महत्वाच्या बातम्या
-
१० टक्के सवर्ण आरक्षण घटनात्मक पातळीवर टिकेल का? पवार साशंक
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना मोदी सरकारनं दिलेलं एकूण १० टक्के आरक्षण कोर्टात टिकेल की नाही, याबद्दल एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला असता ही शंका त्यांनी व्यक्त केली. मोदी सरकारकडून सदर निर्णय नेमका कोणासाठी घेण्यात आला आहे?, असा प्रश्न विचारत हे आरक्षण कोर्टात टिकणार नसल्याचं मत अनेक प्रसिद्ध घटनातज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे असं पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, त्यांनी मोदींवर सुद्धा जोरदार निशाणा साधला.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव: शरद पवार
मराठा समाजच्या आंदोलकांनी हिंसा तसेच जाळपोळीचे प्रकार थांबवून शांततेने आंदोलन करण्याला प्राधान्य द्यावे आणि मराठा व बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव हाणून पडावा असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, पंढरपुरात इंटरनेट बंद
मराठा आरक्षणासाठी तसेच विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मात्र या बंद मधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना वगळण्यात आलं आहे. परंतु राज्यात इतर ठिकाणी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. सुरक्षेचं कारण पुढे करत पंढपुरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याचं वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
संख्याबळ असलेले विरोधक नव्हे, तर संख्याबळ नसलेले राज ठाकरेच आगामी निवडणुकीत भाजपला उजवे ठरतील: सविस्तर
मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध पोटनिवडणुका, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल आणि भाजपाची घोडदौड पाहता, त्यांच्या समोर आमदार, खासदार असं मोठं संख्याबळ असणारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष सुद्धा फिके पडताना दिसत आहेत. तर पदवीधर निवडणुकांचे निकाल हे जवळजवळ निश्चित असतात आणि त्या निवडणुकीचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीशी संबंध जोडणे अवघड आहे. परंतु पदवीधर निवडणुकीत सुद्धा भाजपने कोकणात चमत्कार केला तर नाशिकमध्ये ते गाफील राहिल्याने जागा गमवावी लागली होती.
7 वर्षांपूर्वी -
आक्रमक मराठा आंदोलक महिलांनी शिवसेना आमदार मिणचेकरांना बांगड्या दाखवल्या
आक्रमक मराठा आंदोलक महिलांनी शिवसेना आमदार मिणचेकरांना बांगड्या दाखवल्या
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण; आक्रमक आंदोलक महिलांनी शिवसेना आमदार मिणचेकरांना बांगड्या दाखवल्या
सर्व पक्षामध्ये मराठा आरक्षणावरून सर्वाधिक नाचक्की शिवसेनेचीच होताना दिसत आहे. आधी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांना मराठा मोर्चातील आक्रमक कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत अक्षरशः हाकलून दिल होत. आता शिवसेनेचे आमदार मिणचेकर हे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले असता त्यांना आक्रमक आंदोलक महिलांनी आमदार सुजित मिणचेकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत हात वर करून बांगड्या दाखवल्या.
7 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी 'वारीत साप' सोडण्याचं विधान केल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले
राज्याच्या मुख्यमंत्र्यानेच वारीत साप सोडण्याचं विधान केलं आणि त्यामुळेच मराठा समाजाचे आंदोलक आक्रमक झाले होते. नाहीतर मराठा आरक्षणच आंदोलन शांततेत चाललेलं, पण सत्ताधाऱ्यांनीच आगीत तेल ओतण्याचं काम केलं आणि आंदोलन चिघळलं,’ अशा तिखट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर दूध आंदोलन मागे घेत आहोत: राजू शेट्टी
मागील चार दिवसांपासून सुरु असलेले दूध आंदोलन अखेर मागे घेण्याचा निर्णय राजू शेट्टी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर राजू शेट्टी ही अधिकृत घोषणा केली आणि अखेर सरकारचा जीव भांड्यात पडला आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानी शेतकरी संघटने पुण्यात दुधाच्या ५ गाड्या फोडल्या, मुंबईत ‘दूध-कोंडी’
राज्य सरकारनेही दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर ५ रुपये दर द्यावा या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मुंबईचा दूध पुरवठा रोखण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात ५ दुधाच्या ५ गाड्या फोडल्याची बातमी आहे. त्यामुळे हा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
आम्ही निवडणुकीला एकत्र येणार का, हे आता सांगता येणार नाही: उद्धव ठाकरे
भाजप आणि शिवसेनेमधील भांडण हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सारखे नसून, ५ वर्षांनी आम्ही पुन्हा काँग्रेस-एनसीपी’सारखे एकत्र येणार किंवा नाही, हे आता सांगता येणार नाही,’ वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुण्यात केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सत्तेत आल्यापासून आम्ही केवळ भांडायचे म्हणून भांडत नाही आहोत आणि ते भांडण माझ्या वैयक्तिक किंवा पक्षाच्या स्वार्थासाठी नसून जनतेच्या हिताचे आहे अशी पुष्टी सुद्धा त्यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधताना जोडली.
