21 February 2025 6:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

पवारांसोबत लाव रे तो व्हिडीओचा कार्यक्रम घेतला होता, तेव्हा पवारांबद्दल कळलं नाही का? - हसन मुश्रीफ

Minister Hasan Mushrif

कोल्हापूर, २१ ऑगस्ट | राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीयवाद वाढला, असं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्याचा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला आहे. शरद पवारांसोबत लाव रे तो व्हिडीओचा कार्यक्रम घेतला होता. तेव्हा तुम्हाला पवारांबद्दल कळलं नाही का?, असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

पवारांसोबत लाव रे तो व्हिडीओचा कार्यक्रम घेतला होता, तेव्हा पवारांबद्दल कळलं नाही का? – हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif reply to MNS chief Raj Thackeray after caste politics allegations against NCP) :

हसन मुश्रीफ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हा सवाल केला. राज ठाकरे यांनी शरद पवारांसोबत लाव रे तो व्हिडीओ हा कार्यक्रम घेतला होता, तेव्हा पवारांसोबत दौरे करत होते. तेव्हा त्यांना पवारांबद्दल कळलं नाही का? असा सवाल मुश्रीफ यांनी केला. राज यांना भारतीय जनता पक्षासोबत सलगी करायची आहे. पण त्यांनी परप्रांतियांबाबत जी भूमिका मांडलेली आहे. त्यावर भारतीय जनता पक्ष आडून बसला आहे. ते धुवून काढण्यासाठीच ते राष्ट्रवादीला टार्गेट करत असावेत. त्यांनी एकत्र यावेत, दोघांनी एकत्र संसार करावा पण राष्ट्रवादीला बदनाम करण्याची गरज काय?, असा सवालही मुश्रीफ यांनी केला आहे. (Minister Hasan Mushrif reply to MNS chief Raj Thackeray)

यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावरही टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते मध्यंतरी दिल्लीत गेले होते. त्यानंतर महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष शांत झाला आहे. दिल्लीतून आल्यापासून त्यांची आदळआपट कमी झाली आहे, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Minister Hasan Mushrif reply to MNS chief Raj Thackeray after caste politics allegations against NCP news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#HasanMushrif(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x