16 April 2025 10:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Property Rights | लग्नानंतर सुनेला पतीची अर्धी संपत्ती आणि सासरच्या घराच्या प्रॉपर्टीत हक्क मिळतो का, लक्षात ठेवा नियम - Marathi News

Property Rights

Property Rights | प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यात दोन हक्काची घर लाभतात. एक म्हणजे लहानाची मोठी झालेलं घर म्हणजेच माहेर आणि दुसरं घर म्हणजे सासर. लग्न होऊन सासरी आल्यानंतर अगदी रेशन कार्डपासून ते लाईट बिलच्या कागदपत्रांवर घरामधील नवीन सदस्याचे नाव टाकावे लागते. अशाप्रकारे अनेकांना असा देखील प्रश्न पडलेला असतो की, मुलगी सासरी आल्यानंतर तिचे नाव प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर ऍड केले जाते की नाही. आज आपण या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

बऱ्याचदा महिलांना सामाजिकदृष्ट्या बंधनांमध्ये अडकवले जातात. परंतु कायदेशीरदृष्ट्या महिलांना बरेच अधिकार लाभले आहेत. आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की, लग्न झाल्यानंतर स्त्रियांना पतीच्या संपत्तीत अधिकार मिळतो की नाही. संपत्तीसाठी पत्नी देखील तितकीच हकदार असते का या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊ.

जाणून घ्या महिलांसाठी ते महत्त्वाचे कायदे :

महिलांसाठी काही ठोस कायदे बनवले आहेत. ज्यामध्ये हिंदू उत्तराधिकरी कायदा, भारतीय उत्तराधिकार कायदा आणि मुस्लिम वैयक्तिक कायदा या कायद्यांतर्गत मालमत्तेचा वारसा ठरवण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली जाते. सांगितलेल्या कायद्याप्रमाणे केवळ लग्न झाल्यानंतर स्त्रीला पतीच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळत नाही तर ही गोष्ट पूर्णपणे परिस्थितीवर अवलंबून असते.

पतीच्या प्रॉपर्टीवर पत्नीचा हक्क :

भारतीय कायद्यानुसार पतीच्या संपत्ती पत्नीला तोपर्यंत हक्क नसतो जोपर्यंत पती निधन पावत नाही. म्हणजेच पती जिवंत असताना पतीच्या प्रॉपर्टीत पत्नीला हक्क नाही. पतीच्या मृत्यूनंतरच पत्नी त्याच्या मालमत्तेची हक्कदार बनते. ते सुद्धा पतीने मरण्यापूर्वी इच्छापत्र लिहून ठेवल्यानंतरच. त्याचबरोबर दोघांमध्ये घटस्फोट किंवा दोघेही एकमेकांपासून विभक्त झाल्यास महिलेला पतीकडून पोटगी मिळवण्याचा पूर्णपणे अधिकार असतो. विभक्त म्हणजेच दोघेही एकमेकांपासून कायदेशीररित्या वेगळे झाल्यानंतर पत्नी पतीच्या संपत्तीवर हक्क सांगू शकत नाही.

त्याचबरोबर कायद्यानुसार सुनेला सासर्याच्या किंवा पतीच्या वडीलोपार्जित संपत्तीत पती किंवा सासरे जिवंत असेपर्यंत हक्क सांगता येत नाही. दरम्यान पतीच्या मृत्यूनंतरच मालमत्तेत हक्क मिळू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Property Rights 11 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Property Rights(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या