2 January 2025 3:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट होणार - NSE: ASHOKLEY IPO GMP | स्वस्त IPO आला रे, शेअर प्राईस बँड सहित GMP जाणून घ्या, अशी संधी सोडू नका - IPO Watch Gold Rate Today | बोंबला, आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या Reliance Power Share Price | कर्जमुक्त रिलायन्स पॉवर कंपनीचा 45 रुपयांचा शेअर तेजीत, फायद्याची अपडे - NSE: RPOWER IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा कंपनी शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, मिळेल 32 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
x

Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल

Joint Home Loan Benefits

Joint Home Loan Benefits | तुम्ही सुद्धा स्वतःचं घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला गृहकर्जावर जास्तीत जास्त सवलत त्याचबरोबर इतरही काही सुविधांचा लाभ घेता यावा असं वाटत असेल तर, ही बातमी केवळ तुमच्यासाठी. तुम्ही केवळ तुमच्या नावावर होम लोन घेण्यापेक्षा जॉईंट होम लोन देखील घेऊ शकता. तुम्ही आणि तुमची पत्नी दोघांनी मिळून गृहकर्ज घेतलं तर ते तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकेल. नेमके काय आहे ते जॉईंट होम लोन बेनिफिट्स जाणून घ्या.

जॉईंट होम लोन बेनिफिट्स :
प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या घरातच स्वप्न पूर्ण करायचं असतं. यासाठी तो दिवस रात्र मेहनत करून पैशाने पैसा जमा करत असतो. जेणेकरून दीर्घकाळानंतर मोठी रक्कम जमा होऊन तो स्वतःच्या हक्काचं घर हव्या त्या दरात आणि हव्या त्या किंमतीत खरेदी करू शकतो. परंतु कितीही झालं तरी सर्वसामान्य व्यक्ती एक रक्कम पैसे भरून घर घेऊ शकत नाही. यासाठी त्याला गृहकर्ज हा एकमेव पर्याय अवलंबवायला लागतो. त्यामुळे एकत्रित गृहकर्ज घेणे तुमच्यासाठी डबल फायद्याचे ठरू शकते.

संयुक्त कर्ज घेतल्यानंतर कोणकोणते फायदे मिळतात :
तुम्ही संयुक्त कर्ज तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याबरोबर घेऊ शकता. यामध्ये तुमची आई, तुमचे वडील त्याचबरोबर तुमची पत्नी देखील सामील असू शकते. दरम्यान तुम्ही तुमच्या पत्नीसह एकत्रित खर्च घेण्यास अर्ज केला तर, तुम्हा दोघांनाही कायद्यानुसार कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा पुरेपूर लाभ मिळू शकतो. ज्यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतची जबरदस्त कर सवलत मिळते.

कर्जदाराला गृहकर्ज हे सवलतीच्या व्याजदरात मिळते :
बऱ्याच NBFC संस्था त्याचबरोबर विविध बँका गृहकर्ज घेणाऱ्या महिलांना मिळणाऱ्या सवलतीच्या व्याजदराप्रमाणे गृह कर्ज देतात. हे दर कमीत कमी 0.5% टक्क्यांहून कमी असतात.

पहिला घर खरेदी करत असाल तर आणखीन सवलत मिळेल :
सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने महागाई वाढत आहे त्याच पद्धतीने तरुणवर्ग शिक्षणाकडे अधिक कलदर्शवत आहे. बराचअसा तरुणवर्ग उच्चशिक्षित असून आता 2 किंवा 3 फ्लॅट खरेदी करू शकतात. परंतु तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातून येत असाल आणि तुमची घर खरेदी करण्याची पहिली पहिली वेळ असेल तर, तुमच्यासाठी 50000 रुपयांची वजावट उपलब्ध आहे. ही सवलत तेव्हाच मिळते जेव्हा कर्जाची रक्कम 35 लाख रुपयांपेक्षा जास्त नसते. त्याचबरोबर तुम्ही जी मालमत्ता खरेदी करत आहात तर त्याची किंमत देखील 50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. संयुक्त गृहकर्जावर अतिशय आकर्षक आणि जबरदस्त व्याजदर अनुभवायला मिळते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Joint Home Loan Benefits Monday 30 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Joint Home Loan(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x