20 April 2025 12:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

Smart Investment | पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, टेन्शन नको 50-30-20 या फॉर्म्युला वापरून पैशाने पैसा वाढवा - Marathi News

Smart Investment

Smart Investment | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती महिन्याला आपल्या पगाराची वाट पाहत असतो. पगार हातात आल्याबरोबर उसने-पासने, घर खर्च, राशन, मुलांच्या शाळेची फी त्याचबरोबर लाईट बिल, गॅस बिल, टॅक्स, मेन्टेनिस यांसारखे भरपूर कामे करायची असतात. पगार हातात आल्याबरोबर पुढील पाच दिवसांत पगाराचे पैसे नेमके कुठे कुठे खर्च होत आहेत याचा काहीही थांगपत्ता लागत नाही. त्याचबरोबर वरचा खर्च तो वेगळाच. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला गुंतवणूक करण्यासाठी हातामध्ये रक्कमच शिल्लक राहत नाही.

तुमची सुद्धा अशीच काहीशी कंडिशन असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी. तुम्हाला तुमच्या पगाराचे योग्य नियोजन करून गुंतवणुकीसाठी देखील काही रक्कम बाजूला काढायची असेल तर तुमच्याकडे एकच पर्याय उरलेला आहे. तो म्हणजे 50-30-20 हा नियम. या नियमामुळे तुम्ही लवकरात लवकर पैसे गुंतवून लाखो करोडोंचा फंड अगदी आरामात तयार करू शकता. चला तर जाणून घेऊया या नियमामुळे पैशांचे नियोजन कसे करता येते.

50-30-20 हा नियम नेमका कुठून आला :
50 30 आणि 20 या नियमाचा शोध लावण्यात आला आहे. हा शोध अमेरिकी सिमेंट त्याचबरोबर टाईम मक्झिनमध्ये 100 व्यक्तींमध्ये स्थान पटकावणाऱ्या एलिझाबेथ वॉरेन यांनी आणला होता. या नियमाची सविस्तर माहिती देण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलीला देखील सोबत घेतलं. त्याचबरोबर 2006 साली त्यांनी 50 30 आणि 20 च्या या नियमावर एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचे नाव, (ऑल युवर वर्थ : द अल्टिमेट लाईफटाईम मनीप्लॅन) असं आहे. नियमाप्रमाणे त्यांनी त्यांच्या पगाराचे वर्गीकरण तीन भागांमध्ये केले. ज्यामध्ये आवश्यकता, बचत आणि इच्छा या तीन गोष्टींचा समावेश होतो.

नियमाप्रमाणे पगारांमधील 50 टक्के भाग हा गरजेच्या वस्तूंवर खर्च केला पाहिजे. या 50 टक्याच्या भागामध्ये घर खर्च, राशन, शाळेची फी, लाईट बिल यांसारखे छोटे-मोठे घर खर्च समाविष्ट असू शकतात. असल एलिझाबेथ वॉरेन यांचं मत आहे.

30 आणि 20% रक्कम कुठे खर्च करावी जाणून घ्या :
30 टक्के रक्कम म्हणजे तुमच्या पगारातील 30% भाग तुमच्या इच्छेवर खर्च केला पाहिजे. यामध्ये शॉपिंग, बाहेर जेवायला जाणे, हाऊस मौज करणे, पार्लरमधील खर्च, पर्सनल खर्च, आवडीच्या ठिकाणी जाणे, पर्यटन स्थळी भेट देणे यांसारख्या गोष्टींवर खर्च केला जाऊ शकतो.

पुढे तुम्ही तुमच्या पगारातील 20% भाग हा खर्च न करता गुंतवला पाहिजे. गुंतवणुकीमध्ये तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरचा काळ, मुलांचे शिक्षण, इमर्जन्सी फंड, गरजेवेळी लागणारा पैसा जमा करून ठेवला पाहिजे. समजा तुम्ही 50 30 आणि 20 या नियमाचा सातत्याने वापर केला तर, तुम्ही भविष्यात करोडोंची रक्कम देखील तयार करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Smart Investment 06 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Smart Investment(102)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या