7 वर्षांपूर्वी -
तीच झलक! अमित ठाकरेंचा सक्रिय राजकारणातील प्रवेश ठरू शकतो तरुणांसाठी आकर्षणाचा विषय
राज ठाकरेंचे चिरंजीव सक्रिय राजकारणात कधी येणार हा सर्वांसाठी चर्चेचा विषय होते आहे. अर्थात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि राज ठाकरे अस संपूर्ण कुटुंबच एक विचारधारा असलेलं विद्यापीठ म्हणून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला परिचित आहे. त्यामुळे असा वारसा लाभलेल्या कुटुंबातील तिसरी पिढी जेव्हा सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या कानावर पडू लागतात, तेव्हा त्याबद्दल कुतूहल निर्माण होणारच.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेस व एनसीपी'ची आघाडी होणार, आठवड्याभरात जागावाटप ठरणार: शरद पवार
आघाडी संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोबत आपल्या ३ बैठका पूर्ण झाल्या असल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी ‘द हिंदू’ ला दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. त्यामुळे शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जोमाने कामाला लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
7 वर्षांपूर्वी -
ओबीसीं'चा मुद्दा तापल्यास भाजप-सेनेची डोकेदुखी वाढणार? सविस्तर
ओबीसी समाजाला भुजबळांच्या नेतृत्वाखाली सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र आणण्याचा प्रयत्नं यशस्वी झाल्यास भाजप बरोबर शिवसेनेची सुद्धा डोकेदुखी वाढू शकते. कारण राज्यात ४० टक्क्यांच्या घरात लोकसंख्या असलेला ओबीसी समाज जर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकवटला तर आगामी निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
रावतेंवर प्रवाशी आणि एसटी कर्मचारी दोघेही नाराज
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एकबाजूनेच विचार करून जाहीर केलेली पगारवाढ एसटी संघटनांना मान्य नाही. तसेच एसटीच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ घोषित केली. परंतु ज्या कर्मचाऱ्यांना ही वेतनवाढ मान्य नसेल त्यांनी एसटी महामंडळाकडे ९ जूनपर्यंत लेखी स्वरूपात अर्ज करावा आणि कहर म्हणजे हे अर्ज स्वीकारताना संबंधित कर्मचाऱ्यांचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याने सर्व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये परिवहनमंत्री दिवाकर रावते याच्या विरोधात एक खदखद आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचा १ जूनला पुन्हा एल्गार, आंदोलनाची हाक
शेतकऱ्यांचा ज्वलंत मागण्यांसाठी राज्याभर पुन्हां एल्गार, येत्या १ जूनपासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला १ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
सुप्रिया सुळे व शरद पवार हे धादांत खोटे बोलतात: विनोद तावडे
राज्यातील अनेक शाळा बंद केल्याचा संदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे दोघेही धादांत खोटे बोलत असल्याचा आरोप राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिक्षण विभागाची 'डिजिटल'माघार, बारावीचे प्रवेश यंदा ऑफलाइनच
शालेय शिक्षण विभागाने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही माघार घेत बारावीच्या ऑनलाइन प्रवेशाची तयारी नसल्याने, बारावीचे प्रवेश प्रक्रिया पुन्हा ऑफलाइन करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या शालेय शिक्षण विभागाची ‘डिजिटल’ म्हणजे ऑनलाइन प्रवेश घेण्याची तयारी नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
आता अजित पवार व तटकरेंचा नंबर सांगणारे सोमैया आहेत तरी कुठे ?
मार्च २०१६ मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ‘ईडी’ने अटक केलं होत. परंतु भुजबळांच्या अटकेनंतर सोमैया यांनी, ‘पुढील क्रमांक अजित पवार व सुनील तटकरे यांचा’, असे वक्तव्य केले.
7 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटलांनी विधानसभेला उभं राहावं, पवारांचं थेट आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून विधानसभा निवडणूक लढवावी असं थेट आवाहन दिलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
ग्रामीण महाराष्ट्रात तीव्र 'पाणी-बानी'
ग्रामीण महाराष्ट्रात २६,३४१ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. मार्चपासूनच उन्हाचा कडाका प्रचंड वाढल्याने ग्रामीण महाराष्ट्रात रोजच्या पिण्याच्या पाण्याची समस्या अतिशय तीव्र होऊ लागली आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Sarkari Investment Plan | शेअर बाजार नको, रेग्युलर इन्कमसाठी 3 सरकारी योजना, महिना 9250 रुपयांपर्यंत कमाई होईल
-
No Cost EMI | नो कॉस्ट ईएमआयवर किती खर्च येतो? गणित समजून घेतलं तर लाखो रुपयांची बचत होऊ शकते
-
Insurance Mistakes | पगारदारांनो, विमा खरेदी करताना या चुका करु नका, अन्यथा तुमच्या अडचणी वाढल्याच समजा
-
Homemade Ayurvedic Tea | अशाप्रकारे घरीच बनवून आयुर्वेदिक वसंत चहा प्या, खूप फायदेशीर घटक मिळतील, आजारांपासून सुटका
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, सध्याच्या शेअर्स BUY करावे की Hold - NSE: VEDL
-
IRFC Share Price | रेल्वे स्टॉक घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा अलर्ट, मोठ्या घसरणीचे संकेत - NSE: IRFC
-
8th Pay Commission | बेसिक सॅलरीमध्ये 40,000 रुपये पेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता, संपूर्ण आकडेवारी समोर आली
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये तेजी, कंपनी ऑर्डरबुक मजबूत झाली, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
IREDA Share Price | पीएसयू इरेडा कंपनी शेअरमध्ये जबरदस्त घसरगुंडी, स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IREDA
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत, संधी सोडू नका - NSE: VEDL