22 November 2024 2:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

My EPF Money | फक्त SIP करून नाही तर, पगारावरील EPF मधून देखील कमवाल 5 करोड रूपये, लक्षात ठेवा - Marathi News

Highlights:

  • My EPF Money
  • कर्मचाऱ्यांना ईपीएफ खात्यात किती योगदान करावे लागते :
  • सरकार देते एवढे व्याज :
  • असे मिळवा 3 ते 5 करोड :
My EPF Money

My EPF Money | खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनाची चिंता स्वतावत असते. निवृत्तीनंतर उदरनिर्वाह भागवण्यासाठी अनेक कर्मचारी वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवून ठेवतात. काहीजण एसआयपी देखील करतात. पैसे गुंतवल्यानंतर मॅच्युरिटी काळापर्यंत म्हणजेच नोकरीवरून निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला दरमहा पेंशन सुरू होते.

जास्त पैसे जमा करून ठेवण्यासाठी एसआयपीच नाही तर, ईपीएफ खात्यातून देखील तुमची बक्कळ कमाई होऊ शकते. तुम्ही चक्क 3 ते 5 करोड रुपयांएवढी रक्कम जमा करू शकता. ज्यामध्ये एसआयपीद्वारे जास्त रिटर्न मिळवून देणाऱ्या म्युचल फंड कंपन्या सुध्दा गुंतवणूकदारांचे पैसे शेअर बाजारात लावतात. त्यानंतर मिळणाऱ्या रिटर्नमधून कर्मचाऱ्यांचे व्याजदर देतात. अगदी त्याचप्रमाणे ईपीएफओ देखील कर्मचाऱ्यांच्या पीएफमधील पैसे म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे पैसे शेअर बाजारात लावून मिळणाऱ्या रिटर्नमधून कर्मचाऱ्यांचे व्याजदर दिले जाते.

कर्मचाऱ्यांना ईपीएफ खात्यात किती योगदान करावे लागते :
EPFO म्हणजेच ‘कर्मचारी भविष्य निधी संघठन’ मध्ये कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही कर्मचाऱ्याच्या खात्यात पैसे जमा करतात. कर्मचाऱ्याच्या पगारातून एक ठराविक रक्कमेच्या आधारावर 12% भाग खात्यामध्ये जमा केलं जातो. त्याचबरोबर कंपनी नियोक्ता देखील सारखेच पैसे जमा करतो.

समजा कर्मचाऱ्याला महिन्याला 20,000 पगार मिळतो. तर, यामधील त्याचे 2,400 रुपये ईपीएफ खात्यात जमा होतात. त्याचबरोबर कंपनी नियोक्ता देखील तितकेच पैसे जमा करतो. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात एकूण 4,800 रुपये जमा होतात.

सरकार देते एवढे व्याज :
ईपीएफ खात्यात योगदान केल्यामुळे सरकार वर्षाला 8.25% व्याजदर देते. प्रत्येक वर्षाला व्याजाची रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा केली जाते. एवढंच नाही तर, या योजनेमध्ये सरकार कर्मचाऱ्याकडून कोणतेही टॅक्स आकारत नाही. हे योगदान पूर्णपणे टॅक्स फ्री असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जास्तीचा फायदा अनुभवायला मिळतो.

असे मिळवा 3 ते 5 करोड :
ईपीएफ खात्यातून तुम्हाला बक्कळ पैसा कमवायचा असेल तर, ईपीएफ कॅल्क्युलेट करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्हाला हे समजून येईल की, किती पैसे जमा केल्यावर तुमच्या खात्यात 1 करोड रुपयांपर्यंत पैसे जमा होतील. समजा तुम्हाला रिटायरमेंटपर्यंत 1 करोड रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करायची असेल तर, तुम्हाला ईपीएफ खात्यात अधिक रक्कम म्हणजेच पूर्वीपेक्षा जास्त योगदान करावे लागेल.

समजा तुम्ही सलग 40 वर्ष तुमच्या पगारातून 8,400 रुपये पीएफ अकाउंटमध्ये जमा करत असाल तर, रिटायरमेंटपर्यंत तुमच्या खात्यात जवळजवळ 3,01,94,804 एवढी रक्कम जमा होईल. त्याचबरोबर तुम्ही 8,400 पेक्षा जास्त जेमतेम 12,000 योगदान करत असाल तर, 5,08,70,991 एवढी रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.

Latest Marathi News | My EPF Money Fund for salaried peoples 22 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#My EPF Money(133)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x