Pension Life Certificate | पेन्शनर्ससाठी 'लाईफ सर्टिफिकेट' जमा करण्याची अतिशय सोपी पद्धत, घरबसल्या होईल काम
Pension Life Certificate | देशभरातील लाखो करोडो पेन्शनर प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये जीवन प्रमाण पत्र म्हणजेच ‘पेन्शन लाईफ सर्टिफिकेट’ जमा करतात. टेन्शन घेणाऱ्या ज्येष्ठांना प्रत्येक वर्षातून एकदा हे प्रमाणपत्र सबमिट करावे लागते.
समजा एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने म्हणजेच पेन्शनकर्त्याने जीवन प्रमाणपत्र सबमिट केलं नाही तर त्याची पेन्शन सपशेर बंद केली जाते. दरम्यान 80 वर्षांचे सुपर सीनियर सिटीजन ऑक्टोबर महिन्याच्या एक तारखेपर्यंत प्रमाणपत्र जमा करू शकतात. अशातच 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले सिनिअर सिटीजन एक नोव्हेंबर 2024 या तारखेपासून प्रमाणपत्र जमा करू शकतात. तुम्हाला तुमचं जीवन प्रमाणपत्र घरबसल्या आणि ते सुद्धा सोप्या पद्धतीने जमा करायचं असेल तर, हा लेख तुमच्यासाठी.
आधार फेस ऑथेंटीकेशन :
आधार प्रेस ऑथेंटीकेशनच्या मदतीने तुम्ही डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जनरेट करू शकता. त्याची पद्धत अतिशय सोपी असून, केवळ काही मिनिटांचा तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने जीवन प्रमाण पत्र जमा करू शकता.
1) सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ‘Aadhaar Face RD’ early access नावाचं ॲप्लीकेशन डाऊनलोड करून घ्या.
2) एप्लीकेशन डाउनलोड करून झाल्यानंतर तुम्हाला जीवन प्रमाणपत्र हे ॲप्लीकेशन देखील डाऊनलोड करावे लागेल.
3) पुढे तुम्हाला आधार कार्ड नंबर, तुमचा मोबाईल क्रमांक, स्वतःचा ई-मेल आयडी, ओटीपी त्याचबरोबर इतर वैयक्तिक माहिती भरायची आहे.
4) पुढच्या प्रोसेससाठी तुम्हाला आधार स्कॅनवर क्लिक करायचे आहे.
5) त्यानंतर ॲपवर तुमचा फेस स्कॅन करण्यासाठी एक ऑप्शन येईल. या ऑप्शनला तुम्हाला एंटर की प्रेस करायची आहे.
6) पुढे Yes बटणावर क्लिक करून तुम्हाला तुमचा चेहरा स्कॅन करून घ्यायचा आहे.
7) तुमचे जीवन प्रमाणपत्र सबमिट झालेले असेल. प्रमाणपत्र सबमिट झाल्यानंतर लगेचच तुमच्या मोबाईलवर पीपीओ नंबर आणि सर्टिफिकेट आयडी समोर येईल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Pension Life Certificate 17 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
- Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, या पर्यायांमध्ये वाढतील, मजबूत फायद्यात राहाल
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला - NSE: TATAPOWER
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN