
Property Issue | भारतीय राज्यघटनेनुसार भारतात राहणाऱ्या प्रत्येक रहिवासी कायद्यासमोर अगदी समान पातळीवर उभा असतो. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे असे मूलभूत अधिकार दिले गेले आहेत ज्याचे उल्लंघन कोणताही व्यक्ती करू शकत नाही. दरम्यान सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध कायदे केले आहेत. प्रत्येक महिलेला योग्य न्याय मिळावा यासाठी आपले प्रशासन कायम सज्ज असते.
यामध्ये असा प्रश्न अनेक महिलांना पडलेला असतो तो म्हणजे पतीच्या निधनानंतर त्याच्या दुसऱ्या पत्नीला आणि तिच्या मुलाला प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार मिळतो का. आज आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या लेखातून देणार आहोत. चला तर वेळ न दवडता जाणून घेऊया काही महत्त्वाच्या गोष्टी.
पतीच्या दुसऱ्या पत्नीचे आणि त्यांच्या मुलाचे मालमत्तेवरील अधिकार जाणून घ्या :
बऱ्याचदा अजागृततेअभावी महिलांना त्यांच्या हक्कांविषयी आणि कायद्याविषयी फारशी माहिती नसते. अशातच मालमत्तेचे विभाजन हा विषयाला की अनेक महिला गांगरून जातात. आता तसं होणार नाही तुम्हाला तुमचा हक्क अगदी ठामपणे बजावता येणार आहे. पतीच्या संपत्तीवर त्याचे कुटुंब तसेच दुसरी पत्नी आणि तिचा मुलगा अगदी सहजपणे हक्क सांगू शकतो.
बऱ्याचदा आपण अशा केसेस पाहिले असतील ज्यामध्ये एका पुरुषाने दोन महिलांसोबत लग्न केलेलं असतं. अशा परिस्थितीत मालमत्ता विभाजनासाठी मोठ मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. दुसरी पत्नी पतीच्या मालमत्तेवर कोणत्या पद्धतीने दावा करू शकते जाणून घ्या.
कायदेशीर लग्न महत्त्वाचे आहे की नाही :
आज अनेकांच्या प्रश्नांचे निरासरन होणार आहे. समजा दुसऱ्या पत्नीचं लग्न कायद्याप्रमाणे वैध नसेल तर ती पतीच्या किंवा त्याच्या वडीलोपार्जित मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही. समजा पतीने मृत्युपत्रामध्ये दुसऱ्या पत्नीचं किंवा दुसऱ्या पत्नीकडून झालेल्या मुलाचं नाव लिहिलं असेल तरच ते दोघं मालमत्तेशी जोडले जाऊ शकतात. समजा पतीने दुसऱ्या पत्नीचे नाव कायदेशीररित्या लिहिलं नसेल तर, त्याच्या वारसांमध्ये त्याची मालमत्ता समान वाटली जाईल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























