23 November 2024 4:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता

My EPF Money

My EPF Money | नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर रिटायरमेंट फंड तसेच पेन्शन लाभ मिळण्यासाठी प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्या पगारातून एक ठराविक रक्कम बाजूला काढली जाते आणि पीएफ खात्यात जमा केली जाते. कर्मचारी गर्जेवेळी अंशिक किंवा पूर्ण काढत घेऊ शकतो.

दरम्यान एखादा कर्मचाऱ्याला रिटायरमेंट आधीच पैशांची गरज भासली, तर त्याला पैसे काढता येतात परंतु यासाठी कर्मचाऱ्याला 2 महिन्यांपासून कोणत्याही प्रकारचा पगार किंवा काम मिळालेलं नसावं. अशा स्थितीतच कर्मचारी त्याची संपूर्ण रक्कम काढून घेऊ शकतो.

आज आम्ही तुम्हाला आणखीन कोण कोणत्या कारणांसाठी कर्मचारी पीएफ खात्यातील पैसे काढून घेऊ शकतो याची माहिती देणार आहोत. त्याचबरोबर अकाउंटमधील पैसे कशा पद्धतीने काढता येतील याबद्दलची माहिती देखील देणार आहोत.

अशा परिस्थितीमध्ये काढता येईल अंशिक पीएफ :

1. स्वतःच्या लग्नासाठी किंवा मुलांच्या लग्नासाठी
2. कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय उपचारांसाठी
3. घर किंवा एखादी जमीन खरेदी करण्यासाठी
4. होम लोन भरण्याकरिता लागणारे पैसे
5. घराच्या डागडुजीसाठी

वरील गोष्टींसाठी तुम्हाला अंशिक रूपात पैसे काढायचे असतील तर, सर्वप्रथम तुम्ही ईपीएफओ मेंबर असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुमची मेंबरशिप पाच किंवा सात वर्षांची असायला हवी.

असा चेक करा खात्यातील शिल्लक बॅलेन्स :

शिल्लक बॅलेन्सर चेक करण्यासाठी तुम्हाला केवळ एक एसएमएस करून देखील बॅलन्स चेक करता येणार आहे. यासाठी तुम्ही 7738299899 या क्रमांकावर एसएमएस पाठवून स्वतःचा शिल्लक बॅलेन्स चेक करू शकता.

पीएफ खात्यातून पैसे काढण्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या :

1. सर्वप्रथम तुम्हाला युएएन पोर्टलवर जावं लागेल आणि पासवर्ड असेल यूएएन नंबर टाकून प्रोसेस सुरू करावी लागेल.

2. तुमचा आधार नंबर ज्या फोन नंबरला कनेक्ट झाला असेल त्या नंबरवर एक ओटीपी पाठवण्यात येईल. या ओटीपीद्वारे कॅपच्या कोड टाकून घ्या.

3. खात्याची प्रोसेस केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं प्रोफाइल ओपन होईल. यामध्ये ‘ऑनलाईन सेवा’ नावाचं ऑप्शन पाहायला मिळेल हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर खालच्या दिशेने स्क्रोल करून तुम्ही क्लेम या बटनावर क्लिक करा.

4. आता तुम्हाला ईपीएफो खात्याचा नंबर टाकून मेंबर वेरिफिकेशन करून घ्यायचं आहे.

5. स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करून झाल्यानंतर सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग मिळणार आणि क्लेम केलेली सगळी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. सर्व प्रकारच्या नियमांसाठी तुम्हाला एस या बटनावर क्लिक करायचं आहे.

6. पुढील प्रोसेसमध्ये ऑनलाईन क्लेम या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण पत्ता त्याचबरोबर 15G नंबरचा फॉर्म आणि काही कागदपत्रांसह संपूर्ण फॉर्मलिटीज पूर्ण करून घ्यायच्या आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | My EPF Money 23 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#My EPF Money(134)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x