26 December 2024 12:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON SBI Mutual Fund | पगारदारांनो बिनधास्त गुंतवणूक करा, महिना SIP वर मिळेल 1 कोटी 25 लाख रुपये परतावा IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर कमाई होईल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPCGREEN Bonus Share News | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला तुफान गर्दी - NSE: SURYAROSNI IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
x

Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या

Salary Management

Salary Management | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती बचतीचे मार्ग शोधत असतो. परंतु कौटुंबिक जीवन जगत असताना कौटुंबिक तसेच बाहेरील इतर खर्च प्रचंड प्रमाणात वाढलेले असतात. पगार हातामध्ये येताच सर्वात पहिले आपल्याला खर्च दिसतात. त्याचबरोबर कोणाची उधारी, इएमआय, मुलांच्या शाळेची फी, घरभाडे, लाईटबिल किंवा यासारख्या इतर अनेक गोष्टी डोळ्यापुढे येऊन उभ्या राहतात.

प्रत्येक व्यक्तीला खर्चाचं नियोजन करून बचत देखील करायची असते परंतु आधी सर्व खर्च पूर्ण केल्यानंतर शिल्लक फार कमी उरते. ज्यामध्ये आपण वरचा खर्च भागवू शकतो. परंतु असं कारण अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही जर वर्षानुवर्षे असंच नियोजन करत आला तर तुम्ही सॅलरी मॅनेजमेंट कधीही करू शकणार नाही. सेविंग करण्यासाठी नेमकं काय करावं लागेल जाणून घ्या.

बचतीसाठी नेमकं काय करावे लागेल :

तुमचा पगार हातात आल्याबरोबर सर्वप्रथम बचतीसाठी विचार करा आणि त्यानंतरच तुमचे उर्वरित खर्च भागवा. तुमचा पगार कमी असो किंवा जास्त पगारातील 20% किंवा 30% रक्कम तुम्हाला आधीच बचतीसाठी बाजूला काढून ठेवायची आहे. तुम्ही प्रत्येक महिन्याला न चुकता पगारातील एवढी रक्कम बाजूला काढली तर, तुमचे रिटायरमेंटनंतरचे आयुष्य देखील सुखकर बनत जाईल. त्याचबरोबर तुमच्या मुलांची शिक्षण, त्यांचे लग्न या सर्व गोष्टींसाठी अचानक पैसा उभा करण्याची वेळ येणार नाही. केवळ पैसे साठवून घरामध्ये न ठेवता तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपी, किंवा इतरही योजनांमध्ये गुंतवून योग्य व्याजदरासह चांगला परतावा कमवू शकता.

इमर्जन्सी फंड तयार करा :

बचतीप्रमाणेच तुम्हाला इमर्जन्सी फंड देखील तयार करावा लागेल. कारण की, नैसर्गिक आपत्ती, मृत्यू यांसारख्या जीवनहानी घटना आपल्याला सांगून येत नाहीत. अशा वाईट प्रसंगासाठी तुम्ही आधीच इमर्जन्सी फंड तयार केला पाहिजे. पगार हातामध्ये आल्याबरोबर इमर्जन्सी फंडकरीता तुम्हाला 5% भागाची बचत करायची आहे. ही बचत तुम्हाला प्रत्येक महिन्याला करायची आहे. जेणेकरून गरजेवेळी तुमच्यावर कोणत्याही प्रकारची जीवित हानी ओढावणार नाही.

इतर खर्च मॅनेज करा :

आता कौटुंबिक जीवन जगत असताना आपल्याला लाईट बिल, पाणी बिल, इंटरनेट बिल, फोन बिल, मुलांच्या शाळेची फी, पेट्रोल खर्च, घराचे भाडे, छोट्या मोठ्या वस्तू खरेदी करणे, दररोजचा भाजीपाला यांसारख्या अनेक गोष्टी तुम्ही तुमच्या पगारातील 40 ते 50% भागामध्ये भागवा. असं केल्याने प्रत्येक महिन्याला तुमचा एकच बजेट फिक्स राहील आणि तुमचा वायफळ खर्च होणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Salary Management 25 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Salary Management(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x