25 October 2024 1:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GG Engineering Share Price | शेअर प्राईस 1 रुपया 90 पैसे, स्टॉक खरेदीला गर्दी, कंपनी नफा 1422% वाढला - Penny Stocks Jio Finance Share Price | संधी सोडू नका, जिओ फायनान्शियल शेअर देणार मोठा परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Horoscope Today | व्यवसायात बरकतीचा योग तसेच, 'या' राशींच्या पुरूषांना होईल धनलाभ, वाचा तुमचे आजचे राशीभविष्य Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर Dimple Kapadia | अभिनेत्री डिंपल कपाडियाने स्वतःच्याच लेकीचा केला अपमान, म्हणाली, 'मी कोणत्याही ज्युनिअरसोबत पोज देत नाही' Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
x

Rent Agreement | भाडेकरार करताना 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या, कधीही फसवणूक होणार नाही, संप्पती टिकून राहील

Rent Agreement

Rent Agreement | स्वप्नांची नगरी मुंबई. या मुंबईमध्ये अनेकांचे स्वतःचे घर आहे. तर, 90% टक्क्यांमधील 50% टक्के लोक हे भाड्याच्या घरात राहणं पसंत करतात. काहीजण शिक्षणासाठी तर काहीजण ग्रामीण भागातून शहरांमध्ये स्थलांतरित होण्यासाठी येतात. आल्याबरोबर सर्वप्रथम ते भाड्याने राहणे पसंत करतात. जेणेकरून जागा, एरिया, लोक आणि तेथील वस्तीचा थोडाफार अंदाज येतो. तुम्ही घरमालक असाल किंवा भाडेकरू. भाडेकरार हा भाडेकरूएवढाच घरमालिकासाठी देखील महत्त्वाचा आहे.

1. बरेच व्यक्ती व्यवस्थित भाडेकरार करत नाहीत आणि नंतर तक्रार करतात. त्याचबरोबर काही अनधिकृत गोष्टी देखील घडण्याची शक्यता असते त्यामुळे दोन्ही पार्टींनी भाड्याचा करार केलाच पाहिजे.

2. भाडेकरार करताना तुम्ही सर्वप्रथम तुमचे भाडे किती वर्षानंतर वाढणार आहे या गोष्टीची माहिती घेतली पाहिजे. त्याचबरोबर सर्व गोष्टींची पूर्तता कागदावर केली पाहिजे. बरेच भाडेकरू आणि मालक एकाच भाडेकरूला 4 ते 5 वर्षांसाठी राहण्यास परवानगी देतात. तर एकीकडे काही घरमालक केवळ 11 महिन्यांसाठी राहण्याची परवानगी देतात. तर, सर्व गोष्टींची पूर्तता आधीच करून घ्या.

3. भाडेकरारात नोटीस कालावधी नमूद केलेले असणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा भाडेकरू किंवा घरमालकाकडून भाडेकरार रद्द होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही आधीच सावधानी पत्करली पाहिजे.

4 एकदा भाड्याने राहायला सुरुवात केली की, भाडेकरू इतर कोणालाही भाड्याने खोली राहण्यास देऊ शकत नाही. त्याचबरोबर भाडेकरू ज्या सोसायटीमध्ये राहण्यास जाणार असेल तिथे, पाळीव प्राणी, पार्किंग त्याचबरोबर इतर सुविधा आहेत की नाही या सर्व गोष्टींची माहिती आधीच घेणे गरजेचे आहे.

5. बऱ्याचदा रेंटल रूम ही फुल्ली फर्निश्ड किंवा सेमी फर्निश्ड असलेली पाहायला मिळते. अशावेळी भाडेकरारात रूमच्या फर्निचर बद्दल आणि घरातील सुविधांबद्दल सर्व माहिती नमूद असणे अत्यंत गरजेचे आहे.

6. घरमालक तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित सांगत नसेल किंवा भाडेकरारात नमूद करण्यास नकार देत असेल तर, ती जागा तुमच्यासाठी धोक्याची ठरू शकते. सावधानी पत्करूनच सर्व गोष्टींची काळजी घ्या.

7. सध्या मुंबई सारख्या शहरी ठिकाणांमध्ये भाड्याने घर घेऊन राहणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. त्यामुळे या सगळ्यांमध्ये आपली गल्लत होता कामा नये आणि आपण कोणत्याही ठिकाणी फसले जाऊ नये याची खास काळजी घेणे गरजेचे आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Rent Agreement 25 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Rent Agreement(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x