24 November 2024 10:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

चाबूक! म्हणत खवय्ये सुखावले, कोल्हापूरकरांच्या ताटात मटण

Kolhapur, Kolhapur Mutton, Tambada Rasaa Pandhara Rassa

कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील कसबा बावडा या उपनगरात मटण दरवाढीचा मुद्दा उपस्थित झाला. येथेच या वादाची पहिली ठिणगी पडली. या परिसरातील मटण विक्रेत्यांनी ५६० ते ५८० रुपये किलो दराने विक्री सुरू केली. त्यानंतर येथील दुकाने बंद पडू लागली. मात्र, नदीपलिकडे मटण ४६० किलोने मिळत असताना गावात मात्र मटण विक्रेते आर्थिक लूट करत असल्याचा आक्षेप लोकांनी घेतला. हे आंदोलन इतर ठिकाणीही पसरू लागले. मटण विक्री बंद असल्याने कोल्हापूरकर ताटातील झणझणीत मटणाला वंचित झाले होते. मात्र, कृती समितीने यावर तोडगा काढल्याने अखेर आजपासून मटण विक्री सुरू होत आहे.

मागील कित्येक दिवसांपासून ‘गॅसवर’ असलेल्या कोल्हापुरातील मटणदराच्या वादाला अखेर तोडग्याची ‘फोडणी’ मिळाली आहे. ५२० रुपये प्रतिकिलो दराने मटण विकण्यावर अखेर एकमत झालं आहे. त्यामुळे मटण विक्रेतेही समाधानी झाले आहेत आणि कोल्हापुरातील खवय्यांमध्येही ‘चाबूक’ अशी भावना आहे.

कोल्हापुरात मटण दरवाढ झाल्यानंतर मटण दरवाढविरोधी कृती समितीन प्रति किलो ४८० रुपये दराने मटणाची विक्री व्हावी असा आग्रह धरला होता. मात्र हा दर परवडत नसल्याचे सांगत मटण विक्रेत्यांनी विक्री बंद ठेवली होती. यावर तोडगा निघणे अवघड होऊन बसले होते. या वादात कोल्हापूरकरांचा थर्टीफर्स्टही कोरडाच गेला.

एकीकडे न परवडणारा मटणाचा दर तर दुसरीकडे अन्न आणि औषध प्रशासन तसेच महापालिकेकडून सुरु असलेली कारवाई यामुळे कोल्हापुरातील मटण विक्रेत्यांनी मटण विक्री बेमुदत बंद ठेवली होती.

 

Web Title:  Mutton sale started at rupees 520 started in Kolhapur.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x