5 February 2025 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या
x

Salary Management | पगार हातात येताच खर्चामध्ये संपून जातो, तुमच्यासोबत देखील असं होत असल्यास ट्राय करा ही एक गोष्ट

Salary Management

Salary Management | सध्याच्या महागाईच्या काळात बेसिक पगारातून केवळ घर खर्च आणि गरजेच्या गोष्टी खरेदी करता येतात. म्हणूनच बऱ्याच व्यक्तींची बचतीबाबतची ही तक्रार कायम असते की पगारातून नेमके किती पैसे वाचवावे आणि किती पैशांची बचत करावी हेच कळत नाही. परंतु आता चिंता करण्याची काही गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट टीप घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बेसिक पगारातून देखील बचतीचा मार्ग सापडेल.

प्रत्येकाने आपल्या पगारातून 20% रक्कम बाजूला काढली पाहिजे :
नोकरी करणाऱ्या व्यक्तीला बिझनेस किंवा आणखीन इतर गोष्टी करण्यास वेळ मिळत नाही. अशा व्यक्तींनी नोकरीच्या पगारातील रक्कम बचतीसाठी बाजूला काढली पाहिजे. यासाठी तुम्हाला तुमच्या पगारातील 20 टक्के रक्कम बाजूला बचतीसाठी काढून ठेवायची आहे. आता उर्वरित रक्कमेतून तुम्ही घर खर्च त्याचबरोबर इतर गोष्टी तडजोडीने आणि जमवून महिना चालवायचा आहे.

फायद्याचे उदाहरण समजून घ्या :
समजा तुमच्यापैकी एखाद्या व्यक्तीला 40 हजार रुपये एवढा पगार आहे. तर, 40,000 मधील 20% म्हणजेच 8000 रुपये. तुम्हाला प्रत्येक महिन्याला किमान 8000 रुपये एका वेगळ्या अकाउंट lमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. आता तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की, पगारातील केवळ 20% रक्कमच बाजूला का काढावी. तर, 20% रक्कम बाजूला काढल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त पैशांची बचत करून भविष्यामध्ये चांगला निधी जमा करू शकता.

समजा तुम्ही 20% रक्कम बाजूला काढून उर्वरित पगार खर्चासाठी पुरत नसेल तर यावर देखील एक उपाय आहे. तो म्हणजे तुम्ही तुमच्या आगाऊ खर्चांना आळा घालू शकता. जेणेकरून सर्व गोष्टी बजेटमध्येच बांधता येतील.

बाजूला काढलेले पैसे गुंतवा :
आता तुम्ही तुमच्या बेसिक पगारातील 20% रक्कम बाजूला तर काढली परंतु प्रत्येक महिन्याला ही रक्कम बाजूला काढून बँकेत किंवा घरामध्ये ठेवण्यात काहीही अर्थ नाही. यासाठी तुम्ही पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे. याकरिता तुम्हाला सर्वप्रथम योग्य व्याजदर असणारे म्युच्युअल फंड किंवा एसआयपी सारख्या योजनांची पुरेपूर माहिती घ्यायला हवी. त्याचबरोबर पोस्टाच्या आरडी योजना, एसआयपी, म्युच्युअल फंडच्या वेगवेगळ्या योजना यांसारख्या तमाम योजनांमध्ये तुम्ही थोडे थोडे पैसे देखील गुंतवून भविष्यात करोडोंची रक्कम मिळवू शकता.

खर्च कमी करा :
1) प्रत्येक व्यक्तीने आपल्याला लागलेल्या वाईट सवयींवर पैसे खर्च करणे कमी केले पाहिजे. ज्यामध्ये सिगरेट पिणे, मद्यपान करणे, तंबाखू खाणे यांसारख्या अनेक दररोजच्या लागणाऱ्या सवयींना आळा घातलाच पाहिजे. जेणेकरून तुमची सवय ही सुटेल आणि तुम्ही निरोगी आयुष्य देखील जगाल.

2) आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर, या मॉडर्न युगात प्रत्येक व्यक्ती महिन्यातून दोनदा का होईना पण फिरायला जातोच. कार्पोरेट विश्वात काम करणाऱ्या व्यक्तींना महिनाभर काम करून एक दिवस तरी रिलॅक्स वाटावं म्हणून बाहेर फिरण्यासाठी जावं लागतं. अशावेळी तुम्ही दोन वेळे ऐवजी केवळ एकच वेळ बाहेर फिरायला गेलं पाहिजे. तुम्ही तुमच्या वीकेंडच्या दिवशी बाहेर फिरायला न जाता घरच्या घरी किटी पार्टी प्लॅन नक्कीच करू शकता. जेणेकरून तुमचे पैसे कमी प्रमाणात खर्च होतील.

3) बरेच तरुण मंडळी मित्र-मैत्रिणींबरोबर पबमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये बर्थडे पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी सर्रासपणे जाताना दिसत असतात. अशावेळी तुम्ही स्वतःचे जास्त पैसे खर्च होणार नाहीत या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. नाहीतर तुम्ही कधीच बचत करू शकणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Salary Management 27 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Salary Management(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x