26 April 2025 1:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | सरकारी कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, पुढे मिळेल मोठा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO AWL Share Price | अदानी वील्मर शेअरमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: AWL HAL Share Price | मंदीत संधी, हा डिफेन्स कंपनीचा शेअर खरेदी करा, ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: HAL BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल PPF Investment | 90% लोकांना माहित नाही, मॅच्युरिटीनंतरही दर वर्षी 700000 रुपये व्याज मिळतं, पैसे बचतीचीही गरज नसते EPF for Home Loan | पगारदारांनो, गृहकर्ज डोईजड झालंय? EPF च्या माध्यमातून कर्जमुक्त होऊ शकता, अपडेट जाणून घ्या
x

Smart Investment | तुमचा महिना पगार कितीही असला तरी 'या' 3 पर्यायांमध्ये पैसे गुंतवा, कधीच आर्थिक कोंडी होणार नाही

Smart Investment

Smart Investment | सध्याच्या या स्मार्ट युगामध्ये पैसे कमवणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे. पैसे कमावले तर, ते योग्य ठिकाणी खर्चही झाले पाहिजेत. बहुतांश व्यक्ती पगार हातात आल्याबरोबर लगेचच आपले शौक पूर्ण करतात. संपूर्ण पैशांची उधळपट्टी करून झाल्यानंतर पुढच्या महिन्यातील पगाराची वाट पाहतात. असं करत त्यांच्या हातात एक रुपया देखील शिल्लक राहत नाही.

यामधील बहुतांश व्यक्ती असे देखील आहेत ज्यांना सॅलरी मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय हे देखील ठाऊक नसतं. सॅलरी मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला कितीही कमीत कमी पगार असो परंतु योग्य नियोजन नसेल तर, तुमचे सर्व पैसे व्यर्थ आहेत असं समजावं लागेल. कमीत कमी किंवा जास्तीत जास्त पगार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्या आयुष्यात कोण कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजेच कोणकोणत्या गोष्टींमध्ये आपले पैसे गुंतवले पाहिजे हे आम्ही सांगणार आहोत. चला तर योग्य आणि गरजेच्या गुंतवणुकीचे पर्याय जाणून घेऊ.

पैशांची गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे :
प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये भविष्याकरिता फायनान्शिअल प्लॅनिंग करतो. तुम्ही देखील तुमच्या पगारातील कमीत कमी रक्कम का होईना पण गुंतवली पाहिजे. तुमचा पगार कितीही कमी असला तरीसुद्धा त्यातील 20% रक्कम तुम्ही एखाद्या अधिक व्याजदर देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवली पाहिजे. तुम्हाला कमीत कमी 20000 रुपये पगार असेल तर, 4000 रुपयांची गुंतवणूक केलीच पाहिजे.

हेल्थ इन्शुरन्स :
जसं काम महत्त्वाचं आहे तसंच आपलं शरीर देखील तितकच महत्त्वाचं आहे. तुमचा शरीर सुदृढ आणि निरोगी असेल तरच तुम्ही व्यवस्थित पद्धतीने काम करू शकता. तरुण वय निघून गेल्यानंतर भविष्यात तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी नक्कीच येऊ शकते. अशावेळी तुमच्याजवळ हेल्थ इन्शुरन्स असेल तर, तुमचा संपूर्ण खर्च हेल्थ इन्शुरन्समार्फत भरून निघतो.

इमर्जन्सी फंड :
तुमच्या आयुष्यात नैसर्गिक आपत्तीसारखी गोष्ट कधीही ओढाऊ शकते. यामध्ये अचानकपणे बिजनेस बंद पडणे, तुमचा अचानक अपघात होणे किंवा यापेक्षाही इतर कोणते मोठे नुकसान होऊ शकते. अशावेळी तुमच्याजवळ इमर्जन्सी फंड असणे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या वाईट काळामध्ये तुम्ही साठवून ठेवलेला इमर्जन्सी फंड कामी येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करून इमर्जन्सी फंड नक्कीच साठवून ठेवला पाहिजे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Smart Investment Sunday 02 February 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Smart Investment(102)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या