24 December 2024 9:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

Salary Account Benefits | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट असेल तर 'या' गोष्टी माहित करून घ्या, फ्री मिळतात अनेक सुविधा

Salary Account Benefits

Salary Account Benefits | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे सॅलरी अकाउंट असतेच. त्याची सॅलरी थेट त्याच्या सॅलरी अकाउंटमध्ये जमा होते. सॅलरी अकाउंट हे केवळ नोकरी करणारा व्यक्ती उघडू शकतो. काही नोकऱ्यांमध्ये थेट कंपनीकडूनच कर्मचाऱ्याचे खाते उघडले जाते. या सॅलरी अकाउंट विशेष फायदे कर्मचाऱ्याला अनुभवायला मिळतात. या अकाउंटची सर्वात महत्त्वाची आणि फायद्याची गोष्ट म्हणजे हे अकाउंट झिरो बॅलन्स असते. आणखीन कोणकोणत्या सुविधा या अकाउंटमधून मिळतात पाहूया.

झिरो बॅलेन्स सुविधा :
नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्या सॅलरी अकाउंट असते. सॅलरी अकाउंटला बऱ्याच व्यक्ती झिरो बॅलन्स अकाउंट देखील म्हणतात. झिरो बॅलेन्स म्हणजे या खात्यामध्ये तुमचा झिरो बॅलन्स असेल तरीसुद्धा तुमचे पैसे कापले जात नाहीत.

कमीत कमी पैसे असण्याची अट नाही :
तुम्ही सॅलरी आणि सेविंग या दोन प्रकारच्या अकाउंटची नावे नक्कीच ऐकली असतील. सॅलरी अकाउंट हे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे असते. अशातच सर्वसामान्य व्यक्ती ज्या नोकरी करत नसतील अशा व्यक्ती सेविंग अकाउंट उघडू शकतात. सेविंग अकाउंटमध्ये कमीत कमी पैशांची लिमिट असते. परंतु सॅलरी अकाउंटमध्ये ही अट नाही.

ओव्हरड्राफ्ट सुविधा :
2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या सॅलरी अकाउंट वर तुम्हाला ओव्हरड्राफ्टची सुविधा देखील मिळते. ओवरड्राफ्ट सुविधाची लिमिट ही कर्मचाऱ्याच्या दोन महिन्यांच्या पगाराएवढी असते. ओवरड्राफ्ट सुविधेची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे खात्यात पैसे नसतील तरीसुद्धा तुम्हाला लिमिटपर्यंत पैसे काढता येणार आहेत.

फ्री एटीएम :
ज्या कर्मचाऱ्यांचे सॅलरी अकाउंट आहे त्यांच्या अकाउंटवर प्रायव्हेट सेक्टर त्याचबरोबर पब्लिक सेक्टरच्या अनेक बँकांकडून फ्री एटीएम सुविधा देण्यात येते. एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय बँक यांसारख्या अनेक बँका तुम्हाला फ्री एटीएम देतात. त्याचबरोबर फ्री एटीएमच्या सुविधेमध्ये तुमच्याकडून वार्षिक चार्ज घेतले जात नाहीत.

लोन सुविधा :
सॅलरी अकाउंटवर तुम्हाला कार लोन तसेच होम लोनवर स्पेशल ऑफर देखील मिळते. त्याचबरोबर सॅलरी अकाउंट वर तुम्हाला प्री-अप्रूव्ह लोन देखील मिळते. त्याचबरोबर सेविंग अकाउंटच्या तुलनेतच सॅलरी अकाउंटवर कमी व्याज परताव्याची सुविधा देखील देते.

मोफत पासबुक सुविधा :
सॅलरी अकाउंट असलेल्या बऱ्याच बँका मोफत पासबुक आणि चेकबुकची सुविधा देतात. याशिवाय इस्टेटमेंट आणि सॅलरी क्रेडिट झाल्यानंतर येणाऱ्या एसएमएस वर देखील कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही.

फ्री इन्शुरन्स :
ज्या व्यक्तीचं सॅलरी अकाउंट असेल आणि त्याचा अचानक मृत्यू झाला तर, त्याच्या नातेवाईका किंवा घरच्यांना 20 लाख रुपयांचा इन्शुरन्स मिळतो. ही सुविधा प्रत्येक बँकेमध्ये सॅलरी अकाउंट असलेल्या व्यक्तीला लागू होते. त्याचबरोबर एसपीआय बँक आपल्या ग्राहकाला तीस लाख रुपयांपर्यंत एक्सीडेंट इन्शुरन्स कव्हरची सुविधा देते.

ऑनलाइन ट्रांजेक्शन :
सॅलरी अकाउंट तुम्हाला ऑनलाइन ट्रांजेक्शनची सुविधा देते. यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन ट्रांजेक्शन करून लाभ मिळवू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Salary Account Benefits 03 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Salary Account Benefits(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x