28 September 2024 1:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bigg Boss Marathi | 'हे अरबाजचे कपडे आहेत फेकून द्या', निक्कीला मिळाला गुलिगत धोका, आई म्हणाली.. - Marathi News SJVN Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News BEL Share Price | 1 वर्षात पैसे दुप्पट, शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअरसाठी ओव्हरवेट रेटिंग, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News Bigg Boss Marathi | अखेर ती आलीच,'ड्रामा क्वीन' राखी सावंतला पाहून निक्कीच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग - Marathi News Big Breaking | इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
x

SBI ATM Near Me | एका दिवसात ATM मार्फत एवढे पैसे जमा करता येतील, SBI सहित सर्व बँकांची मर्यादा जाणून घ्या - Marathi News

SBI ATM Near Me

SBI ATM Near Me | आपल्या देशात दररोज कोणत्या ना कोणत्या नवीन टेक्नॉलॉजीच इनोवेशन होत असतं. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य व्यक्तींवर होताना पाहायला मिळतो. आता हळूहळू हे जग डिजिटल युगाकडे वळत आहे. अशातच भारतीय रिझर्व बँकने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच एक नवीन सुविधा अमलात आणण्याची घोषणा केली होती. ज्यामार्फत यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसच्या माध्यमातून तुम्हाला एटीएम अकाउंटमध्ये कॅश जमा करण्याची म्हणजेचं डिपॉझिट करण्याची सुविधा मिळणार आहे.

UPI-ICD इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिटच अनावरण केंद्रीय बँकेचे डीप्ती गव्हर्नर टी रबी शंकर यांनी केलं असून, या अनावरणानंतर काही बँकांनी एटीएममधील कॅश डिपॉसिटी लिमिटमध्ये काही बदल केले आहेत. केलेल्या बदलांनुसार तुमचं बँक खातं पॅन कार्डला लिंक नसेल तर, पैसे जमा करण्याची लिमिट वेगवेगळी असू शकते. यामध्ये तुम्हाला ऑटोमेटेड डिपॉझिट कम विथड्रॉल मशीनद्वारे म्हणजेच (ADWM) नुसार तुम्ही तुमचे पैसे बँकेत न जाता देखील जमा करू शकता. त्यामध्ये कोणकोणत्या बँकांची किती लिमिट आहे पाहूया.

युनियन बँकेची किती आहे कॅश डिपॉझिटची लिमिट :
युनियन बँक ऑफ इंडियाचे कस्टमर एका दिवसात ADWM या मशीनद्वारे जास्तीत जास्त 200 नोटा जमा करू शकतात. समजा तुमचं बँक अकाउंट पॅन कार्डला लिंक नसेल तर, तुम्हाला केवळ 49999 एवढे रुपये जमा करता येणार आहेत. दरम्यान तुमचं पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर, तुम्ही तब्बल 1 लाखांपर्यंत रक्कम जमा करू शकता.

SBI कस्टमरला दररोज एवढी कॅश जमा करता येईल :
एसबीआय कस्टमर एटीएम मशीनमार्फत आणि कार्डलेस सुविधे अंतर्गत 49,900 एवढी रक्कम जमा करू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया प्रत्येक दिवसाला जास्तीत जास्त 200 नोटा जमा करण्याची अनुमती देते. एवढच नाही तर ADWM या मशीनद्वारे कस्टमर केवळ 100,200,500 आणि 2000 च्या नोटा जमा करू शकतात. त्याचबरोबर डेबिट कार्डमार्फत तुम्ही दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता आणि तुमच्या पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, लोन अकाऊंट आणि RD मध्ये देखील कॅश डिपॉझिट करू शकता.

PNB ग्राहकांसाठी एवढी आहे लिमिट :
पीएनबी म्हणजे पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक एका दिवसात ऑटोमेटेड कम डिपॉझिट विथड्रॉवल मशीनच्या माध्यमातून एकूण 200 रुपयांच्या नोटा किंवा एक लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकतात. जर खातेधारकाच्या अकाउंटला पॅन कार्ड लिंक असेल तर 1 लाख रुपये आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर, 49,900 रुपये जमा करता येणार आहेत.

Latest Marathi News | SBI ATM Near Me 27 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SBI ATM Near Me(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x