4 January 2025 11:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, जबरदस्त फंड, रु.9000 एसआयपी वर मिळेल 35 लाखांहून अधिक परतावा EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी मोठी अपडेट, मिळणार नवीन ATM कार्ड, EPF चे पैसे सहज काढता येणार Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई करा, रेकॉर्ड तारीख नोट करा Personal Loan | कर्जदारांसाठी अलर्ट, आता दर 15 दिवसांनी तुमचा क्रेडिट रेकॉर्ड तपासाला जाणार, हा फायदा देखील होईल
x

Rent Agreement | भाडेकरार करताना 'या' गोष्टींची घ्या खास काळजी, नाहीतर रस्त्यावर राहण्याची वेळ येईल, संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या

Rent Agreement

Rent Agreement | शहरी भागांकडे भाड्याने घर घेऊन राहण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. बहुतांश व्यक्ती शिक्षणासाठी तर, काही व्यक्ती नोकरीसाठी शहरी भागांमध्ये छोट्या मोठ्या ठिकाणी भाड्याची खोली घेऊन राहतात. कारण की मुंबईसारख्या शहरी भागांमध्ये लगेचच पैसे देऊन घर खरेदी करणे शक्य नाही.

भाड्याने घर घेऊन राहणाऱ्या व्यक्तींसाठी घरमालक रीतसर भाडेकरार करून घेतात. बहुतांश घर मालक किंवा भाडेकर फसवे निघू शकतात. त्यामुळे बहुतांश भाडेकरू आणि घरमालक भाडेकरार करूनच घर भाड्याने देतात. भाडेकरारमध्ये तुम्ही कितीपर्यंत भाडं ठरवलं आहे, त्याचबरोबर तुम्ही कोणत्या तारखेला भाडे घरमालकाला देणार आणि एग्रीमेंट वेळ या सर्व गोष्टी नमूद असतात. त्याचबरोबर आणखीनही काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत ज्या भाडेकरारात केल्या जातात. आज आम्ही तुम्हाला सर्व गोष्टींबद्दल सांगणार आहोत.

तुम्हाला तोंडी सांगितलेली माहिती भाडेकरारात नमूद आहे की नाही हे तपासा :

तुम्ही ज्यावेळी भाड्याने घर शोधता त्यावेळी घर मालकाकडून भाड्याच्या घरात उपलब्ध असणाऱ्या सर्व सुख सोयींबद्दल सांगण्यात येते. ज्यामध्ये लाईट बिलपासून ते, पाणी, किराणा स्टोअर, रिक्षा स्टॅन, हॉस्पिटल आणि हाकेच्या अंतरावर असलेल्या गरजेच्या वस्तू या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. त्यामुळे भाडेकरार करताना या सर्व गोष्टी तुमच्या भाडेकरारामध्ये नमूद केल्या आहेत की नाही हे तपासून पहा. यामध्ये पार्किंग चार्जेस देखील समाविष्ट असतात.

एग्रीमेंटची टाईम लाईन :

तुम्ही भाड्याने किती वर्षांसाठी घर घेतलं आहे किंवा घरमालकाने भाडेकरूला किती वर्षांसाठी घर भाड्याने दिले आहे याचा एक टाईम लाईन निश्चित असतो. तो तुम्ही तोंडी बोलला असाल आणि भाडेकरार नमूद करण्यात विसरला असाल तर, तुमच्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ नक्कीच येऊ शकते. तुम्ही भाडेकरू असाल आणि तुमची एग्रीमेंट टाईम लाईन निश्चित नसेल तर, सर्वप्रथम ही गोष्ट पूर्ण करून घ्या. भाडेकराराचे टाईम लाईन ही तीन ते पाच वर्षांपर्यंत उपलब्ध असू शकते.

नोटीस किंवा लॉक इन टाईम :

काही गोष्टींमुळे घर मालक आणि भाडेकरू दोघांमध्ये काही कारणास्तव वेळ पूर्ण होण्याआधीच भाडेकरार मोडला जाऊ शकतो. अशावेळी तुम्ही नोटीस किंवा लॉक इन टाईम सर्टिफिकेट घेणे अत्यंत गरजेचे. सहसा नोटीस एक महिन्याची असू शकते. नोटीस टाईम दोन्ही पक्षांवर समान कालावधीनुसार लागू केल्या जातो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Rent Agreement Thursday 02 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Rent Agreement(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x