15 January 2025 11:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

Smart Investment | बेसिक पगारातून करा जास्तीत जास्त बचत; पैशाने पैसा जोडला जाईल, 70:15:15 ची स्ट्रॅटर्जी आहे फायद्याची

Smart Investment

Smart Investment | पगार कमी असो किंवा जास्त आपल्या पगारातील काही रक्कम बाजूला निघावी असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकजण बचतीसाठी अनेक प्रयत्न करतात. परंतु बेसिक पगारातून हवी तेवढी गुंतवणूक करता येत नाही. अनेक व्यक्तींना असं वाटतं की, दीर्घकाळाकरिता गुंतवणूक करण्यासाठी वेळ आणि जास्तीचा पैसा महत्त्वाचा आहे. असं काहीही नसून तुम्ही अगदी शुल्लक गुंतवणुकीतून देखील भरघोस पैसे मिळवू शकता.

सध्याच्या घडीला बाजारात गुंतवणुकीचे वेगवेगळे साधन पाहायला मिळते. यामध्ये म्युच्युअल फंड आणि एसआयपी ही दोन साधनं अत्यंत लोकप्रिय आहेत. अनेकजण एसआयपीमध्ये पैसे गुंतवणे पसंत करतात. अशातच बऱ्याच मध्यमवर्गीय व्यक्तींना पगारातून होणारा खर्च आणि बचत यामध्ये ताळमेळ बसवता येत नाही. परंतु आता चिंता करण्याची काहीही गरज नाही तुम्ही 70:15:15 चा फॉर्मुला वापरून अगदी सहजपणे पैशाची गुंतवणूक करून भरघोस रक्कम कमावू शकता.

बचतीसह गुंतवणुकीचा सोपा फंडा जाणून घ्या :
दीर्घकाळात कमीत कमी बचत करून जास्तीत जास्त फंड जमा करण्यासाठी तुम्ही SIP मध्ये पैसे गुंतवू शकता. यासाठी तुम्हाला 70:15:15 हा फॉर्मुला वापरावा लागेल. समजा एखाद्या व्यक्तीला दरमहा 20,000 हजारो रुपये पगार आहे तर त्यामधील किती बचत करावी हे तुम्ही या फॉर्मुलामधून करू शकता.

म्हणजे 20,000 पगारातील 70% रक्कम तुम्ही तुमच्या गरजा भागवण्यासाठी ठेवा. 15% रक्कम आजारपण, इतर खर्च म्हणजेच आपत्कालीन गोष्टींसाठी प्रत्येक महिन्याला बाजूला काढून ठेवा. जेणेकरून वेळेप्रसंगी तुम्हाला इतर व्यक्तींकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही. त्याचबरोबर उरलेली 15% रक्कम SIP मध्ये प्रत्येक महिन्यासाठी गुंतवा.

कॅल्क्युलेशन सविस्तर समजून घ्या :
70:15:15 या फॉर्मुल्यानुसार 20 हजारातील 70% रक्कम म्हणजेच 14,000 घर खर्चासाठी बाजूला काढून ठेवा. त्यानंतर 15%-15%, 3,000-3,000 प्रत्येक महिन्याला आपत्कालीन आणि वेळ प्रसंगांसाठी बाजूला काढून ठेवा. उर्वरित 3,000 हजारांची रक्कम SIP मध्ये गुंतवा. तुम्ही सातत्याने 3,000 हजारांची रक्कम पुढील 30 वर्षांसाठी गुंतवत असाल तर तुमच्या खात्यात 10.80 लाख रुपयांचा निधी जमा होईल. SIP मधील 12% व्याजदरानुसार तुम्हाला केवळ व्याजातूनच 95,09,741 एवढी रक्कम मिळेल. अशाप्रकारे तुमच्याकडे 1,05,89,741 रुपयांचा फंड जमा होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Smart Investment 21 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Smart Investment(86)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x