15 November 2024 5:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

सांगली-कोल्हापूर ते कोकण महापूर | भाजपच्या वर्गणीकडे दुर्लक्ष करत निलेश राणेंची सेनेवर 'या' मुद्यावरून टीका

Nilesh Rane

मुंबई, ०५ ऑगस्ट | माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. चिपळूणमध्ये आलेल्या महापुराच्या मुद्द्यावरुन मुंबईत शिवसेनेनं नवी वसुली मोहीम सुरु केल्याचा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केलाय. मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी त्याबाबत माहिती दिली आहे. शिवसेना सध्या महापुराच्या नावाखाली मुंबईकरांकडे वेगळी वर्गणी मागत आहे. ही एकप्रकराची शिवसेनेची नवीन वसुली मोहीम आहे, असा घणाघाती आरोप निलेश राणे यांनी केलाय. त्याचबरोबर शिवसेनेला कधीपर्यंत पोसणार असा सवालही निलेश राणे यांनी मुंबईकरांना विचारलाय.

दरम्यान, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केलीय. आदित्य ठाकरेंना पाहून बाळासाहेबांची शिवसेना आठवते का? असा सवाल त्यांनी केलाय. आदित्य ठाकरेंना बघून सुशांतसिंग हत्या प्रकरण आठवतं. बाटली आणि ग्लास आठवतो, अशा शब्दात निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्ला चढवला.

जिथं बाळासाहेब नाहीत तिथल्या पक्षात कसली श्रद्धा, असा सवालही त्यांनी केलाय. आमची श्रद्धा बाळासाहेबांच्या पायाशी होती. शिवसेनेनं ते काही शिल्लक ठेवलं नाही. शिवसेना भवनात आता सर्व अमराठी लोक दिसतील. तिथे आलेले सर्व बिलिंगसाठी आलेले असतात. मातोश्रीवर बॅग घेऊन आलेल्या माणसालाच प्रवेश मिळत असल्याचा घणाघातही निलेश राणे यांनी यावेळी केलाय.

भाजपकडूनही सांगली-कोल्हापूर आणि आता कोकण पूरग्रस्तांसाठी वर्गणी जमा केली:
विशेष म्हणजे निलेश राणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी मुंबईतील रस्त्यावर आणि दुकानदारांकडून सांगली आणि कोल्हापूरच्या महापुरावेळी वर्गणी जमा केली होती. त्यामध्ये सर्वात आघाडीवर होते तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे. त्यानंतर सध्याच्या कोकणातील पूर आपत्तीवरून देखील पंकजा मुंडे यांच्यापासून अनेक पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर वर्गण्या जमा केल्या आहेत. मात्र त्याकडे निलेश राणे यांनी कानाडोळा केल्याचं पाहायला मिळतंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP leader Nilesh Rane allegations on Shivsena regarding collecting donation for flood news updates.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x