23 February 2025 2:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

UPI ID | तुम्ही ऑनलाईन पेमेंटसाठी UPI वापरता, या 5 गोष्टींमुळे बँक अकाउंट खाली होईल, लक्षात ठेवा या गोष्टी

UPI ID

UPI ID | UPI म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस सध्या कोटींच्या संख्येने ग्राहक UPI पेमेंट इंटरफेसचा वापर करत आहेत. अगदी कुठेही आणि कधीही ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी यूपीआय पद्धत वापरतात. परंतु बहुतांश व्यक्ती सायबर क्राईमच्या विळख्यात अडकतच आलेले आहेत.

आतापर्यंत बहुतांश व्यक्तींचे अकाउंट्स सायबर भामट्यांनी रिकामे केले आहेत. आता सायबर फ्रॉड याचे देखील एकूण 5 प्रकार समोर आले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांना फसवलं जात आहे. त्यामुळे सायबर फ्रॉड होण्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा इथे जाणून घ्या.

भ्रामक UPI हँडल :
बहुतांश सायबर फ्रॉड खोट्या पद्धतीच्या UPI ॲपवरून केले जातात. खोटे यूपीआय हँडल म्हणजेच @BHIM2help यांसारख्या ॲपवरून नागरिकांना फसवलं जात आहे. ज्या व्यक्तींनी BHIM2help यासारख्या खोट्या ॲप विरोधात तक्रार नोंदणी केली आहे त्यांना सायबर भामटे थेट फोन करतात आणि आम्ही तुमची मदत करू तुम्हाला आम्ही सुरक्षा देऊ. यांसारख्या गोष्टी बोलून त्यांच्याजवळून बँक डिटेल्स आणि ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण माहिती गोळा करतात आणि फ्रॉड करतात.

एनी डेस्क :
बऱ्याचदा फ्रॉड करणारी व्यक्ती स्वतःला बँक कर्मचारी असल्याची ओळख समोरच्याला पटवून देते. त्यानंतर ग्राहकांची मदत करण्यासाठी त्यांना टीम विवर आणि एनी डेस्कसारखे ॲप डाऊनलोड करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. यांपैकी एखादा ॲप डाऊनलोड केल्यानंतर फ्रॉड करणाऱ्या व्यक्ती आपोआप तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपपर्यंत पोहोचतो. आणि तुमचे सर्व पर्सनल डिटेल्स काढून तुमच्याबरोबर फ्रॉड करतो.

भ्रामक मेसेज पाठवणे :
बहुतांश सायबर भामटे त्यांनी टार्गेट केलेल्या शिकाराला चुकून पाठवलेले पैसे पुन्हा परत करण्यासाठी सांगतात आणि अशावेळी त्यांच्याबरोबर फ्रॉड करतात. सायबर भामटांकडून 5000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आले आहेत अशा पद्धतीचा भ्रामक मेसेज पाठवला जातो आणि तुमचे लक्ष विचलित करून तुमच्याकडून फ्रॉड करून घेतलं जातं.

फिशिंग :
बहुतांश सायबर भामटे असेही असतात जे समोरील व्यक्तीला एक खोटी म्हणजेच बनावटी लिंक पाठवतात. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचे पैसे ऑटोमॅटिकली ऑटो डेबिट होतात. त्यामुळे तुम्हाला ठाऊक नसलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका.

फसवी माहिती देतात :
बहुतांश फ्रॉड व्यक्ती साध्या भोळ्या ग्राहकांना फसवण्यासाठी फसवी माहिती देतात. आम्हाला हे पैसे पाठवा अशा पद्धतीचं सांगण्यात येतं. म्हणजेच फसव्या व्यक्तीकडून साध्या व्यक्तींजवळ मदतीसाठी हात पसरले जातात आणि इथेच लोकं फसतात.

पुढील गोष्टी वाचा आणि स्वतःची फसवणूक होण्यापासूनच स्वतःला वाचवा :
1. तुम्हाला आलेला कोणताही ओटीपी किंवा पासवर्ड कोणत्याच व्यक्तीला शेअर करू नका. अगदी बँकांना देखील पाठवू नका.

2. समजा तुम्हाला एखादी अनोळखी लिंक आली तर चुकूनही तिच्यावर क्लिक करून पाहू नका. जोपर्यंत तुम्हाला त्या लिंकबद्दल संपूर्ण माहिती नाही तोपर्यंत ती लिंक उघडू नका. अन्यथा सायबर भामट्यांच्या विळख्यात सापडाल.

3. तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा किंवा कोड स्कॅन करू नका. QR कोड केवळ पैसे पाठवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा.

4. सायबर भामट्यांकडून सांगण्यात आलेला कोणत्याही प्रकारचा अनोळखी ॲप डाऊनलोड करू नका. नाहीतर तुमचा लॅपटॉप त्याचबरोबर तुमचा स्मार्टफोन हॅक करण्यात येईल आणि तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती देखील चोरली जाईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UPI ID(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x