10 January 2025 3:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी

Property Tax Alert

Property Tax Alert | संपत्ती कर नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी भरला जातो त्याचबरोबर संपत्ती कर भरण्याचे नेमके कारण काय ही आणि अशा बऱ्याच प्रकारचे प्रश्न लोकांना पडलेले असतात. तसं पाहायला गेलं तर, तुमच्या संपत्तीवर विविध प्रकारचे कर आकारले जात असतात. यापैकी संपत्ती करार म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स. तुम्ही ज्या रिअल इस्टेटमध्ये राहत आहात यामध्ये घर, बंगला, तुमची जमीन किंवा दुकान यासारख्या मालमत्तांचा समावेश होतो.

कोणकोणत्या गोष्टींवर प्रॉपर्टी टॅक्स घेतले जातात :

प्रॉपर्टी टॅक्स हे वेगवेगळ्या राज्यांप्रमाणे आधारित असते. कोणत्याही प्रकारचे संपत्ती कर लावण्याआधी मालमत्तेचे निरासरण आणि मूल्यांकन केले जाते. याचे विविध कारणे असू शकतात. मोठमोठ्या आणि चांगल्या सोसायटीमधील शहरी भागांकडे घरमालकांकडून घसघशीत संपत्ती कर वसुलला जातो. त्याचबरोबर वाणिज्य आणि कमर्शियल आवासिय भागांत येणाऱ्या संपत्तीवर देखील वेगवेगळ्या पद्धतीचे संपत्ती कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स लावले जातात.

प्रॉपर्टी टॅक्स घेण्याचे नेमके कारण काय :

बऱ्याच व्यक्तींना असा प्रश्न पडलेला असतो की प्रत्येक नागरिकाकडून संपत्ती कर का म्हणून वसूलला जातो. तर, ज्या व्यक्ती अमुकमुक एरियामध्ये कायम स्थायिक असतात त्या व्यक्तीकडून संपत्ती कर घेतले जातात. यामध्ये त्या भागात राहत असणाऱ्या क्षेत्रातील रस्ते बनवण्याचं काम, तुटलेल्या आणि फुटलेल्या रस्त्यांना डागडुजी करण्याचे काम, सीवरेज सिस्टम मेंटेनेस, शाळा, एरिया जवळ असणारी कार्यालय, नवीन शाळा किंवा इतरही कोणत्या वास्तू बांधण्यासाठी लागणारे पैसे स्थानिकांकडून मिळणाऱ्या संपत्ती टॅक्सद्वारे पूर्ण केले जाते.

प्रॉपर्टी कॅल्क्युलेशन कोणत्या आधारावर केले जाते :

बऱ्याच व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक नसते ती म्हणजे प्रॉपर्टी कॅल्क्युलेशन कोणत्या गोष्टीच्या आधारे केले जाते. प्रॉपर्टी कॅल्क्युलेशन कसे करायचे हे पूर्णतः सरकार ठरवते. सरकारने ठरवल्याप्रमाणे बाजार मूल्याच्या आधारावर संपत्ती कर गणना केली जाते.

या गणनेमध्ये युनिट एरिया व्हॅल्यू सिस्टम, रेटेबल व्हॅल्यू सिस्टम, कॅपिटल व्हॅल्यू सिस्टम संपत्ती कराचे मूल्यांकन करताना या गोष्टी देखील महत्त्वाच्या.

प्रॉपर्टी टॅक्सच्या पेमेंटविषयी जाणून घ्या :

1. कोणत्याही प्रकारचे संपत्ती कर असेल ते वार्षिक आधारावरच केले जाते. प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी आपल्याला जवळील नगरपालिकेत जाऊन पेमेंट करावे लागते.

2. पेमेंट करण्यासाठी तुमच्याजवळ संपत्ती कर संस्था खाता संस्था या दोघांपैकी एक असणे गरजेचे आहे. तुम्ही नगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवरून देखील ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करू शकता.

3. संपत्ती कर भरताना नगरपालिकेकडून घरमालकाचे वय, तुमच्या संपत्तीचा प्रकार आणि इतर गोष्टी पाहून तुमच्या संपत्ती करावर टॅक्स सूट देखील देऊ शकते. टॅक्स भरण्यास उशीर केला तर, तुमच्याकडून योग्य ती पेनल्टी घेतली जाईल. अशा परिस्थितीत तुमची प्रॉपर्टी जप्त देखील केली जाऊ शकते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Property Tax Alert Thursday 09 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Property Tax Alert(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x