17 April 2025 1:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

नाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा

Former MP Nilesh Rane, CM Uddhav Thackeray, Nanar Refinery Project land, Marathi News ABP Maza

रत्नागिरी, २३ सप्टेंबर : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक निशाण देशमुख यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या बाधित भागात 1400 एकर जमीन विकत घेतली”, असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. निशाण देशमुख हे उद्धव ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत, असा दावा निलेश राणे यांनी केला आहे.

याबाबत निलेश राणेंनी आज पत्रकार परिषद घेतली, यात त्यांनी म्हटलं की, नाणार प्रकल्प रद्द झाला आहे असं सांगितलं जात असताना मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा का होतेय? ही चर्चा प्रकल्प रायगडमध्ये नेण्यासाठी नव्हे तर राजापूर तालुक्यात नाणारमध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी कंपनी आणि शासनातील काही अधिकारी प्लॅनिंग करत आहेत. नाणार पुन्हा राजापूर तालुक्यात आणण्यासाठी हे एकत्र आले आहेत. नाणारमध्ये सुगी डेव्ल्हपर्स म्हणून कंपनी आहे, त्यात निशांत सुभाष देशमुख हे संचालक आहेत, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मावस भाऊ आहे. त्यांनी १४०० एकर जमिनीचा व्यवहार केला आहे. हा व्यवहार ज्यांनी केला ते अँड. कावतकर हे कोदवलीचे आहेत. सगळे व्यवहार एलएलपी म्हणजे लिमिटेड लायब्रेटी पार्टनरशिपद्वारे झाले, २०१४ ते २०१९ या काळात व्यवहार झाला असं त्यांनी सांगितले.

तसेच युतीच्या काळात शिवसेना नेत्यांनी मुखवटे घालून लोकांना भडकावून प्रकल्पाविरोधात आंदोलन केले, तेव्हा त्यांच्या मावशीचा मुलगा जमिनीचे व्यवहार करत होता. दीपक वायंगणकर नावाच्या एका व्यक्तीकडून त्यांनी राहण्यासाठी आणि ऑफिससाठी जमीन घेतली, लॉकडाऊनकाळात ऑफीस बंद पडल्याने स्टाफ निघून गेला. सध्या त्या ऑफिसला कोणीही नाही. कावतकर यांनी जमिनीचे अँग्रीमेंट बनवले. प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करायला लावली, तेव्हा मुख्यमंत्र्यांचा मावस भाऊ प्रकल्पबाधित जमिनीचे व्यवहार करत होते असा आरोपही निलेश राणेंनी केला आहे.

“ऋतुजा डेव्हलोपर्स ही पुण्याची कंपनी आहे. या कंपनीने नाणारमध्ये 900 एकर जमिनीत गुंतवणूक केलेली आहे. विशेष म्हणजे या कंपण्यांनी फक्त मध्यस्थीचे कामे केली आहेत. त्यांनी सर्व व्यवहार परप्रांतीयांना करुन दिलेले आहेत. जवळपास 80 टक्के यात परप्रांतीय आहेत”, असं निलेश राणे म्हणाले. “कमलाकर कदम हे शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत. त्यांनी उफळे परिसरात 36 एकर जमिनीवर स्वत:चं कुळ म्हणून नाव लावलं आहे. त्याबाबत कोर्टात खटला सुरु आहे”, असं निलेश राणे यांनी सांगितलं.

“नाणार रिफायनरी प्रकल्पाचा अध्यादेश काढून रद्द झाला आहे, असं शिवसेनेकडून सांगण्यात येतंय. नाणारचा विषय आमच्यासाठी संपलाय, असं शिवसेनेचे स्थानिक मंत्री, आमदार, खासदार बोलत असतात. पण रिफायनरीची एक कमिटी हा प्रकल्प आणू पाहतेय. ही कमिटी सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्याशी चर्चा करत आहे. हा प्रकल्प रद्द झाला आहे तर मग चर्चा नेमकी कशासाठी होत आहे?”, असा सवाल निलेश राणे यांनी केला.

 

News English Summary: Former MP Nilesh Rane has alleged that Nishan Deshmukh, a relative of Chief Minister Uddhav Thackeray, bought 1,400 acres of land in the affected area of the Nanar refinery project. Nilesh Rane has claimed that Nishan Deshmukh is Uddhav Thackeray’s cousin.

News English Title: Allegation of Nilesh Rane on CM Uddhav Thackeray and Shiv Sena over Nanar Refinery Project land Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या