21 January 2025 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओ युजर्सना धक्का, या रिचार्ज प्लानच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या डिटेल्स Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, पैशाने पैसा वाढवा, डिटेल्स सेव्ह करा SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका
x

Work From Home Jobs | घरबसल्या पैसे कमवायचे आहेत? कोणते पर्याय उपलब्ध? मग ही माहिती नक्की वाचा

Work From Home Jobs

Work From Home Income Options | कोणतीही कामे पैशांशिवाय होत नाहीत. माणसाला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे फार महत्वाचे आहेत. मात्र अनेक व्यक्तींना घरबसल्या काहीतरी काम मिळावे असे वाटते. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी लागणार आणि त्यानंतर आपली कमाई सुरू होणार असं गणित प्रत्येकाचं आहे. मात्र आम्ही आज तुमच्यासाठी एक खास लेख लिहिला आहे. यामध्ये तुम्हाला शिक्षण पूर्ण होईपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करत अगदी घरबसल्या देखील काम कारू शकता. (What work can you do from your home?)

घरबसल्या कमाईचे मार्ग – (How can I earn money by working from home?)

हे काम फक्त विद्यार्थीच नाही तर गृहीणी आणि सेवानिवृत्त कर्मचारी एकंदर कोणतीही व्यक्ती करू शकते. यासाठी तुमच्याकडे त्या गोष्टीचे विशिष्ट ज्ञान अथवा पदवी असावी, अशी कोणतीही अट नाही. तुमच्या फावल्या वेळात तुम्ही ही कामे करून चांगली कमाई करू शकता. अनेक वेळा गृहीणी असतील किंवा विद्यार्थी यांना रोजच्या दिवसात बराच वेळ मिळतो. त्यामुळे त्या वेळात काही काम करून पैसे कमवावे असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी आम्ही घरबसल्या कोणती कामे करता येतील ही माहिती घेऊन आलो आहोत. (How can I do online work from home?)

फक्त फोनवर करू शकता काम – (Which work is best for earning money from home?)

सध्याच्या युगात अशा फार कमी व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही. आपल्या दिवसभरातील कितीतरी वेळ आपण फोनवर व्हिडिओ, रील, चॅटींग करण्यात घालवत असतो. त्यामुळे याच फोनचा वापर तुम्ही पैसे कमवण्यासाठी करू शकता. आता यासाठी तुम्हाला मोठी मेहनत घेण्याची किंवा त्याची माहिती शोधण्यासाठी कोणतेही पुस्तक वाचण्याची आवश्याकता नाही. फोनमधील युट्यूब किंवा गूगल यावर देखील तुम्हाला फोन मार्फत पैसे कसे कमवायचे याची माहिती मिळेल.

ब्लॉगिंग
ब्लॉगिंग हा एक पैसे कमवण्याचा असा मार्ग आहे ज्यासाठी तुम्हाला घरातून बाहेर पडण्याची गरज नाही. तुम्ही घरामध्ये बसून आरामात तुमच्या फोनवर लॅपटॉप अथवा संगणकावर बॉग तयार करू शकता. ब्लॉगिंग मार्फत अनेक व्यक्ती सध्याच्या घडीला लाखो रुपये कमवत आहेत. यात काही जण पार्ट टाईम म्हणून देखील ब्लॉग लिहितात. तर काही जण आपला संपूर्ण वेळ यावर घालवतात.

ब्लॉग लिहिल्यावर तुम्ही तो तुमच्या फेसबुक पेजवर टाकू शकता. त्यातुन कमाई व्हावी यासाठी विशिष्ट किवर्ड, स्लग या गोष्टी चांगल्या लिहिल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर तुमची पोस्ट इंटनेटवर रँक केल्यावर त्यावर ऍडसेन्स सुरू होते. यातुन दरमहा तुम्हाला चांगले उत्पन्न मिळवता येईल.

ब्लॉगिंगचे फायदे काय आहेत?
* ब्लॉगिंग करताना सर्वात आधी तुम्हाला तुमच्या वेळे नुसार काम करता येईल.
* ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या हाताखाली काम करावे लागते इथे तुम्ही स्वत:च तुमचे बॉस असाल.
* तुम्हाला कोणत्याही अटी किंवा निर्बंधांचे पालन करावे लागणार नाही.
* ब्लॉगिंगला सुरूवात करताना तुम्हाला त्यामध्ये आधी कोणतीही पैशांची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही.
* शून्य पैसे इन्वेस्टमेंटमध्ये तुम्ही काम कारू शकता.
* जर तुम्ही ब्लॉगमध्ये लिहिलेली माहिती फार महत्वाची अथवा उपयुक्त असेल तर काही काळाने जर ब्लॉगिंग सोडून दिले तरी काही काम न करता तुम्हाला त्यातून पैसे मिळत राहतील.

