राणेंनी उद्घाटनाला पहिल्यांदा पावरफुल 'डेअरिंगबाज' माणसाला बोलावलं होतं | सोशल व्हायरल
कणकवली, ०८ फेब्रुवारी: भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते काल पार पडले. या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. त्यावेळी नारायण राणे म्हणाले होते.”आमच्या काही डॉक्टरांना विचारलं उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं? तुम्ही ज्याप्रकारे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं धाडस केलं. तेव्हा उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा म्हणून शहांना बोलावलं”, असंही भाजप नेते नारायण राणे म्हणाले होते.
अमित शाह यांना उद्घाटनाला बोलावण्यामागे आमच्या काही भावना आहेत. आम्ही जंगलात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 650 बेड्सचं हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज तयार केलं. आमच्या काही डॉक्टरांना विचारलं उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं? तुम्ही ज्याप्रकारे मेडिकल कॉलेज सुरु करण्याचं धाडस केलं. त्यासाठीदेखील तशाच धाडसी माणसाच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवं. त्यासाठीच मी दिल्लीत गेलो. त्यांना सांगताच, त्यांनी येणार असं आश्वासन दिलं. ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मी गेल्या अनेक वर्षात राज्यभरात भरपूर काम केलंय, असंही राणे म्हणाले होते.
मात्र खासदार नारायण राणे यांनी अमित शहा यांची स्तुती करताना म्हटलं होतं की, ‘उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा म्हणून शहांना बोलावलं’. मात्र त्यानंतर समाज माध्यमांवर देशातील तसेच राज्यातील ‘पावरफुल’ नेत्याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होतं आहेत.
खासदार नारायण राणे यांच्या स्वप्नातील व कोकणातील उच्च दर्जाच्या सुपर स्पेशालिटी एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तीन वर्षांपूर्वी पार पडला होता. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. राज्याचे तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
राणेंनी उद्घाटनाला पहिल्यांदा पावरफुल ‘डेअरिंगबाज’ माणसाला बोलावलं होतं | सोशल व्हायरल pic.twitter.com/lx3uiuvGgl
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) February 8, 2021
News English Summary: Bharatiya Janata Party Rajya Sabha MP Narayan Rane inaugurated the Lifetime Hospital at the hands of Union Home Minister Amit Shah yesterday. Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis, BJP state president Chandrakant Patil and other BJP leaders were present on the occasion. At that time, Narayan Rane had said. The way you dared to start a medical college. I called the Shah for the inauguration as I wanted a daring man, ”said BJP leader Narayan Rane.
News English Title: Amit Shah inaugurated the Lifetime Hospital of BJP MP Narayan Rane in Konkan news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो