11 December 2024 7:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा

Sarkari Yojana

Sarkari Yojana | अलीकडच्या काळात मुलांसह मुली देखील सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहेत. असं कोणतंच क्षेत्र नाही जिथे मुली पोहोचल्या नाहीत. प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलीने तिचं संपूर्ण शिक्षण पूर्ण करावं आणि चांगली नोकरी मिळवावी. बऱ्याच पालकांना शिक्षणासोबत आपल्या मुलीचं लग्न अगदी धुमधडाक्यात करण्याची इच्छा असते. यासाठी अनेक पालक आपल्या मुलीच्या जन्मापासून ते लग्नाचं वय होईपर्यंत तिच्या नावे बँकेत किंवा पैशांच्या गल्ल्यामध्ये वर्षानुवर्षे पैसे साठवतात.

जेणेकरून मुलीच्या लग्नवेळी तिला कोणतीही गोष्ट कमी पडू नये आणि धुमधडाक्यात तिची पाठवणी व्हावी. हे स्वप्न तर प्रत्येक आई-वडिलांचे असते परंतु प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीनुसार प्रत्येकजण पैशांची बचत करत असतो. अनेकांकडे पैसे तर असतात परंतु गुंतवायचे कुठे, सुरक्षित परतावा कुठे मिळणार असे अनेक प्रश्न पालकांना पडलेले असतात. आज आम्ही या सर्व प्रश्नांचं निरासरन करणार आहोत आणि तुम्हाला चार सरकारी फायद्याच्या योजनांविषयी देखील माहिती देणार आहोत.

लेक लाडकी योजना :

आर्थिकदृष्ट्या चांगली परिस्थिती नसलेल्या कुटुंबातील मुलींना देखील उच्च प्रतीचं शिक्षण घेता यावं यासाठी महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी ही योजना राबवणे सुरू केली आहे. या योजनेच्या काही नियमानुसार सरकार मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत ठराविक टप्प्यांनुसार आर्थिक मदत करते. ही योजना 2023-24 या चालू वर्षात सुरू केली गेली आहे.

या योजनेचे एक अनोखे वैशिष्ट्य आहे. मुलीच्या जन्मापासून ते 18 व्या वर्षीपर्यंत तुमच्या मुलीजवळ एकूण 75000 रुपये जमा होतील. जे सरकारकडून टप्प्याटप्प्यांनी मिळत राहील.

माझी कन्या भाग्यश्री योजना :

महाराष्ट्र सरकारची ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ ही देखील एक अत्यंत जबरदस्त योजनांपैकी एक आहे. ही योजना 2016 सालापासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही योजना पालकांना प्रबोधन करण्यास प्रवृत्त करते. कारण की मुलीच्या जन्मानंतर पालकांनी नसबंदी केली तर, सरकार तुमच्या मुलीच्या नावे 50000 जमा करेल. दरम्यान तूम्ही 2 मुलींचे पाकल झाले असाल आणि कुटुंब नियोजनाचा प्रयत्न करत असाल तर, तुमच्या दोन्ही मुलींच्या नावे सरकारकडून 25-25 हजार रुपये देण्यात येतील. तुमच्या मुलीचं 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला संपूर्ण रक्कम देण्यात येते. दरम्यान या पैशांवर कोणत्याही प्रकारचे व्याजदर दिले जात नाही.

बालिका समृद्धी योजना :

बालिका समृद्धी योजना मुलींसाठी अत्यंत खास योजना ठरू शकते. तुम्हाला सुद्धा लहान मुलगी असेल तर, लवकरात लवकर तिच्या नावे पैसे जमा करण्यासाठी बालिका समृद्धी योजनेमध्ये तिचं खातं उघडा. ही योजना मुलीचा जन्म झाल्याबरोबर तिच्या आईला 500 रुपयांची सबसिडी प्रदान करते. त्यानंतर शिक्षण घेत असलेल्या मुलीला 300 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप दिली जाते. त्यामुळे मुलींसाठी ही योजना अत्यंत फायद्याची ठरेल.

सुकन्या समृद्धी योजना :

‘सुकन्या समृद्धी योजना’ ही सरकारची सर्वोत्तम चालणारी योजना आहे. बरेच पालक आपल्या मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याकरिता सुकन्या समृद्धी योजनेचा पर्याय निवडतात. या योजनेत तुम्ही दहा वर्षांसाठी पैशांची गुंतवणूक करून वर्षाला 250 रुपये भरू शकता. योजनेत जास्तीत जास्त पैसे गुंतवणुकीची लिमिट 1.50 लाख रुपये दिली गेली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Sarkari Yojana Thursday 05 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Sarkari Yojana(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x