21 April 2025 5:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
x

Property Knowledge | घर खरेदी करत असाल तर 'या' 9 टिप्स फॉलो करा, होईल 3 ते 4 लाखांची बचत - Marathi News

Highlights:

  • Property Knowledge
  • चांगल्या बँकेची निवड करा :
  • बांधकामाधिन घर निवडा :
  • प्रॉपर्टी डील करण्याआधी करा हे काम :
  • बिल्डरची खात्री करून घ्या :
  • सणासुदीच्या काळात फायदा अनुभवा :
  • विकासक देईल अतिरिक्त सवलत :
  • घर खरेदी करण्याआधी बजेट महत्त्वाचा :
  • थेट घरमालकाबरोबर चर्चा करायची असेल तर ही गोष्ट करा :
  • थेट विक्रेत्याकडूनच घर खरेदी करता येईल असा प्रयत्न करा :
Property Knowledge

Property Knowledge | आपल्यामधील प्रत्येक व्यक्तीला घर खरेदी करण्यासाठी चांगल्या व्याजदराची गरज असते. प्रत्येकजण कमी टक्के व्याजदराने चांगलं लोन मिळवू इच्छितो. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपलं देखील स्वतःच हक्काचं घर असावं. यासाठी अनेक लोक दिवस-रात्र एक करतात. परंतु रियल इस्टेट क्षेत्रात काही व्यक्ती फसवणुकीमध्ये गुंततात आणि स्वतःचे नुकसान करून घेतात. तसं पाहायला गेलं तर, कोरोना महामारीनंतर रियल इस्टेट क्षेत्र मंदावलेलं आहे. रियल्टी विक्रीचे प्रमाण चक्क 8 टक्क्यांनी घसरलेले आहे. त्यामुळे मालमत्ता खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी येणारा काळ उपकारक ठरणार आहे.

तुम्हाला सुद्धा स्वतःचं घर खरेदी करायचं असेल किंवा एखादी मालमत्ता खरेदी करायची असेल तर तुम्ही काही गोष्टींचं पालन करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला आम्ही सांगितलेल्या 9 टिप्स फॉलो करायचे आहेत. या टिप्स फॉलो करून तुम्ही जास्तीत जास्त 3 ते 4 लाख रुपयांची बचत देखील करू शकता.

1) चांगल्या बँकेची निवड करा :
गृहकर्ज घेण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम चांगल्या बँकेची निवड केली पाहिजे. यासाठी तुम्हाला सर्व बँकांची व्याजदरे तपासून घ्यावी लागतील. तरच तुम्हाला तुमच्या बजेटमधील बँक सहजरीत्या सापडेल.

2) बांधकामाधिन घर निवडा :
तुम्ही एखादी तयार प्रॉपर्टी विकत घेण्याचा विचार करता तेव्हा तुम्हाला ती प्रॉपर्टी महाग वाटू शकते. परंतु तुम्ही प्रॉपर्टीचे बांधकाम सुरू असतानाच खरेदी करण्याचा विचार केला तर, तुमचे थोडेफार पैसे वाचू शकतात.

3) प्रॉपर्टी डील करण्याआधी करा हे काम :
बऱ्याच व्यक्ती प्रॉपर्टी डीलमध्ये मार खातात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात. तुम्ही प्रॉपर्टी डील करताना त्या भागातील सर्व व्यक्तींना भेटलं पाहिजे. त्याचबरोबर प्रॉपर्टीच्या सरासरी दरांची माहिती देखील घेतली पाहिजे. सर्व गोष्टींची तपासणी केल्यानंतर बिल्डरबरोबर डील पूर्ण करण्यास सोपे जाईल.

4) बिल्डरची खात्री करून घ्या :
तुम्ही गृहप्रकल्पात एखादी मालमत्ता खरेदी करत असाल तर, तुम्ही निवडलेल्या बिल्डरने कायदेशीररित्या सर्व गोष्टींच्या परवानग्या मिळवल्या आहेत की नाही हे चेक करा.

5) सणासुदीच्या काळात फायदा अनुभवा :
बरेच बिल्डर्स, डेव्हलपर आणि विक्रेते सणासुदींच्या वेळी मालमत्ता खरेदीदारांसाठी चांगल्या ऑफर घेऊन येतात. या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही तुमची थोडीफार रक्कम वाचू शकता.

6) विकासक देईल अतिरिक्त सवलत :
समजा तुम्ही एकाच गृहप्रकल्पात ग्रुपने म्हणजेच तीन किंवा चार जणांनी घर विकत घेण्याचा विचार केला असेल तर, त्यांना विकासकाकडून अतिरिक्त सवलती मिळतात. या सवलतींचा लाभ तुम्ही घेऊ शकता.

7) घर खरेदी करण्याआधी बजेट महत्त्वाचा :
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर खरेदी करण्याआधी तुम्ही तुमचा बजेट ठरवला पाहिजे. उगाच सगळे घेत आहेत म्हणून फ्लॅट आणि मोठ्या घराच्या मोहात पडण्याची चूक करू नका. आपल्या बजेटनुसार घर खरेदी करण्याचा विचार करा. नाहीतर काही कारणांमुळे तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता ओढावते.

8) थेट घरमालकाबरोबर चर्चा करायची असेल तर ही गोष्ट करा :
घर खरेदी करत असताना त्या एरियामधील आजूबाजूच्या व्यक्तींबरोबर आणि शेजारच्यांबरोबर संवाद साधा. शेजारचे व्यक्ती तुम्हाला घर विक्री करण्यासाठीचे मार्ग आणि सल्ले देऊ शकतात. त्याचबरोबर अमुक-तमुक जागा उपलब्ध आहेत अशी माहिती देखील देऊ शकतात. त्यानंतर तुम्ही थेट घरमालकाबरोबर संवाद साधून मालमत्तेचा करार करू शकता.

9) थेट विक्रेत्याकडूनच घर खरेदी करता येईल असा प्रयत्न करा :
मालमत्तेच्या बाबतीत बरेच एजंट एक ते दीड टक्के कमिशन घेतात. परंतु काहींची परिस्थिती नाजूक असल्याकारणाने ते एजंटला पैसे देऊ शकत नाहीत. त्यामुळे विक्रेत्याकडून आणि विकासाकाकडून घर खरेदी करता येईल असं नियोजन करा. नाहीतर तुम्हाला एजंटला फुकटचे पैसे द्यावे लागतील.

Latest Marathi News | Property Knowledge 30 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Property Knowledge(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या