ब्लॉगिंग करताना कोणती काळजी घ्यावी
१. ब्लॉगिंगमधून पैसे कमवताना तुमच्याकडे पेशन्स असणे फार गरजेचे आहे. आज तुम्ही एक पोस्ट शेअर केली आणि लगेच एका रात्रीत लाखो रुपये मिळवले असे येथे होत नाही. ब्लॉगिंगमधून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागेल. कामात सातत्य ठेवावे लागेल. यामध्ये तुम्हाला नियमीत काही पोस्ट शेअर कराव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला ऍडसेन्स सुरू होऊन पैसे कमवता येतील.

२. ब्लॉगिंग करताना तुम्ही त्यामध्ये सातत्य ठेवले तर लाखो काय करोडो रुपये देखील तुम्ही आरामात कमवू शकता. फक्त यामध्ये तुमचा वाचक वर्ग कोणता आहे. त्यांना नेमके काय वाचायला आवडते याची माहिती तु्म्हाला असावी. यासाठी तुमच्याकडे निरिक्षण क्षमता चांगली असणे गरचेचे आहे.

३. ब्लॉगिंग करताना तुम्हाला कोणत्याही पैशांची गुंतवणूक करावी लागत नाही. मात्र इथे तुम्हाला इंटरनेटवरून काही गोष्टी शिकून घ्याव्या लागतील. यामध्ये ब्लॉग नेमका कसा लिहितात. त्यामध्ये कोणती माहिती असावी. यासह पैसे मिळवण्यासाठी तुमची पोस्ट रँक कशी होईल याची माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे.

अशी करा ब्लॉगींगला सुरूवात
१. ब्लॉगींगला सुरूवात करताना तुम्ही स्वत: या कामासाठी सक्षम आहात की नाही हे तपासून पाहू शकता. यासाठी इंटरनेटवर असलेली माहिती वाचल्यानंतर तुम्ही खरोखर यासाठी सक्षम आहात का हे तुमचे तुम्हाला कळून येईल. ब्लॉगला सुरूवात केल्यावर तुम्ही एक ब्लॉगर म्हणून ओळखले जाल.

२. ब्लॉगर किंवा वर्डप्रेस असे दोन पर्याय आहेत. या दोन्ही पैकी एका प्लॅटफॉर्मवरून तुम्ही तुमचे ब्लॉग लिहिण्यासाठी सुरूवात करू शकता.

३. जर तुम्हाला यामध्ये तुमचा संपूर्ण वेळ द्यायचा असेल तर तुम्ही एखादे डोमेन खरेदी करू शकता. या डोमेनला तुम्हाला हवे ते नाव तुम्ही देऊ शकता. त्यानंतर आपला ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करून तुम्ही भरपूर लोकांपर्यंत पोहचू शकता.

४. ब्लॉगिंग करताना जाहिराती हे तुमच्या कमाईचे साधन असेल. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ब्लॉग लिहिण्यास सुरूवात करावी लागेल. त्यानंतर त्यावर गूगल ऍडसेन्सला परवानगी मिळाल्यावर तुम्हाला पैसे कमवता येतील. यामध्ये किती व्यक्ती तुमचा ब्लॉग वाचत आहेत. त्यांना तुमचा ब्लॉग किती प्रमाणात वाचण्यासाठी चांगला वाटतो हे सर्व काही समजेल.

पैसे कशा प्रकारे सुरू होतील
आतापर्यंतचा हा लेख वाचून पैसे हे जाहिरातीमधून सुरू होतात हे तुम्हाल समजलेच असेल. मात्र हे पैसे तुम्ही केव्हा काढू शकता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ब्लॉगींगला सुरूवात केल्यावर ऍडसेन्स मार्फत पैसे सुरू होतात. पैशांची ही रक्कम डॉलर मार्फत तुमच्या खात्यात जमा होते. जेव्हा खात्यामध्ये १०० डॉलर्स जमा होतील तेव्हा तुम्ही ही रक्कम काढू शकता. त्याआधी काही थोडोफआर पैसे जमा झाले असतील तर लगेचच तुम्ही ते पैसे काढून घेऊ शकत नाही. (How to earn Rs 1,000 per day from home in India?)

