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. नोकरीपेशा असणाऱ्या व्यक्तींसाठी दिवाळी हा सण अत्यंत प्रसन्नदायी असतो. कारण की दिवाळीच्या सुट्टीसह मिळतो तो म्हणजे दिवाळी बोनस.

नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कंपनी दिवाळी बोनस देते. म्हणजे नोकरदारांना वर्षभरातून एक पगार फ्रीमध्ये मिळतो. आता दिवाळी बोनस म्हटलं तर, बरेचजण शॉपिंग, बाहेर फिरायला जाणे, नवनवीन वस्तू घेणे या सर्व गोष्टींमध्ये खर्च करून टाकतात आणि दिवाळीचा आनंद लुटतात. परंतु दिवाळीचा आनंद लुटताना तुम्ही बोनसचे मिळालेले पैसे योग्य ठिकाणी वापरले तर, तुमच्या डोक्यावरचा बराच असा ताण कमी होईल.

लोन प्रीपेमेंट :
तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींनी गाडी किंवा एखादी नवीन वस्तू लोनवर खरेदी केली असेल, तर बोनसचे मिळालेले पैसे तुम्ही प्रीपेमेंटसाठी नक्कीच वापरू शकता. प्रीपेमेंट केल्यानंतर तुमची प्रिन्सिपल अमाऊंट कमी होईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या डोक्यावर प्रभार हलका करू शकता.

घराचं डाऊनपेमेंट :
दिवाळीमध्ये खरे खरेदी करणाऱ्यांसाठी बिल्डर्सकडून अतिशय भन्नाट ऑफर्स दिल्या जातात. तेव्हा तुम्हाला बोनस मिळालेला पैसा तुम्ही घराचं डाऊनपेमेंट करण्यासाठी वापरू शकता. दरम्यान धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही घराचं डाऊनपेमेंट करून नंतर जाणारा पैसा वाचवू शकता.

इमर्जन्सी फंड :
बरेच व्यक्ती हेल्थ गरजेसाठी पैसे साठवून ठेवतात. कारण की कधी कोणावर कोणती वेळ येईल काहीही सांगता येत नाही. अशावेळी तुम्ही तुम्हाला मिळालेले बोनसचे पैसे इमर्जन्सी फंड म्हणून गुंतवून ठेवू शकता. जेणेकरून वेळेप्रसंगी तुम्हाला इतरांसमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही.

एफडीमध्ये गुंतवणूक :
दिवाळीच्या बोनसमध्ये मिळालेले पैसे तुम्ही एफडीमध्ये गुंतवू शकता. जर तुम्ही एफडीमध्ये पैसे गुंतवले तर, तुम्हाला व्याजदर देखील मिळेल. जेणेकरून व्याजानेच तुम्ही जमा केलेल्या रकमेपेक्षा देखील आणखीन रक्कम कमवू शकता.

सोन्यामध्ये गुंतवणूक :
सोन्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमची हाऊस देखील भागवू शकता आणि भविष्यासाठी चांगले सोने तयार करून ठेवू शकता. हे सोने तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्याही वेळेप्रसंगी उपयोगी पडतील. दरम्यान सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला सोनं खरेदी करावा लागेल. यासाठी दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करून तुम्ही तुमचं आयुष्य सोनेरी बनवू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Investment Tips 22 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Investment Tips(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x