22 February 2025 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात
x

Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा

Property Knowledge

Property Knowledge | एखादा सर्वसामान्य व्यक्तीसाठी मालमत्ता खरेदी करणे किंवा भविष्यासाठी एखादी जमीन किंवा एखादा प्लॉट खरेदी करून ठेवणे हे एका मोठ्या गुंतवणुकीपेक्षा कमी नाही. परंतु आजकालच्या मालमत्ता घोटाळा प्रकरणांमुळे आणि खोट्या कागदपत्रांमुळे बरेचजण फसवेपणाला बळी पडतात आणि स्वतःचे लाखोंचे नुकसान करून घेतात.

एखादी मालमत्ता खरेदी करणे ही एक मोठी डील आहे त्यामुळे तुम्हाला अगदी विचारपूर्वक आणि तल्लक बुद्धीनेच गोष्टी हाताळाव्या लागतील. सध्याच्या काळात या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण की, दर दोन दिवसांनी मालमत्ते संबंधित फसवणुकीच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर तुम्ही एखादा फ्लॅट किंवा एखादी मालमत्ता त्याचबरोबर एखादी जमीन खरेदी करत असाल तर, जमिनीच्या संपूर्ण कागदपत्रांसह नकाशा, रजिस्ट्री, एनओसी, टायटल डिड, बेनामा आणि भार प्रमाणपत्र या कागदपत्रांसह इतरही महत्त्वाचे कागदपत्र गरजेचे आहेत.

अशा पद्धतीने प्रॉपर्टी डील करताना फसवणूक टाळता येऊ शकते :

1. तुम्ही ज्या व्यक्तीकडून मालमत्ता खरेदी करत आहात त्याने वर सांगितल्याप्रमाणे एखादं कागदपत्र दाखविण्यास स्पष्टपणे नकार दिला तर समजून जा की तुम्ही खरेदी करत असणाऱ्या मालमत्तेमध्ये कोणत्यातरी प्रकारचा घोळ आहे.

2. नोंदणी करताना समोरील अधिकारी तुमच्या मालमत्तेची सर्व कागदपत्रे अगदी व्यवस्थितपणे तपासतात. अशावेळी करारामधील नावामध्ये एखादी चूक आढळल्यास ती दुरुस्त करण्यास सांगितली जाते. अशावेळी तुमच्यासमोर सर्वकाही उघड होऊन जाते. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने नाव लिहून प्रॉपर्टी विकणाऱ्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका.

3. घर किंवा एखादी मालमत्ता खरेदी करताना तुमच्याजवळ युटीलिटी प्रमाणपत्र असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण की या कागदपत्रांमध्ये विज बिल, पाणी बिल, रस्ते त्याचबरोबर यांसारख्या विविध गोष्टीचा समावेश असतो.

4. मालमत्ता खरेदी करताना पजेशन प्रमाणपत्र देखील अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हे प्रमाणपत्र बिल्डरने खरेदी दाराच्या नावाने जारी केला जातो.

5. त्यानंतर पुढील कागदपत्र म्हणजे एनओसी. एनओसी हे एक असं प्रमाणपत्र आहे जे हे दर्शवण्याचे काम करतो की तुमच्या जमिनीवर कोणत्याच व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचा दावा केला नाहीये. किंवा तुम्ही घर विक्रीला किंवा खरेदी करण्यासाठी कोणाचीच हरकत नाहीये.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Property Knowledge Saturday 04 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Property Knowledge(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x