युट्यूबमधून पैसे कसे कमवायचे? – (How to earn $1,000 per day from home?)

आता ब्लॉगींग मार्फत पैसे कमवण्याची माहिती तुम्ही मिळवली आहे. जर तुम्हाला हा पर्याय कठीण वाटत असेल तर तुमच्यासाठी आम्ही आणखीन एक पर्याय घेऊन आलो आहोत. तु्म्ही युट्यूब तर नक्कीच पाहत असाल. यावर प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही देखील इतरांप्रमाणे युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून पैसे कमवू शकता.

गुगल हे पहिल्या क्रमांकावरील सर्चइंजिन आहे. त्यानंतर युट्यूब हे दुसऱ्या क्रमांकावर असलेलं सर्चइंजिन आहे. तुम्ही युट्यूबर तुम्हाला हवा तो व्हिडिओ पोस्ट करू शकता. यामध्ये करमनुक, अपघात, चोरी, शैक्षणिक माहिती, जेवणाच्या रेसेपी अशा कोणत्याही विषयावरील व्हिडिओ तुम्ही पोस्ट करू शकता.

युट्यूबमधून पैसे कमवण्याची पद्धत
* सर्वात आधी तुम्हाला यु्ट्यूबवर तुमचे Gmail id लॉगइन करावे लागेल.
* त्यावर पुढे तुम्हाला क्रियेट चायनल (Create Channel) असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुमचं स्वत:चं चॅनल सुरू करू शकता.
* तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ज्ञान आहे त्याचा एक व्हिडिओ तयार करून तुम्ही तो व्हिडिओ येथे अपलोड करू शकता.
* युट्यूबर व्हिडिओ पोस्ट केल्यावर जेव्हा तुमच्या चॅनलवर १०० Subscriber आणि ४०० तासांचा watch time पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला पैसे मिळण्यास सुरूवात होईल.
* एखाद्याचा कंटेन्ट न चोरता जर तुम्ही ओरिजनल कंटेन्ट देत असाल तेव्हा तुमचे चॅनल मॉनिटाइज होईल.
* चॅनल एकदा Monetize झाले की पुढे तुमच्या या चॅनलवर जाहिराती सुरू होतील आणि प्रत्येक व्हिडिओनंतर जाहिराती दिसू लागतील.
* जेव्हा जाहिराती मार्फत पैसे सुरू होतील आणि ती रक्कम १००$ इतकी होईल तेव्हा तुम्ही हे पैसे तुमच्या खात्यात काढून घेऊ शकता.

इंस्टाग्राममार्फत कमवा पैसे
युट्यूब आणि गूगल व्यतीरिक्त तुम्ही इंस्टाग्राम मार्फत देखील पैसे कमवू शकता. इंस्टाग्राम हे पैसे कमवण्याचे सर्वात सोपे ॲप आहे. इथे तु्म्हाला जास्त लिहिण्याची किंवा व्हिडिओ तयार करण्याची गरज नाही. एखादा फोटो तुम्ही तुमच्या अकाऊंटवर पोस्ट करुन अथवा स्टोरीला ठेवून देखील पैसे कमवू शकता. यासाठी इंस्टाग्रामवर तुमचे चांगले फॉलोवर्स असायला हवेत. किमान तुमच्याकडे १० हजार ते २० हजार इतके फॉलोवर्स असायला हवेत. तेव्हाच या इंस्टग्राम पेजमार्फत तुम्हाला पैसे कमवता येतील.

फॉलोवर्स कसे वाढवावेत?
आपले फॉलोवर्स वाढवण्यासाठी तुम्हाला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं पोस्ट करावं लागले. यातुन तुमची पोस्ट पाहून व्यक्ती स्वत:हून त्यांच्या इतर व्यक्तींना ती पोस्ट शेअर करतील. इंस्टग्रामच्या आधी व्यक्ती टीकटॉकवर खूप जास्त सक्रिय होते. मात्र टीकटॉक बॅन झाल्यापासून सर्वांचा कल इंस्टाग्राम रीलकडे वळला आहे.

