5 November 2024 9:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

फडणवीस कुठले पंचांग वापरतात माहिती नाही | मात्र त्यांचे मुहूर्त चुकत आहेत - हसन मुश्रीफ

Rural Minister Hasan Mushrif, Opposition leader Devendra Fadnavis, Marathi News, Breaking News

कोल्हापूर, १५ ऑगस्ट : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियोजित बदल्या पुढे ढकलण्यात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस बदल्यांसाठी अर्थपूर्ण बोलणी सुरु असल्याचा गंभीर आरोप शनिवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत केला. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून फडणवीस यांच्यावर तात्काळ पलटवार करण्यात आला.

यंदा कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या नाहीत, असे ठरले होते. मात्र, काही पोलीस अधिकारी गेल्या पाच वर्षात खाल्लेल्या मिठाला जागत आहेत. त्यामुळे हे अधिकारी आमदारांचे ऐकत नाहीत. त्यामुळेच १५ टक्के पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चौकशी करण्याची भाजपची मागणी म्हणजे ‘सौ चुहे खा के बिल्ली चली हजको’, असा प्रकार असल्याचा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला.

दरम्यान, ज्याचा अनुभव नाही अशा आजाराशी राज्यातील महाविकास आघाडीपासून ते अगदी परिचारिका, ग्रामपंचायतीच्या शिपायापर्यंत सर्वजण जीवाची बाजी लावून सामना करत असताना फसवी आंदोलने करणाऱ्या विरोधकांना लाज वाटायला पाहिजे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपावर शनिवारी हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस कुठले पंचांग वापरतात माहिती नाही. मात्र त्यांचे मुहूर्त चुकत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

मुश्रीफ म्हणाले, ग्रामीण नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आम्ही हे गोळ्या देण्याचे नियोजन केले. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी २३ रूपयांच्या गोळ्या २ रूपयांना देतो म्हणाले. पण आम्ही हे अधिकारी जिल्हा परिषदांना दिले. पाटील यांनी २ रूपयांना गोळ्या आणून द्याव्यात. विरोधकांनी जरा पीपीई किट घालून काम करून पहावे आणि जरा बिळातून बाहेर यावे. लोकशाही मध्ये आंदोलने हवीत. पण ही ती वेळ नाही.

 

News English Summary: Opposition to the fraudulent agitation should be ashamed as everyone in the state, from the Mahavikas Aghadi to the nurses and the Gram Panchayat soldiers, is fighting an inexperienced disease, Rural Development Minister Hasan Mushrif said on Saturday.

News English Title: Rural Minister Hasan Mushrif slams opposition leader Devendra Fadnavis on agitation News latest Updates.

हॅशटॅग्स

#HasanMushrif(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x