16 January 2025 1:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Wedding Insurance | वेडिंग इन्शुरन्स घेण्याचे जबरदस्त लाभ, आता पॉलिसीमधून उचला लग्नाचा खर्च, जाणून घ्या फायद्याची बातमी . Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल NTPC Share Price | पीएसयू NTPC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार हा शेअर, टार्गेट नोट करा - NSE: NTPC Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअरबाबत UBS ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA EPFO Minimum Pension | खासगी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, EPFO कडून महिना किमान 7500 रुपये पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा
x

Wedding Insurance | वेडिंग इन्शुरन्स घेण्याचे जबरदस्त लाभ, आता पॉलिसीमधून उचला लग्नाचा खर्च, जाणून घ्या फायद्याची बातमी .

Wedding Insurance

Wedding Insurance | आज-काल फार कमी व्यक्ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने लग्न करतात. परंतु आता डेस्टिनेशन वेडिंगची क्रेझ तरुणाईमध्ये पसरली आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते सर्वच प्रवर्गातील व्यक्तींना प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग यांसारखे फंक्शन पार पाडायचे असतात.

एवढंच नाही तर, संगीत प्रोग्राम, मेहंदी फंक्शन त्याचबरोबर वेडिंग आणि पोस्ट वेडिंग शूट, या सगळ्याबरोबर लग्नातील डेकोरेशनचा खर्च, जेवणाचा खर्च यांसारख्या विविध प्रकारच्या खर्चिक गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात. तुमच्याजवळ असलेले लाखो रुपये लग्नावर खर्च झाल्यानंतरही कुठेतरी पैशांची कमतरता भासतेच. अशा परिस्थितीमध्ये वेडिंग इन्शुरन्स घेणे तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरू शकते.

वेडिंग इन्शुरन्सची गरज काय :

वेडिंग इन्शुरन्स म्हणजेच लग्न पॉलिसी. लग्नामध्ये विविध प्रकारच्या खर्चिक गोष्टी वाढण्याचे जास्त प्रमाणात चान्सेस असतात. त्यामुळे काही कारणास्तव तुमचे लग्नकार्य न थांबता सुरळीतपणे मार्गी लावण्यासाठी तुम्ही वेडिंग इन्शुरन्सची मागणी करू शकता. वेडिंग इन्शुरन्समुळे लग्नाचा खर्च सुरक्षित होतो आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण देखील एक निर्माण होत नाही.

लग्नात वेडिंग इन्शुरन्स घेण्याची काही ठोस कारणे :

1. बहुतांश व्यक्तींना असं वाटतं की, आपण लग्नामध्ये बोला मोठा केलेला खर्च भरून निघेल का. आपल्याला खर्चाच्या बाबतीत लाभ उचलता येईल का. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला वेडिंग इन्शुरन्समार्फत मिळतील.

2. बऱ्याचदा वेडिंग इन्शुरन्समध्ये लग्नाचा मोठा खर्च, महागड्या भेटवस्तू त्याचबरोबर हनिमून पॅकेज या सर्व गोष्टींचा समावेश असतो.

3. वेडिंग इन्शुरन्स घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लग्न खर्चाचा बजेट बनवावा लागेल. लग्न करताना बजेट तयार केल्यानंतर तुम्हाला खर्चाची सीमा समजेल आणि त्यानुसार तुम्हाला वेडिंग इन्शुरन्स घेण्यास सोपे जाईल.

4. तुम्ही इतर ठिकाणाहून मिळणाऱ्या वेडिंग इन्शुरन्स पॉलिसीबाबद चौकशी केली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला इन्शुरन्स प्लॅनिंग त्याचबरोबर स्वस्तात मस्त डील सापडण्यास मदत होईल.

5. वेडिंग इन्शुरन्स घेतल्यानंतर तुम्हाला एजंट देखील निवडावा लागेल जो तुमच्यासाठी विश्वासहार्य व्यक्ती असेल. त्याचबरोबर पॉलिसी निवडण्याआधी तुम्हाला पॉलिसीच्या नियम आणि अटींची प्रक्रिया व्यवस्थितपणे समजून घेता येईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Wedding Insurance Thursday 16 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Wedding Insurance(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x