जास्तीत जास्त फॉलोवर्स वाढवण्यासाठी इंस्टाग्राम कंपनी तुम्हाला काही विशिष्ट प्रोडक्टच्या जाहिराती देईल. यासाठी तुमच्याकडून पैसे आकारले जातील त्यामुळे तुम्हाला किती पैसे द्यायचे आहेत हे तुमच्या हातात आहे.

URL Shortner मार्फत कमवता येतील पैसे
यूआरएल म्हणजे नेमकं काय हे आधी समजून घेऊ. तुमच्या युट्यूब, गूगल किंवा इंस्टाग्राम यांची जी लिंक असते तिला यूआरएल असं म्हटलं जातं. हा यूआरएल आधी फार मोठा असतो. ही लिंक छोटी करण्याचा पर्याय म्हणजे URL Shortner होय.

जेव्हा एखादी लिंक तयार होते तेव्हा ती फार मोठी असते. ही लिंक थेट तुम्हाला संबंधीत पेजवर घेऊन जाते. मात्र URL Shortner मुळे तुमची लिंक लहान होते. त्यामुळे या लिंकवर क्लिक केल्यावर थेट तुमच्या पेजवर न जाता लोकांना त्या आधी जाहिराती दिसतात. या जाहिरातींचे आपल्याला पैले दिले जातात.

URL Shortner मार्फत पैसे कसे कमवायचे?
URL Shortner मार्फत पैसे कमवण्यासाठी तुम्ही ही लिंक डाउनलोड मॅसेज अथवा युट्यूबवर देऊ शकता. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पैसे कमवता येतील. URL Shortner केल्यावर तुमच्या लिंकवर किती क्लिक येतात हे पाहिले जाते. यामध्ये त्या लिंकवर फक्त भारतीय क्लिक करत आहेत की अन्य देशातील व्यक्ती देखील क्लिक करत आहेत हे समजते. कोणत्या देशातून क्लिक येतात यावर कमाई अवलंबून आहे.

अमेरिका आणि युरोप अशा देशांमधून क्लिक येत असतील तेथून सर्वाधिक कमाई करता येते. या देशांमध्ये ऍड रेट हा सर्वाधिक आहे. यात तुम्हाला १००० व्यक्तींनी क्लिक केल्यावर प्रत्येक विझिटरवर पैसे मिळतात. भारतामध्ये हा रेट थोडा कमी आहे. तुमच्या लिंकवर भारतीय क्लिक येत असतील तर १००० क्लिक मागे तुम्हाला २$ ते ५$ पैसे मिळतात.

Affiliate Marketing
सध्याच्या घडीला ऑनलाईन मार्केंटींग हे एक मोठे व्यासपीठ झाले आहे. लोकांना बाहेर जाण्यापेक्षा घरबसल्या वस्तू ऑर्डर करायला आवडतात. अनेक व्यक्ती ऑनलाईन वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे विक्रेत्यांसाठी पैसे कमवण्याचा हा एक चांगला सोर्स आहे. तुम्ही देखील याचा वापर करून तुमच्या वस्तू विकू शकता.

Affiliate Marketing मधून कसे कमवायचे पैसे?
Affiliate Marketing मध्ये तुम्हाला Amazon, Flipkart अशा अनेक वेबसाईट जाहिरातीचे काम देतात. त्यांचे प्रोडक्ट तुम्ही विकू शकता. यासाठी तुम्हाला त्या कंपनीचे Domain Hosting जॉईन करावे लागेल. त्यानंतर तुमच्या फेसबूक, वॉट्सऍपवर तुम्ही कंपनीच्या प्रोडक्टची जाहिरात करू शकता. त्यातील प्रोडक्ट विकले गेल्यावर तुम्हाला त्यामागे कमिशन मिळते.

* यासाठी सर्वात आधी कोणत्याही एखाद्या कंपनीचे Affiliate Program जॉइन करा.
* यासाठी तुम्ही स्वत:ची एक वेगळी स्वतंत्र वेबसाईटही बनवू शकता.
* तुमच्या युट्यूबमध्ये तु्म्ही ते प्रोडक्ट कसे आहे याची माहिती देऊन डीस्क्रीप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊ शकता.
* तसेच इंस्टाग्राम, फेसबूक अशा पेजवर तुमचे फॉलोवर्स वाढवल्यानंतर तुम्ही ते प्रोडक्ट जास्तीत जास्त सेल करून अधिक नफा मिळवू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Work From Home Jobs.

हॅशटॅग्स

#Work From Home Income Options(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x