5 February 2025 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL
x

ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे

ITR Filling Benefits

ITR Filling Benefits | तुमचं उत्पन्न करपात्र नसेल तरी आयटीआर फायलिंग करा. कारण, इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यास तुम्हाला बँकेचे सोपे कर्ज आणि व्यवसायाच्या संधींसह अनेक फायदे मिळतात तसेच इतरही अनेक फायदे मिळतात. आयटीआर भरण्याचे फायदे अनेकांना माहित नसतात.

बॅंकेचे कर्ज मिळणे सोपे

आयटीआर हा तुमच्या उत्पन्नाचा पुरावा आहे. तो उत्पन्नाचा पुरावा म्हणून सर्व सरकारी व खाजगी संस्था स्वीकारतात. बँकेच्या कर्जासाठी अर्ज केल्यास बँका अनेकदा आयटीआर ची मागणी करतात. जर तुम्ही नियमितपणे आयटीआर भरलात तर तुम्हाला बँकेकडून सहज कर्ज मिळते. याशिवाय कोणत्याही वित्तीय संस्थेकडून इतर सेवा तुम्ही सहज मिळवू शकता.

व्हिसासाठी अर्ज करताना फायदा होतो

जर तुम्ही दुसऱ्या देशात जात असाल तर व्हिसासाठी अर्ज करताना तुमच्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न मागितले जाऊ शकते. अनेक देशांचे व्हिसा अधिकारी व्हिसासाठी ३ ते ५ वर्षांचा आयटीआर मागतात. आयटीआरच्या माध्यमातून ज्या व्यक्तीला आपल्या देशात यायचे आहे त्याची आर्थिक स्थिती काय आहे हे तपासतात.

आयटीआर पावती नोंदणीकृत पत्त्याचा पुरावा

आयटीआर पावती आपल्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविली जाते, जी पत्त्याचा पुरावा म्हणून काम करू शकते. याशिवाय हे तुमच्यासाठी इन्कम प्रूफ म्हणूनही काम करते.

स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आयटीआर आवश्यक

स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आयटीआर भरणे अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय एखाद्या विभागाचे कंत्राट घ्यायचे असेल तर आयटीआर दाखवावा लागेल. सरकारी खात्यात कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी तुम्हाला गेल्या 5 वर्षांचा आयटीआरही द्यावा लागतो.

आयटीआर न भरल्यास होऊ शकतो दंड

जर तुम्ही कराच्या कक्षेत येत असाल आणि तुम्ही वेळेवर आयटीआर भरला नाही तर तुम्हाला 10,000 पर्यंत दंड भरावा लागू शकतो. जे आगामी वर्षासाठी चांगले राहणार नाही.

पैशांच्या अधिक व्यवहारांसाठी आवश्यक

जर तुम्ही जास्त पैशांचे कोणतेही व्यवहार करत असाल तर आयटीआर तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो. वेळेवर आयटीआर भरल्यामुळे मालमत्ता खरेदी-विक्री, बँकेत मोठी रक्कम जमा करणे, म्युच्युअल फंडात मोठी रक्कम गुंतवल्यानंतर प्राप्तिकर विभागाकडून नोटीस मिळण्याचा धोका नसतो.

विमा कंपन्या अधिक विमा संरक्षणासाठी आयटीआर मागतात

जर तुम्हाला 1 कोटी रुपयांचे विमा संरक्षण (टर्म प्लॅन) घ्यायचे असेल तर विमा कंपन्या तुमच्याकडे आयटीआर मागू शकतात. खरं तर, ते आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत जाणून घेण्यासाठी आणि त्याची नियमितता तपासण्यासाठी आयटीआरवर अवलंबून असतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | ITR Filling Benefits Saturday 28 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#ITR Filling Benefits(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x