16 April 2025 7:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

Loan Alert | नोकरदारांनो, 'या' चुकांमुळे कर्जाचा डोंगर डोक्यावरून कधीही उतरणार नाही, या गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News

Highlights:

  • Loan Alert
  • तुमच्या वेतनाचा हिशोबाने कर्ज घ्या :
  • बचत करणे गरजेचे :
  • कर्जाची यादी बनवा :
  • घरातील नको असलेले सामान विका :
Loan Alert

Loan Alert | अनेक व्यक्तींची आर्थिक परिस्थिती मजबूत असून देखील काही चुकीच्या गोष्टी केल्यामुळे ते कर्जाच्या विळख्यात सापडतात आणि कर्जबाजारी होऊन बसतात. कर्जबाजारी झाल्यानंतर त्यांचे भविष्यातील दिवस प्रचंड हालकीचे आणि मोजमापीचे असू शकतात. तुम्हाला या सर्व गोष्टी टाळायच्या असतील आणि कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर काही गोष्टी फॉलो करणे गरजेचे आहे.

तुमच्या वेतनाचा हिशोबाने कर्ज घ्या :
बऱ्याच व्यक्ती जास्तीचे कर्ज घेऊन ते भेटण्याचा प्रयत्न करतात. परंतु पगाराच्या हिशोबाने जास्तीचे कर्ज घेतल्यामुळे कर्जावर कर्ज घेण्याची वेळ येते. हीच चूक तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते. व्यक्तीची कर्ज फेडण्याची क्षमता संपल्यानंतर त्याला ते कर्ज झेपवेनासं होतं त्यामुळे या कर्जाच्या डोंगरातून सुटका मिळवण्यासाठी व्यक्ती आणखीन कर्ज घेतो. यासाठी तुम्ही तुमच्या पगाराच्या हिशोबानेच कर्जाची अमाउंट ठेवली पाहिजे.

समजा तुम्ही महिन्याला 50,000 हजार रुपये पगार घेत असाल तर, तुमचा ईएमआय 25,000 रुपयांचा असला पाहिजे. जर तुम्हाला त्यापेक्षा जास्त पैसे भरावे लागत असतील तर, तुम्ही जास्तीचे कर्ज घेऊन कर्जाच्या विळख्यात अडकले आहेत असे समजा.

बचत करणे गरजेचे :
तुम्ही तुमच्या भविष्यासाठी कोणत्याही प्रकारची बचत करत नसाल तर, तुमचे भविष्य धोक्यात येऊ शकते. नाहीतर तुमच्या पगारातील 70% रक्कम घर खर्चासाठी आणि इतर बाहेरील खर्चासाठी खर्च होत असेल तर, भविष्यासाठी ही गोष्ट अजिबात चांगली नाही. बचत करणे अत्यंत गरजेचे आहे.

कर्जाची यादी बनवा :
तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी लोन घेतलं असेल तर, वायफळ खर्च करणे बंद करा. त्याचबरोबर तुमच्यावर भरपूर कर्ज आहे हे स्वीकारा आणि त्यानुसार प्रत्येक महिन्याचा बजेट ठरवा. वायफळ खर्च बंद झाल्यावर तुम्हाला जास्तीचे पैसे कर्जाकडे वळवता येऊ शकतात.

घरातील नको असलेले सामान विका :
तुम्ही घेतलेल्या कर्जांपैकी ज्या कर्जावर जास्तीत जास्त व्याजदर आकारले जात असेल ते सर्वातआधी फेडण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर तुम्ही जिथून कर्ज घेतलंय त्यांना व्याजाची काही रक्कम माफ करून देण्यासाठी विनंती करा. एवढेच नाही तर तुम्ही घरामधील नको असलेलं किंमती सामान विकून देखील कर्जाची मोठी रक्कम फेडू शकता.

Latest Marathi News | Loan Alert 05 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Loan Alert(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या