26 December 2024 12:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News

Property Knowledge

Property Knowledge | नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून असं समोर आले आहे की भारतातील बहुतांश व्यक्ती सर्वाधिक गुंतवणूक मालमत्ता खरेदीमध्ये करतात. मालमत्ता म्हणजेच घर, मोठा प्लॉट किंवा एखादा फ्लॅट खरेदी करण्यासाठी मोठी रीस्क घ्यावी लागते. कारण की, मालमत्तेत गेलेली गुंतवणूक ही सर्वसाधारण नसते.

आपण गाडी, घरातील शोभेच्या महागड्या वस्तू, सोने, चांदी या गोष्टींमध्ये गुंतवणूक तर करतोच परंतु एक गुंतवणूक अधिक दीर्घकाळाची किंवा जास्त जोखीमेची नसते. त्यामुळे कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याआधी तुम्ही सर्व गोष्टींची पडताळणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही सुद्धा नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आम्ही सांगितलेल्या या पाच गोष्टी मुख्य गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

1. कोणत्याही प्रकारची मालमत्ता किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याआधी तुम्हाला प्रॉपर्टीच्या आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्तींची भेट घेतली पाहिजे. त्याचबरोबर संबंधित दलालाशी मालमत्तेविषयीच्या सर्व गोष्टींची चर्चा करून घ्या. सणासुदींच्या काळामध्ये इतर गोष्टीप्रमाणे मानमत्ता खरेदीवर देखील ऑफर सुरू असतात. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सतत ऍक्टिव्ह राहणे गरजेचे आहे आणि विविध ऑफर्स शोधण्याची देखील गरज आहे.

2. सर्वप्रथम तुम्ही घर खरेदी करण्यासाठी जी मालमत्ता पाहिली आहे ती तुमच्या बजेटमध्ये बसत आहे की नाही याची जाचपडताळणी करा. बऱ्याचदा लोक बजेटमध्ये नसले तरी सुद्धा घर खरेदी करतात. परंतु ही चूक तुम्हाला नंतर महागात पडू शकते. यामध्ये तुमच्यावर कर्जबाजारी होण्याची शक्यता ओढाऊ होऊ शकते. त्याचबरोबर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधण्याऐवजी घरातील भाऊबंद, शेजारी त्याचबरोबर मालवत्त्याची खरेदी करणारा एरिया, तेथील लोकवस्तीशी थेट संपर्क साधा आणि मगच घरमालकाबरोबर मालमत्तेचा व्यवस्थित करार करून घ्या.

3. घर विकणारा मालक आणि खरेदी करणाऱ्या व्यक्तीमध्ये व्यवहार चोख असला पाहिजे. समजा या दोन महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये व्यवस्थित करार झाला तर, तुमची कमिशनची भली मोठी रक्कम वाचू शकते. म्हणजेच तुम्हाला 5% ची सूट मिळून फायदा होईल. त्याचबरोबर तुम्ही गृहप्रकल्पात मालमत्ता खरेदी केली असेल तर, आणखीनच उत्तम परंतु तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे कायदेशीररित्या परवानगी घ्यावी लागेल.

4. तुम्ही आतापर्यंत ही गोष्ट नक्कीच पाहिली असेल की, बांधकामाधिन घरांपेक्षा तयार घरे महाग असतात. तुम्हाला लाखो रुपयांची बचत करायची असेल तर तुम्ही बांधकामाधीन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. जेणेकरून तुमचे भरपूर पैसे वाचतील आणि तुम्हाला हव्या तशा जागेवर घर खरेदी करता येईल.

5. त्याचबरोबर तुम्ही पैसे देताना एक रक्कमी पैसे देण्यास प्राधान्य द्या. असं केल्याने तुम्हाला जास्तीत जास्त सूट मिळण्यास मदत होईल. म्हणजे तुम्हाला कमी किमतीत घर खरेदी करण्यास सोपे जाईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Property Knowledge Benefits 10 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Property Knowledge(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x