5 November 2024 9:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

Personal Loan EMI | पर्सनल लोनवरील EMI आणि व्याजाच्या टेन्शनमधून व्हाल मुक्त, वापरा ही भन्नाट ट्रिक - Marathi News

Highlights:

  • Personal Loan EMI
  • पर्सनल लोन बॅलन्स ट्रान्सफर :
  • हे सुद्धा माहित असावं :
  • बँक बॅलन्स ट्रान्सफरचे फायदे आणि नुकसान :
Personal Loan EMI

Personal Loan EMI | बऱ्याच व्यक्ती त्यांच्या गरजेखातिर वैयक्तिक लोन म्हणजेच पर्सनल लोन घेत असतात. अनेकांना पर्सनल लोन घेणे फायद्याचे आणि सुरक्षिततेचे वाटते. कारण की पर्सनल लोन अगदी चुटकीसरशी मिळून जाते. परंतु बँकांकडून मिळणाऱ्या पर्सनल लोनवर आपल्याकडून जास्तीचे व्याजदर देखील आकारले जातात. तुम्हाला तुमचा ईएमआय तर भरावाचे लागतो परंतु, व्याजाची परतफेडशी रक्कम जास्तीची द्यावी लागते.

आज आम्ही तुम्हाला तुमचा ईएमआय आणि व्याजाची रक्कम कमी कशी होईल याची भन्नाट ट्रिक सांगणार आहोत. पर्सनल लोन घेणाऱ्या व्यक्तीला बँकेकडून ‘पर्सनल लोन बॅलन्स ट्रान्सफर’ असा ऑप्शन दिला जातो. हा ऑप्शन जर तुम्ही निवडला तर, व्याजासह तुमचा ईएमआय देखील कमी होईल.

पर्सनल लोन बॅलन्स ट्रान्सफर :

पर्सनल लोन बॅलन्स ट्रान्सफर म्हणजेच कोणताही व्यक्ती आपल्या पर्सनल लोनची बँक ट्रान्सफर करू शकतो. परंतु ही गोष्ट व्यक्ती तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याला बँकेकडून जास्तीचे व्याजदर भरावे लागते. अशावेळी तो एका बँकेकडून दुसऱ्या बँकेमध्ये बॅलन्स ट्रान्सफर करून स्वतःची मदत करू शकतो. त्याचबरोबर समजा एखाद्या बँकेने आपले व्याजदर कमी केले असतील तर, त्या बँकेमध्ये तुम्ही तुमचा बॅलेन्स ट्रान्सफर करून घेऊ शकता. ज्या बँका कभी व्याजदर घेतात तिथे तुम्ही अगदी सहजरित्या स्वतःचा बॅलन्स ट्रान्सफर करून घेऊ शकता. बँक अकाउंट ट्रान्सफर केल्याबरोबर तुम्हाला तुमच्या ईएमआयवर देखील फरक पडल्याचा जाणवेल.

हे सुद्धा माहित असावं :

समजा तुमचा क्रेडिट स्कोर आणि सिबिल स्कोर चांगला असेल तर, कोणतीही बँक तुम्हाला कमी व्याजाने लोन देण्यास तयार होईल. कारण की, बँकेला तुमच्या सातत्यपणाची झलक तुमच्या सिबिल आणि क्रेडिट स्कोरमधूनच दिसते. तुम्ही बँकेला विश्वासहार्य व्यक्ती वाटू शकता. त्यामुळे तुम्हाला कमी व्याजदरानुसार लोन मिळण्याची शक्यता वाढेल.

बँक बॅलन्स ट्रान्सफरचे फायदे आणि नुकसान :

1) फायदे

बँक बॅलन्स ट्रान्सफर तुम्हाला अनेक सुविधा प्रदान करते. यामध्ये तुम्ही तुमचं रिनिंग लोन अगदी कोणत्याही बँकेमध्ये सहजरीत्या ट्रान्सफर करू शकता. ज्या बँकेमध्ये कमी व्याजदर आकारले जाते तिथे तुम्ही तुमचा बॅलन्स ट्रान्सफर करून घेऊ शकता. एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या ईएमआय भरण्याचा टाईम पिरियड देखील वाढवून घेऊ शकता. समजा तुम्ही तुमचा ईएमआय भरण्यासाठीचा टाईम पिरियड वाढवला तर, तुम्हाला कमी ईएमआय देखील भरावा लागू शकतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बँका व्यक्तींना कमी व्याजदर प्रदान करतात तिथून ग्राहकांना टॉप अपची सुविधा देखील प्रदान करतात. टॉपअप सुविधामध्ये कोणत्याही व्यक्तीची लोन घेण्याची क्षमता वाढते.

2) नुकसान

आपण आतापर्यंत बॅलन्स ट्रान्सफरच्या फायद्याबद्दलच ऐकलं. परंतु बॅलन्स ट्रान्सफर करण्याचे काही नुकसान देखील आहेत. तुम्ही ज्या बँकेतून लोन ट्रान्सफर करत असाल किंवा तुमचा बॅलन्स ट्रान्सफर करत असाल त्या बँकेला तुम्हाला फोरक्लोजर फी द्यावी लागेल. त्याचबरोबर लोन ट्रान्सफर करण्याची फी देखील द्यावी लागेल. त्याचबरोबर ज्या बँकेमध्ये तुम्ही लोन किंवा तुमचा बॅलन्स ट्रान्सफर करत असाल त्या बँकेला लोन प्रोसेसिंग फीसह स्पॅम्प ड्युटी आणि इतरही फी द्यावी लागते. त्यामुळे तुमचे थोड्याफार प्रमाणात नुकसान देखील होऊ शकते.

Latest Marathi News | Personal Loan EMI 30 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Personal Loan EMI(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x