16 April 2025 8:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल

Rent Agreement

Rent Agreement | मुंबईसारख्या शहरांमध्ये अलीकडच्या काळात भाडे भरून राहणाऱ्या व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ज्या पद्धतीने नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी शहरी भागांत लोकसंख्या वाढत चालली आहे त्याच वेगाने भाड्यासंबंधीत फ्रॉड केसेस देखील झपाट्याने वाढत चालल्या आहेत.

तुम्ही देखील भाड्याने रूम घेऊन राहण्याचा विचार करत असाल तर, भाडेकरार हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज तयार करण्यास विसरू नका. आज आम्ही तुम्हाला भाडे करारसंबंधी काही कलमे सांगणार आहोत. ज्यांच्यामुळे तुम्हाला भाडं घेताना किंवा देताना कोणत्याही प्रकारचा त्रास संभावणार नाही.

सुरक्षा ठेव :
भाडेकरार करताना सर्वात महत्त्वाची आणि पहिली केली जाणारी स्टेप म्हणजे सुरक्षा ठेव ज्याला आपण सिक्युरिटी डिपॉझिट असं देखील म्हणतो. सिक्युरिटी डिपॉझिट प्रत्येकच घर मालक आपल्या भाडेकरूकडून घेतो. समजा एखाद्या महिन्याला भाडेकरूने घर भाडे दिलेच नाही तर, त्याच्या सिक्युरिटी डिपॉझिटमधील रक्कम कापली जाते. या संपूर्ण गोष्टी भाडेकरारात नमूद केलेल्या असाव्या. त्याचबरोबर भाडेकरूने देखील मालकाची खोली सोडताना आपले डिपॉझिट परत घ्यावे. या सर्व गोष्टी करारात नमूद असाव्या.

घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंची संपूर्ण यादी नमूद असावी :
तुम्ही भाड्याने रूम घेण्याचा विचार करत असाल आणि भाडेकरार करत असाल तर, भाडेकरारात घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व वस्तूंची आणि सामानांची यादी मालकाकडून घेण्यास विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला घरात कोण कोणत्या सुख सुविधा आहेत जसं की, बाथरूममध्ये गिझर, घरामध्ये पंखे आणि इतर कोणत्याही गोष्टी असतील तर त्याची यादी तुमच्या भाडेकरारामध्ये नमूद असणे महत्त्वाचे आहे.

थकबाकी नको :
भाड्याने रूम घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही राहणाऱ्या घरावर कोणत्याही प्रकारची थकबाकी तर नाही ना याची पूर्तता करा. थकबाकी म्हणजेच विजेचे बिल, सोसायटी बिल किंवा घरासंबंधी कोणत्याही प्रकारचे पेमेंट बाकी तर नाही ना या सर्व गोष्टींची माहिती आधीच घरमालकाकडून घ्या.

भाडेकरारची किंमत :
घरमालक आणि भाडेकरू घराची देवाण-घेवाण करताना जेव्हा भाडेकरार करतात तेव्हा भाडेकराराची किंमत देखील मोजावी लागते. त्यामुळे भाडेकराराचा खर्च फोन उचलणार हे आधीच ठरवून ठेवा. बहुदा घरमालकच भाडेकरार करतो. परंतु काही ठिकाणी भाडेकरूकडून भाडेकरारची किंमत घेतली जाते.

मालमत्तेचा वापर :
मालमत्तेचा वापर म्हणजेच तुम्ही घर किंवा इतर कोणतीही जागा भाड्याने घेत असाल तर, तुम्ही ती जागा कोणत्या कारणासाठी घेत आहात या गोष्टीची पूर्तता तुम्हाला भाडेकरारात करावी लागते. त्यामुळे घर मालकाने देखील भाडेकरू नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी आपले घर किंवा आपली जागा भाड्याने घेत आहे याची सर्वप्रथम चौकशी करावी आणि मगच घर भाड्याने द्यावे.

सामान्य तोडफोड :
भाडेकरार करताना भाडेकरूने देखील काही गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे. ज्यामध्ये भाड्याची रूम दीर्घकाळासाठी राहण्याकरिता घेतली असेल तर, सामान्य तोडफोड किंवा झीज ही होणारच. त्यामुळे सामान्य झीज झाल्यानंतर भाडेकरू भरपाई करण्यास पात्र राहणार नाही. केवळ मोठ्या सामानांची तोडफोड झाल्यानंतरच भाडेकरू भरपाई करेल. अशा पद्धतीचं भाडेकरारात नमूद केलेलं असावं.

Latest Marathi News | Rent Agreement Wednesday 05 February 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rent Agreement(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या